टिश्यू कल्चरपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावलेली केळी कधीही सरसच

श्री. राजेंद्र पांडुरंग पाटील,
मु.पो. मनवेल, ता. यावल, जि. जळगाव


मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची माहिती "कृषी विज्ञान" मासिकातून मिळाली. त्या अंकातील शेतकर्‍यांचे अनुभव वाचून या टेक्नॉंलॉजीचे शेती क्षेत्रातील योगदान फार मोठे असल्याचे समजले. त्यावरून मी २ फेब्रुवारी २००६ मध्ये लावलेल्या ८ एकर केळीवर त्याचा प्रयोग करण्याचे ठरवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' कृषीविज्ञान केंद्र', जळगाव येथून औषधे आणली. श्रीमंती जातीची केळी असून भारी काळ्या जमिनीत ५' x ४.५' वर लागवड आहे.

यापुर्वी २००४ साली केळीची लागवड केली होती. तेव्हा या औषधांबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे दिसरी औषधे वापरली, तर केळीची ११ व १२ ची रास मिळत होती. ती यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधाने सरासरी १८ ते २० ची रास मिळाली. घडांचा आकार एकसारखा मिळाला. एरवी जास्त उत्पादनासाठी आमच्या भागातील शेतकरी टिश्यू कल्चर केळीची लागवड करतात, मात्र माझ्या मते ते न करता आपल्या शेतातील उच्च प्रतीच्या केळीच्या जातीचे बेणे (मुनवे) लावून त्याला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन ही औषधे वापरल्यास घड मोठा होऊन बाग काढणीस लवकर येते. तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते. या केळीला पाणीही कमी लागते. टिश्यू कल्चर केळीला पाणी जास्त लागते व केळी वादळ वार्‍यात टिकाव धरू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. तरी शेतकरी बांधवांनी शेतीचा कस टिकून राहण्यासाठी तसेच कर्जाच्या खाईकडे जाणारा मार्ग टाळण्यासाठी डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनाखाली शेती करावी.