केळीचे अर्थशास्त्र मोठ्या प्रमाणावरीलही केळीची लागवड अधिक फायदेशीर
श्री. सुनिलशेठ दिनकर कसरेकर,
मु. पो. वडगाव, (कांदळी) ता. जुन्नर, जि. पुणे
फोन नं .(०२१३२) २७३२६५
क्षेत्र - २२ एकर २५,००० नग (खुंट), एकरी ११०० खुंट.
आम्ही ऑगस्ट २००३ मध्ये केळीची नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. प्रथम जमिनीची माशागर करून ८' x ५' , ६' x ५' , ७' x ५' , मापावर सरी काढून त्यात १ ट्रक शेणखत मिक्स केले व त्यात कल्पतरू सेंद्रिय खत १०० ग्रॅम + लिंबोळी पेंड ५० ग्रॅम, करंज पेंड ५० ग्रॅम , एरंड पेंड ५० ग्रॅम असे एकूण २५० ग्रॅम खत प्रत्येक झाडाच्या लागवडीच्या जागेवर मिक्स करून त्यावर थोडी माती टाकली.
बेणे प्रक्रिया : जर्मिनेटर २५० मिली + १० लि. पाणी + गोमुत्र (गावरान गाईचे) मिक्स केले. त्यात बेणे ५ मिनिट भिजवून घेतले व लागवड केली. बेण्याची उगवण झाल्यानंतर १५ दिवसांनी एकरी १ लि. जर्मिनेटर ड्रिपमधून मुळाशी सोडले. नंतर जर्मिनेटर महिन्यातून १ वेळा असे तीन महिने ड्रिपमधून सोडले. केळीचे दोन ओळीतील मधल्या पट्ट्यात खरीपात भुईमूग लावला. त्याच्या एकरी १० पोती शेंगा निघाल्या. केळी लावून २० दिवस झाल्यानंतर स्लरी सोडली. त्यात शेण १० किलो, गोमुत्र १० लि. , २ किलो काळा गूळ, २ किलो बेसन पीठ, बांधावरील माती १ किलो, राख २ किलो आणि २०० लि. पाणी हे मिश्रण ८ दिवस रापत ठेवले. दिवसातून ३ ते ४ वेळा ढवळले. प्रति झाडास सुरुवातीला १ ग्लास व नंतर गरजेनुसार डोस वाढून ५०० मिली ते १ लि. पर्यंत दिला. केळीच्या झाडांवर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारले. ही फवारणी महिन्यातून १ वेळा अशी ४ महिने घेतली. त्यामुळे वाढ चांगली झाली. केळीची पाने हिरवीगार राहिली. केळीची. केळीची वेण झाल्यावर जे घड कमळासह गळून पडतात ते गळले नाहीत. हा मोठा फायदा झाला. बर्याच शेतकर्यांचे केळीचे घड गळले होते.
लागवडीनंतर साधारण साडे सात महिन्याच्या अवस्थेत केळीची वेण होण्यास सुरुवात झाली. पुर्ण वेण झाल्यावर कमळ तोडल्यानंतर क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५० मिली + १२ लि. पाणी ह्या फवारणीमुळे केळीची फुगवण चांगली झाली. केळीची लांबी वाढली. शायनिंग चांगली आली. किपींग क्वोलिटी वाढली. ज्यावेळेस मार्केटला आपला माल नेला त्यावेळेस रेट ३० रू./ १० किलो होता. पण केली चांगली मोठी, आकर्षक असल्यामुळे आम्हाला ३५ रू. / १० किलो भाव मिळाला. साधारण ३५, ३८, ४०, ४८ रू. प्रति १० किलो अशा भाव आम्हांला केळी संपेपर्यंत मिळत गेला. सर्वसाधारण आम्ही नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे २२ ते २३ किलो अशा अॅव्हरेजने वजन मिळाले. पण ह्या पद्धतीमुळे लागवडीचा किंवा पिकविण्याचा खर्चही कमी आला. तसेच काही घड ३० किलोपर्यंत निघाले होते.
उत्पन्न ८३,६०० - खर्च १८,४०० = ६५,२०० रू.
नफा/ एकरी.
आता सध्या मी ९०,००० केळीच्या लागवडीवर डॉ.बावसकर सरांचे तंत्रज्ञान वापरत आहे.

खर्च | उत्पन्न |
---|---|
मशागत ट्रेक्टर २०००/ - | ११०० खुंटापैकी फक्त ९५० |
बैल मशागत १००० / - | केलींनाच व्यवस्थित चांगले |
सेंद्रिय खत १००० / - |
९५० खुंट २२ किलो घडाचे वजन = २०९०० किलो |
लागवड + खुरपणी ३००० / - बेणे (११०० x ४) ४४०० |
अॅव्हरेज रेट ४० रू. / १० किलो |
एकूण १८,४०० | म्हणून २०,९०० x ४० = ८३,६०० / - |