केळी खोडापासून धागा निर्मिती
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगाव.
महाराष्ट्रात अंदाजे ७२,००० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळी घड / लोंगर काढल्यानंतर केळी खोड निरूपयोगी म्हणून बाहेर फेकले जाते आणि जाळले जाते. काही शेतकरी थोड्याप्रमाणात त्याचा उपयोग कंपोस्ट खत करण्यासाठी करतात. केळी लागवड बहुतांशी १.५ x १.५ मिटर (५ x ५ फूट) अंतरावर केली जात असल्याने हेक्टरी ४,४४० झाडे किंवा एकरी १,७४० झाडे असतात. केळी घड काढल्यानंतर पाने, खोड, घडाचा दांडा आणि जमिनीखालील खोड / कंद शिल्लक राहतात. या शिल्लक अवशेषाचा उपयोग खालीलप्रमाणे होतो.
अ) कंद : पिल्लांपासून नवीन लागवडीसाठी बियाणे. मुख्य कंद गुरांसाठी खाद्य किंवा सरपण/ इंधन म्हणून उपयोग.
ब) खोड : वरील ८ ते १० पापुद्यांपासून धागा निर्मिती आतील पांढऱ्या गाभ्यापासून गोड किंवा खारट कँडी.
क) पाने: मध्यशिरेपासून धागा निर्मिती. पानापासून द्रोण, लहान डिश आणि पत्रावळी तयार करणेबाबत कृषी विज्ञान केंद्र पाल येथे प्रयत्न चालू नयेत.
ड ) घडांच दांडा : केळी घड काढल्यानंतर झाडावर शिल्लक राहिलेल्या दांड्यापासून धागा निर्मिती.
महाराष्ट्राचा विचार केल्यास केळीबाबत …
अ) आजची सद्य: स्थिती :
१) केळीचे खोडे निरुपयोगी म्हणून समजले जाते आणि हा जैवभार बहुतांशी जाळला जातो, फारच थोड्याप्रमाणत कंपोस्ट खतात रूपांतर केले जाते.
२) धागा निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात (७२,००० हेक्टर क्षेत्रावरील) कच्चामाल उपलब्ध आहे.
३) प्रत्येक गावात मोठ्या संख्येने बेरोजगार युवक आहेत.
ब) केळी धागा उद्योग : १) कमी गुंतवणूकीत हा स्वयंरोजगार सुरू करता येतो. धागा काढण्याच्या मशिनची किंमत रू. २२,००० / - असल्याने भांडवल गुंतवणूक कमी आहे. तसेच किंमतीवर महाराष्ट्रा शासनाच्या कृषी विभागार्फत २५% किंवा जास्तीत जास्त रू. ५००० / - पर्यंत अनुदान दिले जाते.
२) केली धागा काढण्याच्या मशिनवर एका दिवसात ८० ते १०० खोडापासून १५ ते २० किलो धागा निघतो.
३) एक मशिनवर केळी धागा निर्मिती उद्योगात दररोज तीन युवक / मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.
४) धागा काढत असताना खोडातील पाणी (सॅप) आणि चोथा शिल्लक राहतो.
पाण्यापासून नैसर्गिक रंग तयार करता येती किंवा या पाण्याला गाळून / फिल्टर करून पॉटॅश पुरवठ्यासाठी केळी बागेत उपयोग करता येतो.
चौथ्यापासून स्टार्च वेगळा करून स्टार्च उद्योग सुरू करता येईल. स्टार्च काढल्यानंतर राहिलेल्या शिल्लक मालापासून कंपोस्टखत / गांडूळ खत तयार करता येते.
क) केळी धागा निर्मितीमुळे संभाव्य परिणाम :
१) बेरोजगार युवकांन त्यांच्या गावातच स्वयंरोजगार उपलब्ध होईल.
२) केळी खोड / कच्चामाल गावातच उपलब्ध असल्याने टंचाई आणि वाहतूक खर्च या समस्या नाहीत.
३) शेतकऱ्याने धागा काढल्यास त्याला हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळून त्यापासून हेक्टरी रू. १५,००० / - ते रू. २०,००० / - पर्यंत निव्वळ नफा मिळेल.
४) केळी धाग्यापासून रोजच्या वापरातील वस्तू किंवा शोभेच्या वस्तू करून महिला बचत गटांना आर्थिक लाभ होईल.
५) केळी धाग्यापासून हातकागद बनविण्याचे उधोग महाराष्ट्रात केळी उत्पादक भागात उभारून रोजगार तसेच आर्थिक लाभ वाढविता येईल.
६) केळी धाग्यापासून हेदलूम / पावरलूमवर कापड / साडी करता येत असल्याने कापड निर्मिती हा स्वतंत्र उधोग उभारला जाऊ शकतो.
कालांतराने केळी धागा निर्मिती आणि त्यावर आधारित उधोग हा ग्रामीण भागातील एक रोजगार आणि उत्पन्न देणारा 'कुटिरोद्योग' होऊ शकतो. 'कचर्यापासून सोने निर्मिती' हे दृश्य स्वरूपात नजिकच्या भविष्यात शक्य आहे. अशाप्रकारे केळीच्या सर्व भागांचा विविध प्रकारे उपयोग शेतकऱ्यांना होत आहे आणि म्हणूनच केळी शेतकऱ्यांसाठी 'कल्पतरू' आहे.
केळी खोडापासून धागा काढण्याची मशीन :
'कृषी विज्ञान केंद्र राजमंद्री, आंध्रप्रदेश' यांनी विकसित केली असून या मशिनची निर्मिती 'आंध्रप्रदेश स्टेट अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कापॉरेशन लि. ' हे करतात. या मशिनची किंमत रू. २२,००० / - आहे. या मशिनद्वारे सुरवातीस रोज ८ ते १० किलो धागा आणि अनुभवाअंती १५ ते २० किलो धागा प्रतिदिनी निघतो. प्रति हेक्टरी ६५० ते ७५० किलो धागा मिळतो. सरासरी एक किलो धागा काढण्यासाठी रू १५ पर्यंत खर्च येतो. एका खोडापासून सरासरी २०० ग्रॅम धागा निघतो. म्हणजेच ५ खोडांपासून १ किलो धागा निघतो. खर्च वजा जात प्रति हेक्टरी रू. १५ ते २० हजार निव्वळ नफा मिळू शकतो.
धाग्याचा उपयोग : या धाग्याचा उपयोग बारीक दोरी, दोर, शोभेच्या वस्तू, पिशवी, हात कागद, क्रॉप्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, नोटांसाठी कागद, कापड, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेसेस, बुटांचे सोल इ. मध्ये केला जातो. धाग्याची लांबी ७५ सेमी ते १ मीटर पाहिजे.
धाग्याचा भाव :
१) पांढरा शुभ्र धागा : रू. ६ ०ते ८० प्रति किलो.
२) सिल्व्हर शाइन धागा : रू. ४० ते ६० प्रति किलो.
३) पिगमेंटयुक्त धागा : रू २५ ते ४० प्रति किलो.
केळी धागा काढण्यासाठी लागणारा प्रतिदिनी खर्च
एका दिवसात (८ तास) सरासरी १५ किलो धागा निघतो. महणजे प्रतिकिलो रू. १५ खर्च येतो. एका किलोचा सरासरी भाव रू. ४५ प्रति किलो मिळाल्यास रू. ३० निव्वळ नफा मिळतो. हेक्टरी ४३५० केळीची झाडे असतात, पैकी धागा निर्मितीसाठी ४००० झाडे उपलब्ध झाल्यास ७०० किलो धागा मिळेल. रू. ४५ प्रति किलो भावानुसार रू. ३१,५०० / - उत्पन्न मिळेल. प्रति किलो घाग्याचा खर्च रू. १५ प्रमाणे ७०० किलो धाग्याचा खर्च रू.१०,५०० येऊन रू. २१,००० / - निव्वळ नफा हेक्टरी राहतो.
केळी उत्पन्नाव्यतिरिक्त धागा निर्मितीमुळे शेतकऱ्यांना अधिक/ बोनस उत्पन्न मिळते. बऱ्याच वेळी नैसर्गिक आपत्ती, केळीची कमी भाव, केळी माल वेळेत बाजारपेठेमध्ये व गेल्याने होणारे नुकासन इत्यादी कारणामुळे शेतकऱ्याला फार मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत खोडापासून धागा काढल्यास आर्थिक नुकसान कमी करता येते. यंत्राद्वारे केळी खोडाव्यतिरिक्त केळी घडाचा दांडा, पानाची मध्यशिर, घायपात / केतकी इत्यादीचा धागा काढता येतो.
धागा काढण्याच्या यंत्राची तांत्रिक माहिती:
१) ह्या यंत्रास एक अश्वशक्ती, सिंगल फेज, २२० व्होल्टस विद्युत मोटार पासून शक्ती मिळते.
२) यंत्राची लोखंडी फ्रेम मजबूत असून त्यावर विद्युतमोटर, बेल्ट - पुली व त्यावर जाळीचा पिंजरा तसेच फिरत्या लोखंडी पट्ट्याचा ड्रम व त्यावर अर्धगोलाकार झाकण बसविलेले असल्याने हे यंत्र सुरक्षित आहे.
३) ड्रमवर आडव्या जाड पट्ट्या बसविलेल्या आहेत.
४) केळी खोडाच्या पट्ट्या यंत्रामध्ये जाण्यासाठी मार्गदर्शक रूळ बसविलेले आहेत. त्याआधी तांब्याच्या तारांचे दोन ब्रश धागा साफ करण्यासाठी आहेत.
संपर्क पत्ते :
यंत्र खरेदी : जनरल मॅनेजर, आंध्रप्रदेश स्टेट अॅग्रो
इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लि., अॅडव्होकेटस कॉलनी . ए. सी. गार्डस, हैद्राबाद - ५००००४
फोन नं - (०४०) २३३९४२३४
नैसर्गिक रंग निर्मिती : स्कूल ऑफ लाईप सायन्सेस
उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ, पोस्ट बॉक्स ८०, जळगाव - ४२५००१
फोन नं. (०२५७) २२५८४१७
केली धागा निर्मिती आणि गांडूळ खतप्रशिक्षण
प्रमुख शास्त्रज्ञम कृषी विज्ञान केंद्र, पाल ता. रावेर, जि. जळगाव - ४२५५०४
फोन नं. (०२५८४) २८८४३९ / २८८५२५
केळी धागा विक्री :
१) मे. नेशनल हँडमेड पेपर इंडस्ट्रीज इंडस्ट्रीयल एरिया,
रामसिंगपुरा, शिकेरपुर रोड, संगनीर, जयपूर ३०३९०२. (राजस्थान)
२) मे. जैन इंडस्ट्री, ६४५, गंगौरी बजार,
जयपूर - ३०२००२.(राजस्थान)
३) मे. सुरेशकुमार, इकासिल हँडमेड पेपर, १.१० - ११०६, ज्योती नगर, जि. करीमनगर.
४) सलिम पेपर प्रा. लि. , ई - १४२ / १४३, सितापुर इंडस्ट्रीअल एरिया, टॅक रोड, जयपूर - ३०२०२२
केळीचे पुढील नुकसान टाळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी
श्री. प्रतापसिंग बसंतराव साळुंखे, मु. पो. पथारी, ता. उत्तर सोलापूर, जी. सोलापूर, मोबा. ९८८१०६१२४५
२७ एप्रिल २००७ ला केळी लावली होती, परंतु आपलो माहिती नसल्याने जर्मीनेटर वापरू शकलो नाही. नंतर केशर माती प्रदर्शन, पंढरपूर येथे आपल्या स्टॉंलवर माहिती घेतले. आपले केळी पुस्तक विकत घेतले. ते वाचून आज आपल्याकडे आलो आहे. कारण लागवड केलेल्या १२५० रोपात ४५० रोपांची मर झाली आहे.
जर मला ही आपली माहिती केळी लावायच्या आधी मिळाली असती, तर माझे ४५० रोपांचे नुकसान टळले असते. येथून पुढे नुकसान होऊ नये, म्हणून आज सप्तामृत घेऊन जात आहे. माझे मित्रसुद्धा माझा प्लॉट बघून औषध घ्यायला येणार आहेत. कारण त्यांच्या प्लॉटला करप्यासारख रोग आला असून पुर्ण झाड जळत आहे. पुढील खोपेला आलो की, कल्पतरू सेंद्रिय खत १० बॅगा घेऊन जाणार आहे. कारण मला पुर्ण सेंद्रिय केळी करायची आहे.
पुणे महानगर पालिका कमिशनर प्रविणसिंग प्रतापसिंह परदेशी (मोबा. ९४२२६४८२०४) यांचेकडून मुनवे ग्रॅन्ड - ९ जातीचे घेतले. 'कृषी विज्ञान' मासिकामधील उल्लेखाप्रमाणे टिशुकल्चर रोपे न घेता मुनवे घेतले. त्यामुळे टिश्युकल्चर रोपांवर होणारा १५,००० रू. खर्च वाचला.

तपशिल | खर्च / दिनी (रू.) |
---|---|
१) केळी धागा मशिनवरील घसारा | १०.०० |
२) बागेतून खोड बाहेर काढणे व खोडाच्या ७.५ ते १० सेंमी रुंद पट्ट्या करणे आणि धागा काढणे ( रू. ५० x तीन मजूर) |
१५०.०० |
३) किरकोळ खर्च (मशिन वाहतूक, दुरुस्ती इ.) | ५०.०० |
४) विजेचा खर्च ( ६ युनिट x २.५ रू.) | १५.०० |
---------- | |
एकूण खर्च | २२५.०० |