उती संवर्धन पद्धतीने केळीची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कंदाच्या उतीपासून प्रयोगशाळेत स्वच्छता बाळगून कृत्रिम पोषण द्रव्यात संजीवकाच्या मदतीने या उतीचे संगोपन करून रोपे तयार करणे त्यास 'उती संवर्धन' असे म्हणतात.

सर्वसाधारणपणे केळी अभिवृद्धी ही कंदापासून होत असली तरी अलीकडच्या काळात उती संवर्धन केळीची लागवड वाढू लागली आहे. कारण मातृवृक्षापासून ३ ते ६ कंद मिळतात. आपणास पाहिजे त्या जातीचे कंद निर्माण करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. तेच उती संवर्धनातून पाहिजे त्या वाणाची निर्मिती कमी वेळात करता येते. उती संवर्धीत रोपे निर्मंत करण्यासठी मातृवृक्षाच्या चांगल्या गुणांचे निरीक्षण करून त्यापासूनचे कंद घ्यावे लागतात. यासाठी मातृवृक्षाच्या घडाची काढणी होऊ द्यावी लागते. त्यानंतरचा कंद काढावे लागत असल्याने थोडा वेळ जादा लागतो. यावर उपाय म्हणून मातृवृक्षाच्या घडाच्या निरिक्षणानंतर योग्य वाटल्यास घड निसवल्यावर केळफुल उतीसंवर्धनासाठी उपयोग करून कंदापेक्षा लवकर रोपे निर्मिती करता येते.

उती संवर्धनाचे फायदे :

१ ) नवीन झाडांची उत्पत्ती लवकर करता येतो.

२ ) सर्व गुणसंपन्न व लोकप्रिय वाणाचा झपाट्याने प्रसार होतो.

३) झाडांची रोपे कंद लागवडीपेक्षा लवकर स्थिरावून एकसारखी वाढ होते.

४) एकाच वेळी निसवल्यामुले कापणी एकदम करणे सोईचे जाते.

५) कंद लागवडीपेक्षा १ ते १॥ महिना लवकर कापणीस येतात.

६ ) वांझा झाडांचे प्रमाण कंद लागवडीपेक्षा कमी असते.

७ ) रोपे बुरशीजन्य, जीवाणूजन्या आणि विषाणूजन्य रोग तसेच सुत्रकृमी, कंद पोखरणारी अळी मुक्त असतात.

८) प्रयोगशाळा, हरीतगृह, शेडनेटमध्ये रोपे तयार होता असल्यामुळे नियमित निरीक्षणाखाली असतात. कंद लागवडीतील घडापेक्षा उती संवर्धित घडातील फण्यांची संख्या, फण्यातील केळांची सांख्य अधिक असते. त्यामुळे चांगले वजनदार घड मिळाल्याने एकूण उत्पादनात वाढ होते.

९) चांगल्या प्रतीची निर्यातक्षम केळी उत्पादित करता येते.

१०) काढणीस कमी कालावधी एकाच वेळेस काढणीस येत. असल्यामुळे प्रतवारी, पेकिंग, प्रक्रिया ही कामे करणे सोईचे जाते. शिवाय माल एक ठिकाणी एकदम पाठविणे शक्य होते.

११) ही केळी खोडव्यासही चांगली प्रतिसाद देते. त्यामुळे मुख्य पिकानंतर पुनर्लागवडीचा खर्च वाचतो.

१२) ठिबक सिंचन पद्धतीत उत्तम प्रतिसाद देते.

१३) काढणीची वेळ अगोदरच समजत असल्यामुळे बाजार भावाचा विचार करून फायदेशीर लागवडीची वेळ ठरविता येते.

उती संवर्धनाचे तोटे :

१) रोपे नाजूक असतात, लागवडीनंतर कडक सुर्यप्रकाशापासून, रोगापासून तसेच किडीपासून नुकसान होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते.

२) उती संवर्धित रोपे खुप असतात.

३) पाणी पुरवठ्याच्या बाबतीत फार संवेदनशिल असतात.

४) निश्चित वाणाची रोपे मिळतील या बद्दलची खात्री नसते.

५) रोपे एकाच वयाची असतील याबद्दल खात्री नसते.

६) शिफारस केलेल्या कालावधीसाठी रोपांना काठीणता आणण्याची शक्यता असते.

टिश्यू कल्चर केळीसाठी खालील शिफारसींचा अवलंब करावा:

१.५ मी. x १.५ मी. अंतरावर लागण करताना १ x १ x १ फूट असे खड्डे घेऊन त्यातील प्रत्येक खड्डा १ किलो शेणखत,५०० ग्रॅम निंबोळीची पेंड व ५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत मातीत मिसळून ३/ ४ (७५%) भरून घ्यावा

पॉलिबॅगमधील टिश्यू कल्चरने तयार झालेले रोप घेऊन त्यांची पॉलिबॅग काढून टाकावी. हे रोप भरलेल्या खड्डयाच्या मध्यभागी जर्मिनेटर वापर करून मातीसह लावावे आणि झाडाभोवती माती लावून ती दाबून घ्यावी.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर पुढीलप्रमाणे करावा : रोपे लावल्यानंतर जर्मिनेटर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमचे २०० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येक रोपावरून २५० ते ३०० मिली द्रावण मुळापर्यंत जाईल असे वाफश्यावर ओतावे.

रोप लावल्यानंतर १५ दिवसांची झाल्यावर प्रतिकुल हवामानाचा (ऊन, वारा, पाऊस, धुई-घुके) दुष्परिणाम होऊ नये म्हणून तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढून रोपांची वाढ होण्यासाठी.

१) पहिली फवारणी : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : लागवडीनंतर १ ते १ ॥ महिन्यांनी : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : लागवडीनंतर २ ॥ ते ३ महिन्यांनी (पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

पाणी देणे : पावसाळी हंगामात पाऊस वेळेवर व पुरेसा झाल्यास मृग बागेला पाणी देण्याची गरज भासत नाही, परंतु पाऊस वेळेवर न झाल्याने व कमी झाल्यास जरुरीनुसार हलके पाणी द्यावे. पावसाळयानंतर वाफ्यांची बांधणी करून हिवाळ्यात ८ - १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ४- ५ दिवसांनी जरुरीप्रमाणे जमीन खोल भिजेल रीतीने पाणी द्यावे.

आंतरमशागत : बागेची लागवड केल्यावर ३ ते ४ महिन्यात साधारण ३ ते ४ आठवड्यांनी कुळवणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. त्यानंतर वाफे बांधून घ्यावेत. दर दीड ते दोन महिन्यांनी हलकी चाळणी, फुळवणी करून घ्यावी. रोपे लावतेवेळी कल्पतरू दिले असल्याने उन्हाळ्यातही मुळांपाशी गारवा टिकून राहतो व रासायनिक बाष्प रोधक फवारण्याची गरज पडत नाही.

पारंपारिक व उती संवर्धनाशिवाय उत्कृष्ट केळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने

१ ) उती संवर्धनाची ही १० ते १२ रू. प्रमाणे घ्यावी लागतात. तथापि केळीचा मुनवे हे १॥ ते २ रू. ला मिळतात. त्याला जर जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटची प्रक्रिया केली तर उती संवर्धनापेक्षा सशक्त. जोमदार केळी तयार होते. या प्रक्रियेमुळे एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च वाचतो.

२) मुनवे लागवडीमुळे आणि सप्तामृताच वापर केल्याने झाडे प्रतिकूल परिस्थितीतदेखील जीमदार वाढतात.

३) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रोपे पाण्याचा ताण सहन करून शकतात.

४) सप्तामृत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे रोपे निरोगी, सशक्त राहून प्रतिकुल हवामानावर मात करतात.

५) कमल निघाल्यानंतर हवेतील उष्णता वाढल्यावर कमल मुळ खोडापासून मोडून पडते ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे होत नाही.

६) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे केळीचे घड लवकर तयार होऊन वजनदार मिळतात.

७) पारंपारिक पद्धतीपेक्षा १ ते १ ॥ महिना केळी मार्केटला लवकर आल्यामुळे मालाला तेजीचे दर मिळतात.

८) एकूण घडाचे वजन व दर्जामध्ये (आकार, गोडी, रंग, आकर्षणपणा, टिकाऊपणा) वाढ झाल्याने पारंपारिक पद्धतीने केलेल्या केळीपेक्षा भाव अधिक व एकूण उत्पन्न वाढल्यामुळे नफ्यामध्ये भरीव वाढ होते.

९) ही केळी रासायनिक किटकनाशक व रासायनिक खताशिवाय असल्यामुळे भाव जादा मिळतो.