लव्हाळ्याचा नायनाट असाही करता येतो

आम्ही लव्हाळ्यासाठी राजगीर फोकून पेरणीचा उपाय हमखास सिध्द केलाय. असाच एक सोपा उपाय अतिशय सोप्या प्रयोगातून साकार झालाय. जमीन साधारण 'डी ' किंवा 'जी' टाईपची म्हणजे (हलक्या ते मध्यम मगदुराची) पीक कोणतेही असो, त्याला जेव्हा सरीने पाणी दिले जाते तेव्हा भिजलेले क्षेत्र बारे देणारा व त्याचे मदतीला त्या वाक्यातील सऱ्यांवर आडव्या दिशेला म्हणजे सरी हाताचे दोन्ही बाजुला समांतर येईल असे बायांना बसवून वाहत्या पाण्यातील लव्हाळा आंगठा व शेजारील बोटाने सरळ मातीत (चिलखात) बोटे घालून उपसला तर मुळासकट उपटून एक-दोन नागरमोथेही त्याला लागूनच येतात. हा प्रयोग पिकाला पाणी देताना तर तेव्हापासून १० तासापर्यंत सहज यशस्वी होतो. २४ तासानंतर चिखल लव्हाळ्याच्या भोवती आवळला जातो व मग लव्हाळा कसाही उपसण्याचा प्रयत्न केला तर तो खुडतो. वयस्कर मजुरही या कामासाठी चालू शकतात.

एरवी प्रत्येक जण वाफश्यावर खुरपू शकतो. पण हा लव्हाळ्याचा नवीन प्रयोग म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिलेला एक नवा दिलासा आहे.


Related Articles