लेट्युस,लागवड लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लेट्युस,लागवड हा एक युरोपियन सलाडचा प्रकार फिक्कट हिरव्या रंगाचा कोबिसारखा परंतु गड्डा असतो. हा गड्डा घट्ट होऊ दिला जात नाही व त्या गड्ड्याच्या पोकळपणातच लेट्युस,लागवडची चव असते. हल्ली आपल्याकडे पाश्चिमात्य पदार्थ खायची आवड बळावत चालली आहे. शहरात रस्तोरस्ती मॅक्डोनाल्ड रेस्टॉंरंट, पिझ्झा हट, डोमिनोज पिझ्झा, फूट लँड ह्या व अनके प्रकराची पाश्चिमात्य पदार्थाची क्रेझ निर्माण करणारी हॉटेल्स, रेस्टॉंरंट व फूड चेन मक्याच्या सुपर शॉपीचे प्रमाण वाढत चालले आहे. ह्या अशा प्रकारच्या रेस्टॉंरंट, सुपर शॉपींमध्ये आपणांस बर्गर, पिझ्झा. या न त्या प्रकारचे अन्न पदार्थ बधावयास मिळतात. बर्गरमध्ये जे हिरवे पाने वापरलेले असते तेच हे लेट्युस,लागवड होय.

सुधारित जाती : लेट्युस,लागवडचा लांबट सुट्या पानांचा एक गट आणि गड्ड्याचा एका गट अशा दोन भागामध्ये विभागणी करता येईल.भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली यांनी 'ग्रेट लेक', इम्पीरिअल -८५९, स्लो बोल्ट, चायनीज यलो या जातींची शिफारस केली आहे.

आपल्याकडे लेट्युस,लागवड हा प्रकार तसा नवा नाही, फरक आहे तो नावात. पुण्यातील मंडईत किंवा शिवाजी मार्केटमध्ये 'सलाड' नावाने एक भाजीप्रकार विकला जातो. तो प्रकार म्हणजेच 'लीफी लेट्युस,लागवड ' (Leafy Lettuce) होय. वास्तविक पाहता, लेट्युस,लागवड ह्या भाजीमध्ये बरेच उपप्रकार आहेत ते खालीलप्रमाणे

१) क्रिस्पहेड (Crisphead) किंवा आईसबर्ग -(iceberg)

२) बटरहेड (Butterhead)

३)बिब टाईप (Bib Type) किंवा ग्रीन्स (Greens)

४) कॉस (Cos ) किंवा रोमेन (Romaine)

५) स्टेम लेट्युस,लागवड ( Steam Lettuce) किंवा सेलट्युस

६) मेसलन मिक्स ग्रीन्स (Meselun mix Greens)

१) क्रिस्पहेड किंवा आईसबर्ग लेट्युस,लागवड : सर्वांत जास्त प्रमाणात युरोपात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणी उत्पादीत होणारा प्रकार आहे.

क्रिस्पहेड किंवा आईसबर्ग लेट्युस,लागवड म्हणजेच जास्त घट्ट न झालेला गड्डा व ह्या गड्ड्यांच्या पानाची कडा कुरवाडल्यासारखी असते. पाने अतिशय कुरकुरीत गोड व रसाळ असतात. याची पाने अतिशय पातळ असतात. एकंदरीत लेट्यूसचा कोणताही प्रकार असो तो तोंडात टाकल्यावर त्याचा कुरकुरीतपणा जाणवतो. पाने रसाळ असल्यामुळे ती तोंडात कधी विरघळतात, हे कळतसुद्धा नाही.

ह्या प्रकारात समरटाईम, सॉलीनस किस्पीनो, नेव्हाडा, पेनलेक, ग्रेट लेक्स, टॉंप गन पॅट्रीयॉट इ. जाती येतात त्यातील काही जाती भारतात सुद्धा आढळतात. जिथे जिथे इंग्लिश भाजी घेतली तेथे तेथे 'आईसबर्ग' हा प्रकार घेतला जातो. भारतातील स्थानिक बाजारात ह्या प्रकारालाच जास्त मागणी आहे. हा प्रकार तास आपल्याकडे वर्षभर काही शेतकरीबांधव व खासगी कंपन्या घेत आहेत.परंतु हिवाळ्यात जी प्रत मिळते ती प्रत इतर हंगामात दिसून येत नाही.

२) बटरहेड लेट्युस,लागवड : आईसबर्ग लेट्युस,लागवडच्या खालोखाल ह्या प्रकारची लागवड केली जाते. भारतात हा प्रकार क्वचितच बघण्यास मिळतो.

ह्या प्रकारात सुद्धा गड्डा तयार होतो. परंतु ह्या प्रकारातील गड्ड्यांची पाने जाड, मऊ, कडा एकसारख्या असतात. ही पानेसुद्धा कुरकुरीत असून याची चव गोड असली, तरी ही पाने तोंडात चावल्यावर बटरसारखीच विरघळतात. म्हणूनच याला 'बटरहेड लेट्युस,लागवड' म्हणतात. ह्या गड्ड्यांच्या पानांची रचना गुलाबाच्या पाकळ्यांसारखी असते. ह्या प्रकारात हिरव्या व लाल तांबूस रंगाची पाने असे दोन उपप्रकार आहेत.

बटरहेड लेट्युस,लागवडच्या बॅलीस्टो, डीव्हीना, बटर किंग, टॅनिया, चिटस्प जेम, ऑव्हीमा, नैन्सी इ. जाती आहेत.

३) बीन टाईप किंवा ग्रीन्स : हा प्रकार फार लागवडीखाली नसून भारतात नसल्यातच जमा आहे. हा प्रकार म्हणजेच बटरहेड लेट्युस,लागवडचा कोवळा गड्डा. बटरहेड लेट्युस,लागवडचा कोवळा गड्डा तयार होत असतानाच त्यातला कोवळा गड्डा काढतात व त्याला 'बिन टाईप लेट्युस,लागवड' म्हणतात. ह्या प्रकारात बटरांचा चिटल जेम, सलाड बिन, डायमंड जेम, डियर टंग इ. जाती आहेत.

४) कॉस किंवा रोमेन टाईप : ह्या प्रकारात गड्डा तयार होत नाही परंतु इतर लेट्युस,लागवड प्रमाणेच ह्या प्रकारची सुरुवातीची वाढ असते. सुरुवातीस पाने गुलाबाच्या पाकळ्यांच्या आकारात वाढत राहतात. ही पाने चायनीज कोबीप्रमाणे लांब, उभट, रुंद व जाड असतात. जसजशी ही पाने पक्क होत जातात. तसतशी ती एकत्रितपणे जवळ येतात. ही पाने कुरकुरीत व रसाळ असतात. ह्या प्रकारात ग्रीन फॉरेस्ट कोअरसेअर, इरिग्रेस रेड, रोझालिटा इ. जाती आहेत.

५) स्टेम लेट्युस,लागवड : ह्याला सेलट्युस सुद्धा म्हणतात, ह्या प्रकारात जमिनीपासून व उभट स्टेम वाढते व त्याला दाटीने पाने लागतात. यालाच 'स्टेस लेट्युस,लागवड' म्हणतात. याचे प्रकार फारच तुरळक आहे.

६) मेसलन मिक्स ग्रीन्स : मेसलन म्हणजेच कोवळ्या नाजूक हिरव्या पानांचे मिश्रण होय. पानांची चव व त्यांच्या वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या छटा अशा एकत्रितपणे बाजारात पाठवून विक्री केली जाते. ही पाने पालकासारखी कापून दुसरी, तिसरी अशी कापणी करत राहतात.

वेगवेगळ्या प्रकारची सर्व लेट्युटस उदा. बटरहेड स्टेन लेट्युस,लागवड, किस ३ प्रकार व त्याचसोबत इन्दाईव्ह, मिझुना,मोहरीचे तुरे, पाचक खाण्यायोग्य शेवंती पार्सली, केल कार्ड, पिटची पाने आणि हर्ब किंवा औषधी वनस्पती ची पाने किंवा फुले. उदा. बासील बोरेज, चाईव्ह कोनलनेल इ. प्रकारची वेगवेगळी मिश्रणाची पाने तयार करून ही पाने सलाडसाठी मोठ्या आवडीने विदेशात खाल्ली जातात. यालाच 'मेसलीन ग्रीन्स ' असे म्हणतात.

हवामान: लेट्युस,लागवड हा थंड हवामानातील प्रकार आहे व आपल्याकडील थंड हवामानाच्या कालावधीत ऑक्टोबर ते फेब्रुवारी ह्या कालावधीत याची चांगली वाढ होतो. आपल्याकडील शेतकरी शक्यतोवर 'आईसबर्ग लेट्युस,लागवड'याचीच जास्त लागवड करतात. ह्या व्यतिरिक्त लीफ लेट्युस,लागवड हा प्रकार फार थोड्या प्रमाणात लागवडीखाली आहे. वरील हवामानाव्यतिरिक्त लागवड केल्यास त्या हवामानात चालेल अशी जात लावावी. बर्‍याचदा आपल्याकडे तापमान जास्त व आर्द्रता कमी असल्यामुळे सुद्धा गड्डा व्यवस्थित होत नाही. त्यावेळी बरेच शेतकरी व व्यापारी त्याचप्रकारच्या लेट्युस,लागवडला गड्डा तयार होण्याआधी किंवा तुरे येण्याआधी बाजारात विक्रीसाठी लीफी लेट्युस,लागवड म्हणून वापरतात. परंतु त्याला फक्त दिल्लीच्या बाजारात थोडीफार मागणी असते.

जमीन : भरपूर सेंद्रिय खत असलेल्या तसेच उत्तम निचरा असलेल्या काळ्या जमिनी ह्या पिकासाठी फारच सोयीच्या असतात. ज्या जमिनी घट्ट होतात, अशा जमिनीत गड्डा तयार होण्यास अडचण येते. भुसभुशीत, मोकळ्या जमिनीत लेट्युस,लागवडचा गड्डा चांगला व मोठा तयार होतो.

बियाणे : लेट्युस,लागवडचे बियाणे फारच बारीक व नाजूक असते. दिसायल साधारणपणे शेपूच्या बियाण्यासारखे असते. एका एकरासाठी १२० ते १५० ग्रॅम एवढे बी पुरते. बी फारच बारीक असल्याने गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत. बियाणे फार खोलवर पडणार नाही. याची दक्षता घ्यावी.

बीजप्रक्रिया : २५० मिली पाण्यामध्ये जर्मिनेटर २० मिली + प्रोटेक्टंट १० ग्रॅम घेऊन त्यामध्ये १०० ते १५० ग्रॅम बी भिजवून लावावे.

रोपवाटिका : लेट्युस,लागवडचे बी अतिशय लहान असल्यामुळे त्यास गाडी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी ओळीत पेरावे. गाडी वाफे तयार करताना नेहमीप्रमाणे ३ फूट रुंद व ५ ते ८ फूट लांब, १० ते १२ इंच उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर शेणखत कल्पतरू सेंद्रिय खत घालावे. बी जर्मिनेटर ची प्रक्रिया करून पातळ व जास्त खोलवर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. रोपांवर जर्मिनेटर, थ्राईवर,क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५ मिली आणि प्रोटेक्टंट २० ग्रॅमची १० लि. पाण्यातून ८ दिवसांच्या अंतरने २ वेळा फवारणी करावी, म्हणजे पाणी देताना पाणी जास्त होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रोपे साधारण २२ -२५ दिवसात लागवडीस तयार होतात.

लागवड : लेट्युस,लागवड ह्या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा ड्रिप इरिगेशन असल्यास गादी वाफ्यावर करता येते.

लागवडीसाठी दीड फूट रुंद सरी काढावी व लागवड सरीच्या एकाच बाजूने एक ते सव्वा फूट एवढ्या अंतरावर करावी.

लेट्युस,लागवड हे पीक लागवडीनंतर ६० - ७० दिवसांनी काढावयास तयार होते. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे खताच्या मात्र लागवड करतानाच द्याव्यात. लागवडीपासून ४० - ५० दिवसांत गड्डा धरायला सुरुवात होते. पुढे १५ -२० दिवसांत गड्डे काढावेत. गड्डा जास्त घट्ट होणार नाही. याची दक्षता घ्यावी. गड्डा घट्ट झाल्यास बाजारात भाव कमी मिळतो व गड्ड्यातील पानांची चव बिघडते.

भरखते आणि वरखत : एकरी १० ते १५ तन शेणखत, ७५ ते १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत २० ते ३० किलो नत्र, १० ते २० किलो स्फुरद आणि २० ते २५ किलो पोटॅश जमिनीच्या सुपीकतेनुसार देण्याची शिफारस करण्यात येते. संपूर्ण शेणखत जमिनीची पूर्वमशागत करताना द्यावे. संपूर्ण कल्पतरू खत स्फुरद व पोटॅश आणि निम्मे नत्र रोप लागवडीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. नत्राचा राहिलेला निम्मा हप्ता लागवडीनंतर सुमारे १ महिन्याने द्यावा.

आंतरमशागत आणि पाणी पुरवठा : या पिकाची मुळे उथळ असल्यामुळे तण काढून हलकी खुरपणी करावी. साधारणत : १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

रोग व किडी : या पिकावर स्लायमी सॉफ्ट रॉट, केवडा रोग आणि मोझेक या रोगांचा तर मावा या किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आढळून येतो.

स्लायमी सॉफ्ट रॉट रोगाच्या नियंत्रणासाठी गड्डा लवकर काढून घेऊन जमिनीत बेताचा ओलावा ठेवल्यास हा रोग आटोक्यात ठेवता येतो. केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण फवारावे. केवडा रोगास इम्पिरियल - १७ सारख्या रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी, तर मोझेक या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बियाणे वापरणे, हाच एकमेव उपाय आहे.

मावा या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम ते १ लीको किंवा मॅलेथिऑन ५० % ईसी ५०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

वरील रोग व किडींना प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच चांगल्या उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे नियमित फवारण्य कराव्यात.



१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २० ते २४ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३०० मिली. + क्रॉंपशाईनर ३०० मिली. + प्रोटेक्टंट १५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी ) : थ्राईवर ३०० मिली. + क्रॉंपशाईनर ३०० मिली.+ राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट २०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी) : थ्राईवर ३०० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + न्युट्राटोन ३०० मिली.+ हार्मोनी १५० मिली + १०० लि. पाणी.

काढणी : नुसत्या पानाच्या जातीची काढणी पाने पूर्ण वाढलेली पण कोवळी असतानाच करतात. काही शेतकरी संपूर्ण रोपाची काढणी करतात किंवा खुडून घेतात. कोबीच्या गड्ड्यासाराख्या जाती मात्र गड्डा पुर्ण झाल्यावरच काढतात. हाताळणी करताना बाहेरील पानाला इज होणार नाही याची काळजी घ्यावी.

बाजार व्यवस्थापन (मार्केटिंग ) : लेट्युस,लागवडला भारतातून परदेशी मागणी नसली तरी स्थानिक बाजारपेठेत पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगळूर, अहमदाबाद इ. ठिकाणी माल विकला जातो. तसेच फूड प्रोसेसिंग कंपन्यांना लेट्युस,लागवड लागतो. परंतु शेतकर्‍यांच्या दृष्टीने फूड प्रोसेसिंग कंपन्या फार काही फायदेशीर ठरलेल्या दिसून येत नाहीत, कारण त्यांचा ठराविक अॅग्रिकल्चर कंपन्यांशी असलेला करार व शेतकर्‍यांना द्यावयाचा भाव इतका कमी की शेतकर्‍यांस तो माल त्यांना द्यायला परवडत नाही.

स्थानिक बाजारात हवामानानुसार बाजारभाव बदलत असतात. साधारण मार्च ते ऑक्टोबर ह्या कालावधीत लेट्युस,लागवडचा भाव रू. ३० / - पासून रू. ५०/ - पर्यंत मिळतो. परंतु नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारी - मार्चपर्यंत हा भाव रू . २५/- पासून रू. १०/- प्रसंगी रू. ५/- प्रति किलो एवढा खाली येतो. मात्र डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ होऊन दर्जाही उत्तम प्रतिचा मिळाल्याने वाढीव बाजारभाव मिळून पीक परवडते.

हिवाळी हंगामात पीक चांगले व उत्पन्न जास्त तसेच उत्पन्नच्या प्रमाणात मागणी कमी त्यामुळे भाव थोडे खाली येतात. परंतु मार्च नंतर तापमान वाढत असल्यामुळे लागवडी कमी होतात व जी काही लागवड होते, ती थोडीफारच असते. त्यात मालाची प्रत फार चांगली नसते. परंतु मागणी असल्यामुळे बाजारभाव तेजीत असतात. आपल्याकडे उष्ण हवामानात तग घरतील अशा जाती उपलब्ध नसल्यामुळे जून ते ऑक्टोबर या महिन्यात देखील उत्पन्न व मालाची प्रत चांगली येत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर उत्पादन ७० ते ९०% पर्यंत यशस्वीरित्या घेता येऊन दर्जाही टिकविता येतो. तेव्हा या हंगामातही उत्पादन घेऊन जास्तीचे बाजारभाव मिळविता येतात.