लिंबू, मोसंबीसाठी प्रिझम
श्री. हेमंत मणिलाल संघवी,
मु. पो. वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव.
फोन नं.
(०२५९६) २८०२०२
मी लिंबाची २०० झाडे १९९७ मध्ये कलम करून १८' x १५' वर लागवड केलेली आहे. मागील वर्षी
बागेतील १६० झाडांना बहार आला होता आणि बाकी ४० झाडांना बहार आलाच नाही. मला डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजी नाशिक शाखेचे प्रतिनिधीनी 'प्रिझम' औषधाची फवारणी करण्यास सांगितले. मी
एका पंपास ६० मिली या प्रमाणात घेऊन औषध फवारणी केली व त्याचा फरक मला लगेच चौथ्या
दिवशी दिसून आल आणि अगोदर १६० फुटून राहिलेली ४० झाडेदेखील एकसारखी फुटलेली दिसून आली.
दुसऱ्यापेक्षा माझी बाग एकदम क्वॉलिटी बाज झाली आहे. दुसरी फवारणी परत प्रिझम औषधाची
संपुर्ण बागेला केलेली आहे. त्यामुळे संपुर्ण लिंबूचा बाग हा इतरांपेक्ष उठून दिसत
आहे. त्यामुळे कुणीही नवीन शेतकरी बागेत आल्यावर त्यांना झालेला बदल एकदम नजरेमध्ये
भरून आश्चर्यचकित होऊन मला ते विचारत राहतात की तुम्ही कोणते औषध फवारले. मी त्यांना
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'प्रिझम' हे बहार फुटण्यास एक उत्तम औषध आहे आणि या औषधाचा
वापर केला असे सांगितले. माझ्याकडे जुनी मोसंबीची काही झाडे आहेत. त्यावरही प्रिझम
फवारले. त्यालाही फायदा झाला.