२ नंबरचे लिंबू डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विशेष करून राईपनर वापरल्याने १ नंबर भावात विकले जाते
श्री. धनंजय दत्तात्रय ढवळे,
मु. पो. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर.
मोबा.
९४२३१६४१६४
गेली २ वर्षापासून आम्ही आमच्याकडे कागदी लिंबूच्या १५०० झाडांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे
राईपनरचा वापर करत आहे. आमच्याकडे १५ वर्षाची १५०० झाडांची लिंबोनी बाग आहे. जमीन मध्यम
प्रतीची असून लागवड २०' x २०' आणि १५' x १५' अशा दोन पद्धतीची आहे. दोन्ही बागेला डबल
लाईनचे ठिबक केले आहे. पुर्ण क्षेत्र विहीर बागायत आहे.
आम्ही या तंत्रज्ञानाने हस्त आणि आंबे भार धरतो. तसे लिंबू ३६५ दिवस चालते मात्र शिवाळ आणि उन्हाळामध्ये हवामान अनुकूल असल्याने उत्पादन चांगले मिळत नाही. पावसाळ्यातील उत्पादन हवामानाच्या अनुकूलतेने चांगले येते. मात्र या हंगामातील लिंबाला बाजारभाव कमी असतात. तेव्हा हस्त आणि आंबेबहाराचे प्रतिकुल हवामानात देखील दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पदान घेण्यासाठी गेली २ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या राईपनरचा वापर करीत आहे. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे लिंबू पोसत नाही. तेव्हा राईपनरचा वापर दर १५ दिवसाने केला असता लिंबाचा आकार वाढून चमक येते. तेच आंबेबहाराच्या बाबतीच अनुभवयास येते. आंबे बहरातील फळांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात चांगले बाजारभाव असतात. त्यानंतर कैरी मार्केटला येथे तेव्हा लिंबाचे भाव कमी होतात. म्हणून त्यापुर्वी लिंबू ओढून येण्यासाठी तसेच त्याची फुगवण होऊन फळाला चकाकी येण्यासाठी राईपनर १ लि. आणि १९:१९:१९ खत १ किलो २०० लि. पाण्यातून दर १५ दिवसांनी फवारतो. त्यामुळे फवारणी झाल्यावर सुपारीसारखे फळ १० ते १२ दिवसात तोडायला येते. इतर वेळी फवारणी न करता ते फळ पक्व व्हायला दीड ते दोन महिन्याचा काळ लागतो. तसेच दुसरा अनुभव असा आला की, यापुर्वी आमचे लिंबू हे नेहमी २ नंबर भावाने विकले जात होते. ते या २ वर्षात १ नंबर भावाने विकले जाते. पहिले जर इतरांचा ३५० रुपयाने डाग (१५ किलो) गेला तर आमचा ३०० ते ३१० रुपयाला जात असे. मात्र आता राईपनर वापरण्यास सुरुवात केल्यापासून गोणी मागे ४० ते ५० रुपये भाव वाढून मिळतो. आज (गुढी पाडव्याला) १५ किलोची गोणी १ हजार रुपये भावाने श्री. विलास जाधव, गुलटेकडी, पुणे यांच्याकडे विकला गेला. या अनुभवातून आज पुढील फवारणीसाठी राईपनर ६ लि. घेऊन जात आहे.