द्राक्षबाग निरोगी उत्कृष्ट फेब्रुवारीत काढणी

श्री. बाजीराव लालासो नाईक, (पोलीस पाटील),
मु. पो. मुडशिंगी (माले), ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
मो. ९१५८९१७०७०


माझ्याकडे सोनका अर्धा एकर आणि तास - ए - गणेश अर्धा एकर द्राक्षबाग आहे. चालूवर्षी डावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या बागा फेल गेल्या. मी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या हार्मोनीचे स्प्रे घेतल्यामुळे आमच्या बागेवर डावण्या आलाच नाही. हार्मोनीचे एकूण ३ वेळा स्प्रे घेतले. त्याचबरोबर जर्मिनेटर डिपींगमध्ये वापरल्याने सोनाकाच्या मण्यांनी २ इंचापर्यंत लांबी मिळाली. नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सप्तामृत औषधे कोल्हापूर येथील आपल्या कृषी विज्ञान केंद्रातून (फोन नं. ९३७२४८७८४४) घेऊन जातो. त्यांच्या फवारण्यामुळे अर्ध्या एकरातील जवळपास ६०० वेलींवर प्रत्येकी ३ ते ४ पेटी माल आहे. मण्यांची फुगवण चांगली मिळाली. याची काढणी फेब्रुवारी अखेरीस होईल. बागेतील सर्व घड व पाने पुर्णता निरोगी आहेत.