५ गुंठे मिरचीचे ६ हजार

श्री. शिवाजी माणिक ननावरे,
मु. पो. म्हसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मो. ९१५८१४१५५७


गेल्यावर्षी १५ फेब्रुवारीला ५ गुंठ्यामध्ये सितार मिरचीची लागवड केली होती. जमीन हलक्या प्रतीची असून ३' x २ वर लागवड होती. पाट पाणी देत असे. लागवडीनंतर पहिला तोडा झाल्यावर झाडांचा फुटवा, फुलकळी व माल कमी असल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची (प्रत्येकी ४० मिली + १५ लि. पाणी) फवारणी केली. त्याने फुटवा वाढला. फुलकळीही वाढली, नंतर २० दिवसांनी १५ लि. पाण्यास प्रत्येकी ३० मिलीप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे माल वाढला. तोडेही वाढले. मिरची लांब, एकसारखी, हिरवीगार मिळाली. त्यामुळे २ ० रू. किलो भाव मिळाला. या ५ गुंठ्यातून ६ हजार रू. मिळाले.

या अनुभवावरून चालू वर्षीच्या मिरचीस प्रिझम, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १०० मिली आणि प्रोटेक्टंट १०० ग्रॅम आज (२८ -१- ११) घेऊन जात आहे.