कलिंगडापासून ४ महिन्यात ५ लाख रू. नफा
श्री. जनार्दन जोमा जोशी,
मु.पो. पाली, ता. सुधागड, जि. रायगड,
मो. ९२७३५००२०९.
गेली ३ वर्षापासून कलिंगडाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. दरवर्षी २० एकर कलिंगड
करतो. पाटानगरा आणि गोल्डन विग्रो जातीचे बी लावतो. लागवड आळे पद्धतीने असते. ५ मीटरची
ओळ आणि २ - २ फुटावर आळे असते. आळ्याचा घेर १ फुटाचा असतो. पाणी पाटाने आळ्यात देतो.
सुरूवातीला १ महिन्याच्या काळावधी पर्यंत डब्याने वाहून पाणी देतो. नंतर पाटाने
देतो. जमीन मध्यम, खडकाळ प्रतीची आहे. वर्षातून एकच पीक घेतो.
लागवड नोव्हेंबरमध्ये करतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माल निघतो. लागवडीच्यावेळी बियाला जर्मिनेटरची प्रक्रिया केल्याने आठवड्यात उगवण होते. ९० - ९५ % उगवण होते. लागवडीपूर्वी शेणखत १ घमेले आणि १५:१५:१५ हे रासायनिक खत ५० ग्रॅम देतो. नंतर १५ दिवसांनी १५:१५:१५ पुन्हा ५० ग्रॅम आणि शेवटचा तिसरा डोस नंतर १ महिना झाल्यावर ५० ग्रॅमप्रमाणे देतो. ६० दिवसाचा प्लॉट झाल्यावर खते देणे बंद करतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या चार वेळा करतो. कृषी विज्ञानमध्ये दिल्याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने प्रमाणबद्ध वापर करतो. सुरूवातीस जर्मिनेटर, थाईवर, क्रॉंपशाईनरचे पहिले २ स्प्रे घेतो. त्यामुळे वेळांची वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. पुढील २ फवारण्या थाईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या करतो. त्यामुळे शेवटपर्यंत रोगराई येत नाही. वेळांची वाढ थंडीच्या काळातही जोमाने होते. त्यामुळे फळे पोसण्यासही मदत होते. एका आळ्यात ३ वेल लावतो. त्यातील २ वेल चांगले जोपासतो. प्रत्येक वेलावर १ - १ च फळ धरतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे फळांचा आकार, गोडी वाढते.
आम्ही वर्षातून एकदाच पीक घेतो. मच्छी तलाव, विटभट्टी रस्त्याची कामे असे इतर व्यवसाय असल्याने शेताकडे फारसे लक्ष देता येत नाही. महिना - पंधरावड्यातून एकदा चक्कर होते. पुर्वी एकरी ८ ते ९ टन उत्पादन निघायचे. आता १३ ते १४ टन ७ ते ८ किलो वजनाच्या फळांचे आणि दीड ते २ टन १० ते १२ किलो वजनाच्या फळांचे असे एकूण १५ टनापर्यंत उत्पादन मिळते.
वाशी येथे मालाची विक्री करतो. फळांना शायनिंग, गोडी, आकार चांगला मिळत असल्याने ७ ते ८ किलो वजनाच्या मालाला ६००० रू./टन भाव तर १० ते १२ किलो वजनाच्या मालाला ८००० रू./टन मिळतो. २० एकर क्षेत्रातील १२ एकरच उत्पन्न आम्हांला मिळते व शेती कसणाऱ्याला ८ एकरचे उत्पन्न देतो असे ठरविले आहे. त्यामुळे इतर व्यवसायातून शेतीकडे फारसे लक्ष न देताही खर्च वजा जाता गेली ३ वर्षापासून ५ लाख रू. उत्पन्न ४ महिन्यात आम्हांला मिळते.
आज (३ फेब्रुवारी २०११) चालू वर्षीच्या २० एकर कलिंगडासाठी सप्तामृत ५ - ५ लि. घेऊन जात आहे. ही लागवड डिसेंबर २०१० मधील आहे.