डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेल्या बेदाणा उत्पादकांच्या यशोगाथा !
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
बेदाणा तयार करण्याची पद्धत
द्राक्ष मण्यांमध्ये साधारण १२० ते १३५ दिवसांनी १८ ते १९ शुगर असणे जरुरी असते. बेदाणा तयार करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे,
१) रॅक हवेशीर व मोकळ्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. जवळपास ओलावा नसावा.
२) डिपींगसाठी मिश्रण - बेदाणा तयार करण्यासाठी १०० लिटर पाण्यासाठी २४०० ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट चांगले मिसळून घ्यावे. नंतर १८०० मिली डिपींग ऑईल घेऊन मिश्रण चांगले ढवळावे. त्यात २०० मिली क्रॉपशाईनर वापरावे. वरील डिपींग मिश्रणात ३ मिनीटे द्राक्षे घड बुडवावेत व नंतर रॅक वरती सुटसुटीत सुकण्यास टाकावेत.
३) सर्वसाधारण ९०० ते १००० किलो द्राक्षे १०० लिटर डिपींग द्रावणात बुडवावीत, हे मिश्रण पुन्हा वापरात आणू नये.
४) सुकविण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दृष्टीने तिसऱ्या दिवशी पहिली फवारणी म्हणजेच १०० लिटर पाण्यात १६०० ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट + १२०० मिली डिपींग ऑईल + १०० ग्रॅम क्रॉपशाईनर याची फवारणी घ्यावी, ही फवारणी दुपारच्या वेळेस घ्यावी.
५) बेदाणा काळा पडू नये म्हणून फवारणीचे मिश्रण १०० लिटर पाण्यासाठी ८०० ग्रॅम पोटॅशिअम कर्बोनेट + ६०० मिली डिपींग ऑईल + ५० मिली क्रॉपशाईनर अशी फवारणी घ्यावी. जेणे करून बेदाणा काळा पडण्याची प्रक्रिया होणार नाही. साधारण १३ ते १५ दिवसात माल वेचण्यास येतो. माल हळुवार रॅकमधुन काढून त्याची मळणी करून घ्यावी. त्यानंतर प्रतवार वेचणी करून घ्यावी व प्रतवारी नुसार बॉक्स पॅकिंग करून कोल्डस्टोअरेजमध्ये ठेऊन द्यावेत.