१० गुंठ्यातील उसाचे उत्पन्न २० टन ११० किलो
श्री. रंगराव यादव,
मु. पो. कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
मोबा. ९४२२४२८०७१
मी पुर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करीत होतो. त्यामुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत
नव्हते. घरी दुग्धव्यवसाय आणि दुचाकी गाड्यांचे गॅरेज सांभाळून शेती करताना शेतीकडे
काहीसे दुर्लक्षच होत असे. त्यामुळे शेतीतून फारसा फायदा होत नव्हता. म्हणून शेतीकडे
थोडा जड वेळ देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या शोधता होतो.
तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी विषयी माहिती मिळाली. या कंपनीचे कोल्हापूर प्रतिनिधी
श्री. केदार मोरे यांच्या सल्ल्याने १० गुंठे क्षेत्रावरती को - ८६०३२ या जातीच्या
उसाची लागण केली. याला लागणीच्यावेळी जर्मिनेटरची बेणेप्रक्रिया केल्याने कोंब जोमाने
फुटले. त्यानंतर जर्मिनेटरची ३ वेळा आळवणी व सप्तामृताच्या ४ फवारण्या आणि कल्पतरू
सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे फुटवा होऊन उसाचे पीक पुर्ण क्षेत्रामध्ये एक नंबर
होते. या उसाचे १० गुंठ्यामध्ये २० टन ११० किलो उत्पादन मिळाले. यापुर्वी एवढ्याच क्षेत्रात
जास्तीत जास्त १० ते १२ टनापर्यंत उत्पादन मिळाले होते. या अनुभवावरून खोडव्यालादेखील
हेच तंत्रज्ञान वापरत आहे.