डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कांदा पिकास वरदान !

श्री. गणपतराव माधवराव वाघ,
मु. पो. रानवड, ता. निफाड, जि. नाशिक



मी १० डिसेंबर २०१२ रोजी कांदा लागवड १ एकर केली, पण अनुभव खूप वेगळा आला. कारण मी माझ्या शेतात व शेजारच्या शेतात एकाच दिवशी लागवड सुरू केली होती. शेजारचे रोप ताजे लगेच लागवड होत होते. पण माझे रोप ६ दिवसाचे दुरून (परगावावरून) आणून लागवड करत होतो. शेजारचे कांदे प्लॉट लवकर माझ्या प्लॉटपेक्षा चांगला दिसत होता. माझ्या प्लॉटची वाढ, पत्ती, चमक कमीच होती. त्यावेळी मी पिंपळगाव बसवंत येथील बी. अे. अॅग्रो येथून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर घेऊन आलो व २०० लि. पाण्यासाठी प्रत्येकी १ लि. प्रमाणे फवारणी केली. आज माझा प्लॉट दोन महिन्याचा आहे. पण वरील फवारणीमुळे शेजारच्या प्लॉटपेक्षा वाढ अधिक वेगाने झाली. पत्ती जाड, रुंद झाली चमक जबरदस्त आली. करपा आलाच नाही व सर्वच बाबतीत माझा प्लॉट सरस आहे. करपा आलाच नाही व सर्वस बाबतीत माझा प्लॉट सरस आहे. ही किमया फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केली. माझ्या प्लॉटची फुगवण पण चांगली आहे. मी आता थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनची फवारणी करून अधिक उत्पन्न घेणार आहे. डॉ.बावसकर तंत्रज्ञान माझ्या कांदा पिकास खरोखर वरदान ठरली. मी मन: पुर्वक आभारी आहे.

याकरिता आम्हाला कंपनी प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.