संत्रा, मोसंबीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी गेलेल्या कपाशीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट भारी!

श्री. चंद्रभाव राजारामजी सुपारे,
मु. पो. खापा, ता. सावनेर, जि. नागपूर,
मोबा. ९३७१४१९३०६


'कृषी विज्ञान' मासिकाचा मी वर्गणीदार असून मासिकाचे नियमित वाचन करतो. माझ्याकडे ६ वर्षाची मोसंबीची ३५० झाडे १८' x १८' वर ४ एकरमध्ये आहेत. याला गेल्यावर्षी प्रथमच बहार लागला. मात्र माल खूप कमी मिळाला. ३५० झाडांपासून फक्त ५ टन माल निघाला, त्याचे ८६ हजार रू.झाले. म्हणून चालू वर्षी आंबिया बहारासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे आतापर्यंत २ स्प्रे घेतले आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत भरपूर मोहोर लागला आहे. मोहरीहून मोठी गुंडी लागली आहे. म्हणून आज (१७ फेब्रुवारी २०१४) स्वत: डॉ.बावसकर सरांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार मोसंबीचा या वर्षी पुर्ण बहार घ्यायचा आहे.

माझ्याकडे संत्रीची देखील १८० झाडे आहेत. ती ९ वर्षाची बाग आहे. त्याला आंबिया बहारासाठी रसायनिक खते युरिया ७५० ग्रॅम, सुपर फॉस्फेट ६०० ग्रॅम आणि पोटॅश ६०० ग्रॅम/झाड दिले आहे. याल मोसंबीच्या तुलनेत मोहोर अजिबात नाही. याला अद्याप डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले नाही. तेव्हा सरांनी सांगितले की, ' मोसंबीपेक्षा संत्र्याला बहार उशीरा निघतो. कारण संत्र्याचे झाड ही मोसंबीपेक्षा काटक असते. त्याला जोपर्यंत उष्णता मिळत नाही तोपर्यंत फूट निघत नाही आणि गेल्या २ महिन्यापासून थंडी खूपच असल्याने फूट निघण्यास वेळ लागत आहे. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तरी मोहोर निघण्यास उशीर लागतो. याला सर्वस्वी प्रतिकूल हवामानच जबाबदार असते. तेव्हा संत्रीसाठी सध्या प्रिझम १.५ लि. + जर्मिनेटर १.५ लि. + थ्राईवर २ लि. + क्रॉंपशाईनर २.५ लि. + प्रोटेक्टंट २ किलो + हार्मोनी ६०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + क्लोरोपायरीफॉस ५०० मिलीची २५० ते ३०० लि. पाण्यातून पानांच्या खालून व वरून दाट फवारणी करा म्हणजे बाग फुटेल.

मोसंबीला आता लागलेला मोहोर व गुंडी गळू नये आणि फळे भरपूर लागण्यासाठी तिसरी फवारणी प्रिझम १ लि. + थ्राईवर १.५ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + प्रोटेक्टंट २ किलो + हार्मोनी ६०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + क्लोरोपायरीफॉस ५०० मिलीची २५० लि. पाण्यातून घ्या आणि कल्पतरू प्रति झाडास २ किलो द्या तसेच खोडाला गेरू, मोरचुद, चुना आणि प्रोटेक्टंट प्रत्येकी ५०० ग्रॅम १० लि. पाण्यातून तागाच्या कुंच्याने पेस्ट लावा, असे सरांनी सांगितले.

मला गेल्यावर्षी कपाशीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा चांगला अनुभव आला. पोळ्यापर्यंत कपाशी अति पावसाने पूर्ण रोगट झाली होती. प्लॉट पूर्ण वाया गेला असतान त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे २ स्प्रे घेतले तर २ एकर १५ गुंठ्यातून २८ क्विंटल कापूस झाला होता. यावर्षी ५ एकर कपाशीवर या तंत्रज्ञानाचे २ च स्प्रे करता आले. वेळच्यावेळी वापर झाला नाही तरी एकरी १० क्विंटलचा उतारा मिळाला असून सध्या फरदड घेतली आहे. चालू कापसास ५०२५ रू./क्विंटल भाव मिळाला.

मागे चालू वांग्याच्या प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारले तर अगोदरच्या तोड्यापेक्षा फवारणीनंतर च्या तोड्याच्या वांग्याला एवढी चमक आली की, लोक विचारू लागले कोणती व्हरायटी आहे. तेव्हा अनियमित वापर होऊन देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगले रिझल्ट मिळाले आहेत. तेव्हा मोसंबीवर यावर्षी सरांच्या सल्ल्याने पूर्ण तंत्रज्ञान नियमित वापरून उत्पादन व दर्जात वाढ व्हावी हीच अपेक्षा !