आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
आदिवासी भागात शिक्षणाचा प्रसार कमी असल्याने आणि त्यांचा शहराशी संपर्क होण्याची साधने
कमी असल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. परंतु व्यवहारी ज्ञानात त्यांच्या - त्यांच्या
पातळीवर ते सक्षम असतात. त्यांचा शहरांशी संपर्क न आल्याने त्यांचे सामान्यज्ञान मात्र
कमी असते. त्यांना नवीन तंत्रज्ञान व उद्योगधंद्यातील माहिती नसते. रोजगार निर्मितीची
साधने नसल्याने उत्पन्नाचे स्त्रोत कमी असतात. त्यामुळे या भागात मुलांचे व मोठ्या
माणसांचे कुपोषण होते. तेव्हा भारत सरकारने निरनिराळ्या भागात योजना निर्माण केल्या
आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रक्रिया उद्योग, एका वर्षात अनेक पिके घेणे,
स्वत:च्या आरोग्यासाठी पिकांचे नियोजन करणे आणि हे आम्ही गेल्या ४ - ५ वर्षापासून
करीत आहोत. यासाठी N.G.O. च्या संचालिका वैशाली गवंडी ह्या मोलाचे कार्य करीत आहेत
. असेच एका प्रयोगासाठी खेड तालुक्यातील कुडे बु., पडरवाडी, बांगरवाडी, परसूल, दिघेवस्ती
या मावळ भागातील आदिवासी महिलांसाठी एक दिवसाचे ट्रेनिंग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे संशोधन
केंद्र, नांदे, ता. मुळशी येथे रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांना आधुनिक
तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये आदिवासी भागातील कुपोषण मुक्त व्हावे
यासाठी त्यांना 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीविषयी, 'आस्वाद' आळू, 'सुगंधा' कढीपत्ता,
'मल्हार' लिंबू, केशर व हापूस आंबा यांचा मोहोर धरणे व लागवडीविषयी माहिती तसेच मधुमेही
रोग्यांसाठी 'शबरी' जांभूळ याविषयी डॉ.बावसकर सरांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांना
प्रत्यक्ष शेतावर शिवारफेरीमध्ये विविध विषय सरांनी समजून सांगितले व त्यांच्या प्रश्नांना
उत्तरे दिली. हे पोषणाचे वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. या कार्यक्रमाची
विशेष दखल भारत सरकार घेत असते. या भागातील आदिवासींना सरांनी 'आदिवासी शेतकरी विकास
मंडळ' स्थापन करण्यास सांगितले. त्याविषयी प्राथमिक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची विविध पुस्तके, 'कृषी विज्ञान' मासिक सर्व प्रशिक्षणार्थीना
भेट देण्यात आले. दर महिन्याला 'कृषी विज्ञान' मासिक
तेथे भेट म्हणून पाठविण्यात येईल असे सांगितले.
तसेच या पुस्तकाचे सामुद्रायिक वाचन करावे. विविध प्रयोग
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सहाय्याने करावेत व या
प्रयोगाची पाहणी, निष्कर्ष विविध प्रयोगांना भेटी देवून त्याचा फायदा सर्व आदिवासी बांधवांनी
घ्यावा असे सरांनी सांगितले. प्रत्येक स्त्रिला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी मार्गदर्शिका
शाश्वत तंत्रज्ञाना समृद्धीसाठी व 'कृषीविज्ञान' फेब्रुवारी २०१५ चा अंक भेट देण्यात
आला. तसेच 'आस्वाद' आळू कंद, 'सिद्धीविनायक' शेवगा बियाणे, 'सुगंधा कढीपत्ता याचे
रोप आपल्या शेतात लावण्यासाठी विकत देण्यात आले. या कमी प्रकल्प अधिकारी वैशाली गवंडी
यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कार्याचे आवश्यकतेनुसार मार्गदर्शन घ्यावे.