अल्पभूधारक शेतकऱ्याचे वर्षभराचे आदर्श शेतीचे मॉडेल !
श्री. राम ज्ञानेश्वर थोरात,
मु.पो. वाळकी (तुकाई मंदिर), ता. दौंड, जि. पुणे
- ४१२२०७.
मो. ९४०४९५३८९६
गुलाब २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये जून २०१५ ला लावलेला आहे. गुलाबाची परिस्थिती पहाता रोपे
साधारण ४ फूट उंचीची आहेत. त्याचेवर थ्रिप्स, लालकोळी व इतर रोगाचा प्रादुर्भाव दिसत
आहे. त्यासाठी गुलाबाच्या फुलासह १।। फूट उंचीच्या काड्या सरांना दाखविण्यासाठी आणल्या
आहेत. ह्या काड्यांचे सरांनी बारकाईने निरीक्षण करून सांगितले की, काडीच्या खालच्या
वितभर भागातील पाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केल्यामुळे व्यवस्थित हिरवीगार
व न कोमेजलेली आहेत. मात्र वरील वितभर भागात पानांवर भुरी आहे. पानांवर तपकिरी डाग
आहे. डाऊनीचा अॅटॅक थोडा जाणवतोय. डाऊनीचा आकार बशीसारखा आहे. प्रत्येक पानाच्या बेचक्यात
उभा १ इंच x २ मी.मी. आकाराचा तपकिरी व्रण घासल्याप्रमाणे दिसत आहे आणि पाने बोकडलेली
(चुरडा - मुरडा) झालेली असून कडेला फाटलेली आहेत. गुलाब फुले काळसर पडलेली आहेत आणि
कळीची वाढ असमाधानकारक आहे. पाकळ्या ह्या चित्र विचित्र दिसत असून विस्कळित व निस्तेज
आहेत आणि या अशा दिसणाऱ्या सर्व काळ्या अमलत नाहीत अशी समस्या उद्भवते. तेव्हा आता
मी सांगतो त्याप्रमाणे फवारणी करा व त्यानंतर ४ थ्या दिवशी गुलाबाचे रोपाचे निरीक्षण
करा व ६ व्या दिवशी गुलाब पहा आणि ८ व्या दिवशी गुलाब घेऊन दाखविण्यास येणे.
सर, आज मी मार्केटला गुलाब गड्डी आणली आहे. परंतु उद्या (१४ फेब्रुवारी) व्हॅलेन्टाईन डे असून सुद्धा मनाजोगता बाजारभाव मिळाला नाही.
हिवाळ्यात थंडीचे प्रमाण पहाटेचे वेळेस जास्त असल्याकारणाने जर पिकावर फवारणी करायची असेल तर पिकाला कोवळ्या उन्हामध्ये केलेली फवारणी मानवते. सुर्यप्रकाश व पॉलीहाऊस मधील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने ही फवारणी सर्व प्रमाणात संयुक्तीक ठरते.
याकरिता पॉलीहाऊसमधील तापमान व्यवस्थित राखले गेले पाहिजे. होळी ते वैशाखापर्यंत उष्णता ३२ डी. ४२ डी. से. असते ते तापमान २० ते २५ डी. से. राखले जावे. यासाठी फॉगराची व्यवस्था केली जाते. वरील विकृती होण्यामागचे अजून एक कारण असे आहे की, गुलाबाच्या रोपांवर बेड जास्त कोरडा असल्याने तो ओला करण्याच्या उद्देशाने फॉगरने शॉवरिंग केले जाते. त्यात झाडे सुद्धा ओली होतात. त्याने अजून सूक्ष्म हवामान (आर्द्रता) वाढते. आर्द्रतेचे प्रमाण वाढून बेडवरील रोपाच्या पांढऱ्या मुळीला नुकसान पोहचते. फक्त बेडवर पुरेल एवढेच पाणी व्यवस्थितरित्या द्यावे. घाई करू नये. घाई केल्यामुळे मुळ्यांना दुखावले जाऊन केशाकर्षक पांढरी मुळी मुकी होण्याची शक्यता असते. त्या पांढऱ्या मुळीचे संरक्षण प्रथमत: यामध्ये महत्त्वाचे आहे. त्याकरिता रोपांच्या निरोगी वाढीसाठी जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + क्रॉपर ऑक्सीक्लोराईड १ लि. + १०० ते २०० लि. पाणी याप्रमाणे आळवणी करावी. तसेच कल्पतरू खत प्रत्येक झाडास खोडापाशी ठिबकजवळ १०० ग्रॅम द्यावे. द्यावे. नंतर पुन्हा दर पंधरा दिवसांनी प्रत्येक ड्रिपर जवळ ५० ग्रॅम २ वेळा देणे. जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १।। लि. + क्रॉपशाईनर २ लि. + राईपनर १ लि. + प्रिझम ७५० मिली + प्रोटेक्टंट-पी १।। किलो + हार्मोनी ६०० मिली + स्प्लेंडर ६०० मिली + २०० लि. पाणी ही फवारणी केल्यानंतर १० दिवसांनी नविन फांदी तपासण्यासाठी फुलासकट आणणे म्हणजे तुलनात्मक अभ्यास करून पुढील शिफारस करता येईल.
भेंडी - भेंडीला कल्पतरू १ काडेपेटी बुंध्याला टाकून मातीआड करणे आणि पंपाला सप्तामृत ५० मिली, स्प्लेंडर ३० मिली याप्रमाणे तीन फवारण्या घ्या, म्हणजे ३५ व्या दिवशी भेंडी मार्केटला येईल. ऐन लग्न सराईला भेंडीचे पैसे बक्कळ होतील.
वांगी- वांगी लागवड अर्धा एकर आहे आणि त्यातच आंतरपीक फ्लॉवरची लागवड केली आहे. मुळात इथे चूक अशी झाली आहे की, दोन्ही एकत्रित लावल्यामुळे फ्लॉवरने वांग्याला मारले. सरांनी सांगितले की, फ्लॉवर हे पीक थंडीमध्ये झपाट्याने वाढते आणि दुष्काळी परिस्थितीत मावा तुडतुड्यांना हवेत आर्द्रता नसल्याने आणि फ्लॉवरची पाने ही आर्द्रता साठवणारी असल्याने फ्लॉवर वर काळ्या माव्याचा खालून व टोकाला, देठंशी व शिरांवर अधिक प्रादुर्भाव होतो. फ्लॉवर थंडीने अधिक वाढला की, त्याचा वसवा वांग्यावर पडतो व त्या वांग्यावर ही मावा व थ्रिप्स हे अधिक प्रमाणात येतात. वांग्यावर कीड अधिक आल्याने वांग्याची पाने बोकडल्याचे जाणवते. त्यामुळे वांगी कमी निघतात व वांग्याला झालर कमी राहून देठाला वांगी वाडकी, फुगीर व टणक जाणवतात. तेव्हा वांग्याला कल्पतरू १०० ग्रॅम + कोंबड खत १०० ग्रॅम + निंबोळी पेंड १०० ग्रॅम बांगडी पद्धतीने ठिबक जवळ देणे.
फॉलीफ्लॉवर - फ्लॉवर बद्दल विचारले असता सरांनी सांगितले की, फ्लॉवर काढून टाकून फ्लॉवर चिरून गांडूळ खतावर टाकणे. प्रोटेक्टंट-पी पावडर गांडूळ खतावर टाकणे आणि जिवामृतचा सडा टाकणे, म्हणजे खात म्हणून उपयोग होईल. सरकारी खाते सांगते, नेते सांगतात, समाजशास्त्र सांगते की, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कंपन्या काढाव्यात. सरांनी सांगितले की समाजातील धनदांडगा वर्ग जो स्वत:ची एक कंपनी स्थापून समाजातील अल्पभूधारक आणि अडलेल्या नडलेल्या शेतकऱ्यांचे शोषण कसे करता येईल याचा विचार करून घडामोडी घडवतात. हा वर्ग सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असे भासवून ही गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. ही शेतकरी कंपनी अल्पभूधारकाच्या चांगल्या मालाला चांगले पैसे देऊ लागू नये म्हणून दुकानाद्वारे वेळेवर फवारणीची औषधे, खते देण्यास विलंब लावून मालाची काढणी, तोडणी रखडवून मालाची प्रत खालावण्यास हातभार लावतात. म्हणजेच शेतकऱ्याचा माल विकत घेताना शेतकऱ्याला अधिक पैसे द्यावे लागू नये, कमी पैशात अधिक प्रमाणात माल मिळवून तो माल अधिक भावाने लोकांना विकून नफा मिळविण्याचे तंत्र वापरतात.
शेतकरी कंपनीचे चतुर सभासद हे अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न असा करतात की, जो शेतकऱ्याने पिकविलेला माल असतो तो कमी पैशात जास्त कसा मिळेल या रितीने स्वत:चे हित जपत असतात. म्हणजे याचा अर्थ 'येरे माझ्या मागल्या आणि कणी भाकर चांगल्या' असे सरांनी सांगितले, तेव्हा या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आपण एक पशुवैद्यक आहात. तेव्हा आपली प्रेक्टीस संभाळून आपण बाजारपेठेचा अभ्यास करून महामार्गावरील दररोजच्या ये - जा करणाऱ्या लोकांचा (शिरवळ रोडचा) अभ्यास करून व त्यांची गरज पाहून त्यानुसार अनुकरण करावे, म्हणजे बाजार पेठेत आपल्या मालाला चांगली किंमत मिळेल.
कांदा पिकाविषयी सल्ला विचारला असता सरांनी सांगितले, ऐन पावसाळ्यामध्ये कांद्याची लागवड करू नये. १५ ऑगस्टच्या जवळपास लागवड करावी. साठवण करून पुढे भाव चांगला मिळतो. त्यामुळे दलाल, कंपनी ते टगे शेतकरी हे अल्पभुधारक शेतकऱ्याला फसवू शकत नाही. कांदा शक्यतो ठीबकाच्या पाण्यापेक्षा स्प्रिंकलरवर करा आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तीन फवारण्या करा आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तीन फवारण्या करा, म्हणजे कांदा ए-१ येईल. त्यानंतर एप्रिलच्या शेवटास म्हणजे मेच्या सुरुवातीस उन्हाळी कोथिंबीरीचे नियोजन करून त्याला ३ फवारण्या करून ३२ दिवसांत कोथिंबीर येईल. कोथिंबीरीच्या नंतर मेथीचे नियोजन केल्यास कोथिंबीरीसारखेच मेथीचे पैसे होतील.
सध्या मी शेवगा ओडिसी (३ महिन्यापुर्वी) लावलेला आहे. नुकतीच मी कारली, दोडका आणि काकडी तसेच २ महिन्यापुर्वी टोमॅटो आणि गॅलन वांगी लावलेली आहेत. ही सर्व पिके ४ एकरमध्ये वर्षभराचे नियोजन करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आधाराने यशस्वी करणार आहे.