प्रदर्शनातील भेट - पोहचवेल यशापर्यंत थेट

श्री. सागर अविनाश पवार,
मु.पो. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर - ४१४४०१.
मो.नं. ९९६०९१४६९६



मी अर्धा एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड केली होती. परंतु या प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे फवारली नव्हती. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करूनही मला अपेक्षीत उत्पादन मिळाले नाही.

त्यानंतर आम्ही नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला गेलो असता तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉलला भेट दिली व विविध पिकांची मासिके घेऊन तेथेच आम्ही मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. त्यामधील एका मासिकातील अंकातील कलिंगडाच्या अनुभवानुसार आम्ही ४ एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करून त्यावर सप्तामृत औषधांची सुरूवातीपासून नियमित फवारणी केली. त्यामुळे थंडीच्या दिवसातील लागवड असूनही भरपूर फुलधारणा होऊन मोठ्या साईजच्या कलिंगडाची दर्जेदार फळे मिळाली. जवळ - जवळ एकरी ४० टन उत्पादन मिळाले व माल वाशी मार्केटला नेला असता एक फळ ७ - ८ किलोचे असल्यामुळे १ नंबर भावाने विकले गेले. यासाठी कंपनी प्रतिनिधी शरद मुटकुळे यांचे मार्गदर्शन मिळाले. या अनुभवामुळे मी प्रत्येक पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरण्यास सुरुवात केली.