डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वापराने प्रतिकूल परिस्थितीत कपाशी निरोगी. दर्जा, उत्पन्न व दर अधिक चांगला
श्री. लक्ष्मण हरिभाऊ भुरले, मु.पो. साकळी, ता. हिंगणा, जि. नागपूर
माझ्याकडे एकूण १२ एकर शेती आहे. त्यामधील १० एकरमध्ये कपाशीचे पीक घेत असतो आणि बाकी
२ एकरमध्ये काकडी, टोमॅटो, कारली
अशी भाजीपाला पिके घेतो. २ वर्षापुर्वी मी कारली विक्रीस नागपूरला जात होतो तेव्हा नागपूर येथून डॉ.बावसकर
टेक्नॉलॉजी आणून वापरत होतो. तेव्हा उत्पादन चांगले मिळत होते. मात्र त्यानंतर वातावरण
बदलले. रोगराई वाढून आमच्या भागात कारली पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव एवढा वाहू लागला की अनेक परकराची
औषधे वापरूनही तो आटोक्यात येत नव्हता.
कारण आपल्या प्लॉटवरील जरी व्हायरस कमी झाला तरी इतरांच्या प्लॉटवरून त्याचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असे. त्यामुळे उत्पादन खर्च (फवारण्या) वाढत होत्या. त्यामुळे पुढे कारली वर्गीय पिके घेणे बंद केले. मग नागपूर मार्केटला जाणे बंद झाले आणि डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी त्यावेळी आमच्या भागात मिळत नव्हते. खास नागपूरवरून आणावी लागत असे.
गेल्यावर्षीपासून आमच्या भागात पार्थ अॅग्रो एजन्सी यांच्याकडे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची उत्पादने मिळू लागली. मग तेथून मी जर्मिनेटर वांगी आणि कारली लागवडीसाठी (बिजप्रक्रियेस) आणले. त्यानंतर जून महिन्यात कपाशी लागवड केली. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आमच्या भागातील प्रतिनिधी श्री. कुकडे यांची भेट झाली. मग आम्ही प्रथम त्यांना मार्गदर्शनासाठी वांगी, कारली व कपाशी पिके पाहण्यासाठी प्लॉटवर बोलाविले. त्यांनी कपाशीवर कॉटन थ्राईवर, मोनो क्रोटोफॉस, साप पावडर आणि १९:१९:१९ ची फवारणी करण्यास सांगितले. त्या फवारणीचा मला ६ - ७ दिवसातच फरक जाणवला. नंतर मग १५ ते १८ दिवसांनी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी व कपाशीची वाढ होण्यासाठी स्प्लेंडर ३० मिली + कॉटन थ्राईवर ४० मिली + जर्मिनेटर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली यांची (१५ लि. पंपातून) फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी केली असता. पांढरीमाशी आटोक्यात येऊन जुलै - ऑगस्टमध्ये कपाशीला ५० - ६० बोंडे लागली. मग त्यांनतर मी ३ री फवारणी कुकडे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार कॉटन थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + राईपनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिली या औषधांची (१५ लि. पंपातून) फवारणी केली. त्यामुळे सुरुवातीस लागलेली बोंडे पोसली, तसेच नवीन लागलेल्या पात्यांची, बोडांची गळ न होता त्यांचीही फुगवण झाली. अशा प्रकारे कापूस चांगला बहराला.
सप्टेंबर महिन्यात पहिली वेचणी केली. १५ बॅगा बी लावले होते. तर त्यातील कमी पावसामुळे काही (५ बॅगा) वाळून गेल्या होत्या. उरलेल्या कापसापासून एका बॅगेला ७ ते ८ क्विंटल चा उतारा मिळाला. पहिल्याच वेच्याला २५ क्विंटल कापूस निघाला होता. त्याला ५४०० ते ५५०० रु. क्विंटल भाव मिळाला. त्यानंतर वेचलेला कापूस घरी आहे. तो ५६ क्विंटल आहे. अजून शेवटच्या वेच्याचा निघणारा कापूस पाहता एकूण ९० - १०० क्विंटल कापूस होईल असे मला वाटते. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांमुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळला नाही. शिवाय उत्पादनात वाढ झाली व कापूसाचा दर्जा चांगला असल्याने भाव अधिक मिळाला.