अती पावसातही अधिक, दर्जेदार सोयाबीन व तूर उत्पादन

श्री. लक्ष्मणराव माणिकरावजी साखरकर,
मु.पो.बेलोरा, ता.चांदुर बाजार जि. अमरावती - ४४४८०९,
मो. ८८०६१७८८०५


आमच्याकडे एकूण १० एकर जमीन आहे. त्यात आम्ही मागील वर्षी २८ जून २०१६ ला सोयाबीन व तूर १० एकरामध्ये ट्रॅक्टरने पेरणी केली. पाऊस भरपूर झाल्याने जमिनीत ओल असल्याकारणाने बियाणे ३ ते ४ दिवसातच उगवूण आल्याचे दिसू लागले, मात्र उगवण झाल्यावर वरचे पावसाचे पाणी भरपूर झाल्याने लहान सोयाबीन व तूर पिवळी पडू लागली होती. औषधे आणण्याकरीता मी प्रगती कृषी केंद्रमध्ये गेलो. तेथे माझी भेट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधींशी झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यांनतर त्यांना प्लॉट दाखविला व त्यांनी मला जर्मिनेटर + हार्मोनी + न्युट्राटोन + प्रिझम ची पहिली फवारणी करण्यास सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशीच फवारणी केली आणि तुरीला जर्मिनेटर + प्रिझमचे ड्रेंचिंग केली. तेथून ३ ते ४ दिवसांनी फरक जाणवू लागला. तेव्हापासून त्यांच्या सल्ल्यानुसार या दोन्ही पिकांना फवारण्या घेत आहे.

फुले सुरू झाल्यावर पुन्हा प्रतिनिधींची भेट झाली व त्यांनी थ्राईवर + प्रिझम + जर्मिनेटर + प्रोफ्लेम ही औषधे फवारण्यास सांगितली. त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी स्प्रे केला व त्याचा फरक असा जाणवला की, फुले भरघोस लागली व फुलगळ न होता शेंगात (चलपात) रूपांतर होऊन शेंगा भरण्यास मदत झाली.

त्यानंतर चलपात रूपांतर झाल्यावर त्यांनी पाणी द्यायला सांगितले व त्यावर पुन्हा न्युट्राटोन + प्रिझम + प्रोफ्लेम ही औषधे फवारण्यास सांगितले. त्यानुसार फवारणी केल्यावर पिकावरील अळी कमी होऊन शेंगा भरण्यास केल्यावर पिकावरील अळी कमी होऊन शेंगा भरण्यास मदत झाली. आम्हाला सोयाबीनचा एकरी १० क्विंटल उतारा मिळाला. शिवाय यावर्षी खर्च सुद्धा कमी आला. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली चन्यालासुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे २ स्प्रे घेतले आहेत. चना घाटे भरण्याच्या तोंडावर आहे. खत काहीच न टाकता सुद्धा समाधानकारक पीक आहे. घाटे पोसण्यासाठी राईपनर + न्युट्राटोनच्या फवारण्या घेणार आहे. यावर्षी साहेबांच्या सांगण्यानुसार ३ एकर भुईमुगाला सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे. तुरीवर फक्त ३ स्प्रे घेतले आहेत. दरवर्षी आम्ही ५ स्प्रे घेत होतो पण यावर्षी ३ स्प्रेमध्ये तूर चांगल्याप्रकारे आली. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. मी अधिक माहितीकरीता 'कृषी विज्ञान' मासिक सुद्धा लावले आहे. त्यातून चांगली माहिती प्राप्त होत आहे. या सेवेकरिता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आभार मानतो.