कमी पाण्यावर २ एकर उसाचा उतारा ११० टन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने

श्री. साहेबराव विठ्ठलराव सुरोशे,
मु.पो. शिंदगी, ता.उमरखेड, जि.यवतमाळ - ४४५२०६,
मो. ९६२३३४४४२५


माझ्याकडे वडिलोपार्जीत ५ एकर जमीन आहे. त्यामध्ये मी २ एकर ऊस, २ एकर सोयाबीन व हरभरा आणि १ एकर कापूस घेतो. यावर्षी मी शेतामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करायचे ठरवले. कारण आमचे भाऊ पप्पु पाटील हे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा हळद, ऊस व इतर पिकांना वापर करतात. त्यांनी मला सांगितले साहेबराव पाटील तुम्ही पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करा. त्यासाठी त्यांनी मला आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी सतीश दवणे (मो. ९४२३६६२६५१) यांना भेटायला सांगितले आणि मी तेव्हापासून ऊस या पिकाला आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर केला. त्यावेळेस ५०० मिली जर्मिनेटर + २०० मिली हार्मोनी + क्विनॉलफॉस ३०० मिली ची बेणेप्रक्रिया केली. त्यामुळे माझ्या शेतातील ऊसाची १५ दिवसांत उगवण सुरू झाली, ती २५ दिवसापर्यंत पुर्ण उगवण एकसारखी दिसत होती. नंतर मी एकरी कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा एका महिन्यानंतर दिल्या. त्यासोबत डी.ए.पी. १ बॅग, युरिया २५ किलो, २५ किलो पोटॅश हे खत टाकले. त्यामुळे वाढ एकसारखी जोमदार व हिरवीगार दिसत होती. कल्पतरूमुळे उसाचे फुटवे जास्त प्रमाणात निघाले. गेल्यावर्षी पाऊस कमी असल्यामुले वेळेवर पाणी मिळत नव्हते. तर अशा परिस्थितीत सुद्धा ऊसाची वाढ चांगली झाली. तसेच मुळांचा जारवा वाढवून गारवा मिळाला. कमी प्रमाणात पाणी असून सुद्धा ओलावा टिकून राहत होता. आपल्या शेड्युलमधील मी फक्त २ सप्तामृताच्या फवारण्या घेतल्या. तरी मला कमी पाणी असून सुद्धा एकरी ५५ टन याप्रमाणे २ एकरात ११० टन ऊस झाला आहे. तसेच खोडव्यासाठीसुद्धा कल्पतरू खत आणि जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनीचा वापर चालू आहे.