१॥ एकर क्षेत्रावर विविध फळझाडे, भाजीपाल्याची यशस्वी लागवड!

श्री. तुकाराम जयराम जाधव,
मु. पो. नांदगाव, जि. नाशिक
मोबा. ९८२२८३१५३२/९३७१३८५५७१


आमच्याकडे जेमतेम दीड एकर जमीन आहे. त्यातील अर्ध्या एकरमध्ये कांदा, अर्ध्या एकरमध्ये फ्लॉवर आणि ५ गुंठ्यात लसूण ऑक्टोबर २०१० मध्ये लावला होता.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा प्रथमच वापर श्री. सय्यद (मोबा. ९४२२४०३६८६) यांच्या सल्ल्या नुसार फ्लॉवर पिकावर केला. फ्लॉवरला एकूण ३ फवारण्या सप्तामृताच्या केल्या. तेवढ्यावर फ्लॉवरची पाने गुडघ्याला लागत होती. पानांवर एकही डाग नव्हता, पाने हिरवीगार होती. त्यामुळे गड्ड्यांचे पोषणही चांगले झाले. एक - एक गड्डा ५ - ५ किलो वजनाचा होता. गड्डादेखील पांढराशुभ्र होता. १ महिनाभर दररोज काढणी करत. १५ गड्ड्याचे २० वक्क्ल (३०० गड्डे) माल निघत होता, मात्र बाजारभाव फार कमी होते. सुरुवातीला १५० रू. ला १५ गड्डे जात, नंतर ४ रू. ला १ गड्डा म्हणजे ६० रू. ला १ वक्कल (१५ गड्डे) जात होते.

कांदा लसूणाचे उपटून टाकण्याचे अवस्थेतील प्लॉटने भरघोस दिले उत्पादन !

फ्लॉवर, कांदा, लसूण एकाचवेळी लावलेला होता. फ्लॉवरला पहिल्या फवारणीने झालेला फायदा पाहून कांदा, लसणालाही सप्तामृत औषधे वापरली.

कांदा आणि लसूण दीड महिन्याचा असताना करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्याचे प्रमाण इवढे वाढले की, पुर्ण पाती करपून गेल्या. मुळ्यादेखील कमजोर झाल्या. थोडास धक्का जरी लागला तरी कानड कोलमडून जात होता. अशा पुर्ण पाती करपून गेल्या. मुळ्यादेखील कमजोर झाल्या. थोडासा धक्का जरी लागला तरी कांदा कोलमडून जात होता. अशा परिस्थितीत ही दोन्ही पिके काढून टाकणार होतो, मात्र फ्लॉवरचा रिझल्ट पाहून कांदा आणि लसणाला सप्तामृताचा प्रयोग केला. पहिली फवारणी केली असता करपा कमी होऊन पात हिरवी होऊ लागली. पांढऱ्या मुळ्यांची कार्यक्षमता वाढली. नंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी सप्तामृत औषधांची केली, तर पात पुर्णत: हिरवीगार होऊन गुडघ्याला लागायला लागली. पांढऱ्या मुळ्यांचा जारवा एवढा वाढला की, कांदा उपटल्यावर पांढऱ्याशुभ्र, सतेज मुळ्यांचा पुंजका दिसत होता. सर्वजण हे गेलेले प्लॉट एवढे जबरदस्त कसे झाले याने आश्चर्यचकित होत. आमचादेखील विश्वास बसत नव्हता.

नंतर तिसरी फवारणी कांदा, लसूण पोसण्याच्या अवस्थेत केली. त्यामुळे जमीन खारवट मिठाची असूनही कांदा, लसूण चांगला पोसला. ही जमीन खारवट असल्याने पाणी दिल्यानंतर मऊ पडते, मात्र पाण्याचा ताण बसला की माती आवळून जाते, कडक बनते. परिणामी कांदा, लसूण किंवा इतर जमिनीत वाढणारी पिके पोसत नाहीत. मात्र अशा जमिनीतून आम्हाला अर्ध्या एकरात ५० क्विंटल कांदा उत्पादन मिळाले. हे केवळ डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे. म्हणून आज ११ एप्रिल २०११ सरांना भेटण्यास खास पुण्याला आलो आहे. लसूण काढून गड्ड्या तारेवर टांगल्या आहेत.

आमच्या या दीड एकर क्षेत्रामध्ये पुर्वी द्राक्ष लावली होती. जमीन खारवट असतानाही अत्यंत चिकाटीने सुरुवातीस चांगल्याप्रकारे उत्पादन घेतले, मात्र नंतर रोगराई वाढल्याने द्राक्ष पीक परवडेनासे झाले. त्यामुळे २ वर्षापुर्वी द्राक्ष काढून द्राक्षाच्या मांडवावर दोडका, कारली अशी वेळवर्गीय पिके घेऊ लागलो. यातीलच १ एकरमध्ये ३२' x २२' वर २५ चिकूची झाडे १।। वर्षापूर्वी लावली आहेत. त्यातच भगवा डाळींब १ वर्षापुर्वी (जून २०१०) १६ ' x १०' वर लावलेल आहे. त्याची उंची ३ ते ३।। फूट आहे. आता त्यातील अर्ध्या एकरमध्ये कारले लावले आहे. वेल १ ते १।। फूट झाले आहेत. हे वेल पुढे मांडवावर सोडून खाली कोथिंबीर करणार आहे. कारली निघाल्यानंतर डाळींबाला ताण देऊन बरोबर आंबे बहार धरण्याचे नियोजन आहे.

एरवी खारवट जमिनीतील कोथिंबीर पिवळी जर्मिनेटरने मात्र उगवण १०० % होऊन कोथिंबीरीस काळोखी व चमक अधिक

धन्याला जर्मिनेटरचा अनुभव अतिशय चांगला आला. ४ किलो धना ४ लि. पाण्यात ५० मिली जर्मिनेटर घेऊन रात्रभर भिजत ठेवला होता. नंतर हा धना जमिनीत टाकला असता उगवण १००% होऊन कोथिंबीर सुरूवातीपासूनच हिरवीगार होती. एरवी या खारवट जमिनीतील कोथिंबीर सुरूवातीपासूनच पिवळी निघते. नंतर मग तिला काळोखी आणण्यासाठी युरिया देणे, अजून काही फवारण्या करणे असे उधोग चालू होतात. तरी पाहिजे तशी काळोखी येत नाही. सध्या ही कोथिंबीर १५ दिवसांची झाली आहे. पानांना काळोखी व चमक आहे.

या अनुभवावरून परत ८ किलो धना ३ दिवसापुर्वी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून टाकला आहे. कोथिंबीर उन्हाळ्यात आमच्या भागात तापमान अधिक असल्याने मरते, मात्र जर्मिनेटरमुळे यशस्वी होईल अशी खात्री झाली आहे. म्हणून धना टप्प्याटप्प्याने २ - २ गुंठे मांडवाच्या विरळ सावलीत करणार आहे.

जर्मिनेटरमुळे वांग्याचे एकही रोग मेले नाही

वांग्यालादेखील जर्मिनेटरचा चांगला अनुभव मिळाला. वांग्याची रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात (१० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर) बुडवून ८ ते १० गुंठ्यात लावली. तर एकही काडी (रोप) मेले नाही. नंतर सप्तामृताच्या दोन फवारण्या केल्या. तर वाढ, फूट चांगली झाली आहे. पाडव्याच्या दिवशी एक फळ दिसले ते काढले आणि देवापुढे ठेवले. शेतातच महादेवाचे मंदीर बांधले आहे.

१० फेब्रुवारीची लागवड आहे. २ फुट रुंदीची दक्षिणोत्तर सरी काढून २ - २ फुटवर सरीला रोप लावलेले आहे. प्रत्येक २ ओळीनंतर १ ओळी रिकामी सोडली आहे. त्यामुळे हवा खेळती राहते. तसेच आंतरमशागतीची कामे फवारणी, तोडणी करणे सोपे होते.

अशा रितीने दीड एकर क्षेत्रात चिकू, डाळींब, मांडवाच्या आधारावर दोडका, कारली व खाली मेथी, कोथिंबीर, पालक, अंबाडी अशी पिके घेतो. त्यामुळे सतत मार्केटला कोणता न कोणता माल चालूच असतो. आता वांगी चालू झाली आहेत. पुढील आठवड्यापासून कोथिंबीर काढणीस येईल.