काकडी व घेवड्याचे प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार उत्पादन !

श्री. गुलाब दगडू गोडांबे,
मु. मुगावडे, पो. पौड, ता. मुळशी, जि. पुणे.
मोबा. ९५४५४११७७९



डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर आम्ही ७ - ८ वर्षापासून घेवडा, काकडी, मेथी, भाजीपाला पिकांवर करत आहे. संभाजी काकडीच्या ६ पुड्याची अर्ध्या एकरात ४ x २ फुटावर लागवड केलेली आहे. २० फेब्रुवारीची लागवड आहे. जमीन भात खाचराची आहे. या काकडीला सप्तामृताची एक फवारणी फुलकळी लागताना केली. दीड महिन्यात पहिला तोडा केला. ५० किलोच्या ६ पिशव्या निघाल्या. १७० रू./१० किलोला पुणे मार्केटला भाव मिळाला. सप्तामृताच्या फवारणीने फुलगळ होत नाही. तसेच काकडी लवकर वाढते. त्यामुळे माल जास्त निघतो. त्याचबरोबर मालाला चमक येत असल्याने भाव अधिक मिळतो.

चौथ्या दिवशी दुसऱ्या तोड्याला ८ पिशवी काकडी

आज चौथ्या दिवशी दुसऱ्या तोड्याचा ८ पिशवी माल निघाला होता. आज राम जन्म (१२ एप्रिल २०११) असल्याने गिऱ्हाईक कमी आहे. त्यामुळे भाव खाली आलेत. १०० रू./१० किलोप्रमाणे विक्री झाली. आज दुसऱ्या फवारणीसाठी सप्तामृत घेवून जात आहे.

घेवडा २ किलो महाशिवरात्रीला लावला आहे. जांबळे बी काश्मिरी घेवडा आहे. सरीच्या दोन्ही बाजूस फुटाफुटावर लागवड आहे. या घेवड्याला सप्तामृताच्या दोन फवारण्या केल्या आहेत. ४५ दिवसात पहिला तोडा केला. दीड पोते (७५ - ८० किलो) माल निघाला. ३०० रू./१० किलो भावाने विकला.

मेलेला घेवडा दुरुस्त होऊन दर्जेदार उत्पादन !

आमचे मामा आमले गुरुजी २० - २५ वर्षापासून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरतात. त्यांच्या अनुभवावरून मी देखील ७ - ८ वर्षापासून ही औषधे वापरतो. सुरुवातीस या औषधाने मेलेला घेवडा दुरुस्त होऊन त्यापासून दर्जेदार उत्पादन घेतले होते. तेव्हापासून आमच्या गावात एवढी दुकाने असतानाही खास सप्तामृत औषधे नेण्यासाठी पुण्याला येतो.

८६०३२ चा सुरू ऊस मागील आठवड्यात तुटला आहे. तेव्हा आपल्या तंत्रज्ञानाने ५ किलो मेथी बियाचे पुंजके जर्मिनेटर ची बीज पक्रिया करून सरीवर लावणार आहे. उन्हाळ्यात मेथी मरते. तेव्हा उसाच्या थोड्याशा सावली व गारव्यात तसेच जर्मिनेटरमुळे मेथीची मर होणार नाही यासाठी हा प्रयोग आहे. याचप्रमाणे सरीवर सेव्हिल घेवडा देखील घेणार आहे. घेवड्याचे बाजारभाव पाहून तोडे चालू ठेवणार आहे. भाव चांगले आहेत तोपर्यंत तोडे चालू ठेवून नंतर बेवड म्हणून उसाची बांधणी करताना गाडून टाकणार आहे, असे नियोजन केले आहे.