१ एकरात १।। महिन्यात १० हजार कोथिंबीर गड्डी भाव २६०० ते २८०० रू./शेकडा निव्वळ नफा १।। लाख

श्री. सचिन बाबुराव पाटे,
मु. पो. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे,
मोबा. ९९६०५२७२०३



आंध्रगोल धना एक एकरमध्ये गेल्यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीस केला होता, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा प्रथमच वापर या कोथिंबीरीस केला. माझे ऑटोमोबाईलचे दुकान नारायणगाव येथे आहे. त्यामुळे तेथील (सावळेराम मार्केट, नारायणगाव) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी(अॅग्रो) प्रा. लि. येथून तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली, तसेच माझाही आधुनिक शेती करण्यावर भर असल्याने या तंत्रज्ञानाचा कोथिंबीरीस वापर केला. यापूर्वी पारंपारिक शेती केली जाता होती. भाऊ शेती पाहतो. मी दुकान सांभाळून शेतीस नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतो.

धना बी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून टाकले असता आठवड्यात १०० % उगवण झाली. जमीन मध्यम प्रतिची आहे. धना उगवेपर्यंत दररोज दिवसा पाणी देत होतो. नंतर १ - २ पानांवर कोथिंबीर आल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी, नियमित पहाटे किंवा रात्रीचे पाणी देते होतो. कोथिंबीर प्लॉट १२ दिवसांचा झाल्यावर (उगवणी नंतर ५ - ६ दिवसांनी) जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली. प्रति पंप याप्रमाणे फवारणी केली असता मर न होता कोथिंबीर उचलून आली. नंतर आठवड्याने पुन्हा जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ४० मिली/ पंपास घेऊन फवारणी केली. त्याने फुटवे वाढले. काडी जाड रसरशीत झाली. पाने रुंद होवून काडी झुपकेदार तयार झाली.

त्यानंतर शेवटची फवारणी कोथिंबीर काढणीस ४ - ५ दिवस अवधी असताना जर्मिनेटर ४० मिली, थ्राईवर ३० मिली आणि क्रॉंपशाईनर ५० मिली प्रतिपंपास घेऊन फवारणी केली असता ऐन उन्हाळ्या तही पानांना काळोखी व चमक होती.

काढणीनंतर मार्केटला आलेली कोथिंबीर काही तासात सुकत होती, मात्र आपली कोथिंबीर टवटवीत, सतेज असायची. त्यामुळे नारायणगाव मार्केटला सर्वात जादा २६०० ते २८०० रू. पर्यंत शेकडा भाव मिळाला. काडी पालेदार फुटव्यांची असल्याने एकरात १० हजाराच्या जवळपास गड्डी निघाली. दीड महिन्याच्या आत या कोथिंबीरीपासून १ लाख ६५ हजार रू. चे उत्पन्न मिळाले. याला एकूण १५ हजार रू. पर्यंत खर्च आला.