आंब्याची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



आंबा फळाची मधुरता आणि उपयुक्तता यामुळे आंब्याला 'फळांचा राजा' असे म्हणतात. आंबा पिकाखाली देशातील एकूण फळझाडांखालील क्षेत्राच्या ४२% क्षेत्र असून त्यापासून ९० लाख टन इतके उत्पादन मिळते. अती थंडी असणारे काही प्रदेश सोडल्यास जवळपास सर्वच राज्यांत आंब्याची लागवड आढळून येते. आंबा लागवडीचे सर्वांत जास्त क्षेत्र उत्तर प्रदेशात असून उत्पादकतेच्या बाबतीत आंध्र प्रदेशाचा प्रथम क्रमांक लागतो. भारतातून होणाऱ्या एकूण फळांच्या आणि फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत आंब्याचा वाटा ६०% इतका आहे. आंब्यापासून विविध पदार्थ बनविता येतात . देशात आंबा आणि त्यापासूनच्या पदार्थ निर्यातीला भरपूर वाव आहे.

पुर्वी 'आज आंबा लावतो व नातू फळे खातो' अशी एक म्हण होती. त्यामुळे १० वर्षांनी मिळणाऱ्या फळांसाठी लागवड करायला शेतकरी उत्सुक नसे, पण काळ बदलला. बदलत्या काळाबरोबर कमी वेळात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून दर्जेदार फळे देणाऱ्या जाती निर्माण झाल्या. दिवसेंदिवस वाढलेल्या प्रसारामुळे व परदेशातील वाढत्या मागणीमुळे आंब्याचे महत्त्व सतत वाढते आहे.

महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्ह्यांत आंब्याची लागवड होते. कोकण विभागात सर्वांत जास्त क्षेत्र लागवडीखाली असून त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. संपूर्ण देशाचा विचार केल्यास महाराष्ट्रातील आंब्याचा हंगाम उत्तम आणि दक्षिण भारतातील हंगामाच्या मध्यात येतो, त्यामुळे अधिक फायदा मिळू शकतो.

औषधी उपयोग : पक्व कैरी पाड लागण्याअगोदर आंबट असताना त्रिदोष व रक्तविकारनाशक असते. लहान कैरी मलभेदक व कफवातनाशक असते. पिकलेला आंबा बलवर्धक, स्निग्ध व सुखदायक जड वात - विनाशक हृदय वर्ण प्रसादकर, थंड असून पित्तकारक नाही. दुधाबरोबर खाल्लेला आंबा वातपित्तनाशक, रूचिकारक, पृष्टीदायक, बलकारक, विर्यवर्धक, स्वादिष्ट व थंड आहे.आंब्याची कोय वान्ती, अतिसार व हृदयदहानाशक आहे. आंब्याची पाने कफपित्तानाशक आहेत. थोडक्यात आंब्याचा मानवी आरोग्यास फार मोठा हातभार लागतो.

आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी हापूस, पायरी, दशेरी, लंगडा, केशर, सुवर्णरेखा, नीलम, तोतापुरी, गोवा माणकूर, हिमसागर, बनेशान, ओलूर या पारंपारिक जाती आहेत. अलीकडे तयार झालेल्या काही संकरीत जाती या किफायतशीर आहेत. नीलम व हापूसच्या संकरातून तयार झालेली 'रत्ना ' तर दशेरी व निलमपासून संकरीत केलेल्या 'आम्रपाली' व 'मल्लिका' या दोन जाती प्रसिद्धीस आल्या आहेत. पातळ कोय असलेली 'सिंधू' ही जात कोकणात प्रसिद्ध आहे. प्रत्येक जातीत जसे चांगले गुण आहेत तसे दोषही आहेत. हापूससारख्या नामवंत जातीतही दोष आहेत. दरवर्षी नियमित फळे न देणे किंवा फळ पिकल्यावर त्यात पांढरा साका तयार होणे हे प्रमुख दोष आहेत. हे दोष कमी करता येतात किंवा पुर्णपणे काढूनही टाकता येतात. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांची फवारणी करून साक्यावर मात करता येते.

जमीन व हवामान : आंब्याची मुळे फारशी चोखंदळ नसतात. हलकी, भारी तसेच बरड जमिनही त्यास चालते. मात्र मुले खोलवर जायला संधी मिळाली पाहिजे. मुळाभोवती हवा खेळती राहिली पाहिजे, तसेच वाढीसाठी लागणारी मुलद्रव्येही मिळाली पाहिजेत. तेव्हा पाणी साठून राहणारी, क्षाराची अगदीच खडकाळ जमीनही चालणार नाही. जमिनीची योग्य सुधारणा करून जास्तीती जास्त सेंद्रिय खते घालून मुळांना वाढीसाठी हवी तशी संधी निर्माण केल्यास ते उपयुक्त ठरेल. चुनखडीचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनी मात्र नकोत.

आंबा मूळचा उष्ण - दमट हवामानातला. त्यामुळे हे हवामानच आंब्याला अधिक मानवते. इतर हवामानातही आंब्याची वाढ होते. मात्र कडाक्याची थंडी, कोरडे हवामान मानवत नाही. बराच काळ थंडी व कोरडे हवामान राहिले तर फळधारणेची क्षमता राहत नाही. उन्हाळ्यात ४८ डी. सेल्सिअस तापमानातही आंबा वाढतो. पण समुद्रसपाटीपेक्षा १४०० मीटरपेक्षा उंची त्याला सहन होत नाही. मोहोर येण्याच्या काळात व कळवाढीच्या काळात वरचेवर पाऊस असावा. पाऊस नसेल तर पाणी द्यायला हवे. मोहोर येण्याचा आणि फळांचा काळ डिसेंबर ते जूनपर्यंत असतो.

महत्त्वाची बाब म्हणजे उपलब्ध परिस्थितीस जुळवून घेणारी जात निवडायला हवी.

लागवडीचे नियोजन : लागवड कधी करायची ? अशी चर्चा करण्यापेक्षा ती लवकरात लवकर करावी. वर्षभरात पावसाळ्यापुर्वी किंवा एखादा पाऊस पडताच लागवड करणे सर्वात चांगले.
अ) लागवड किती करावी ? पुरेशा संख्येने आणि योग्य पद्धतीने लागवड केली तरच ती आंबराई किफायतशीर होईल. किमान एक एकर लागवड केली तरच तिची पुढची व्यवस्था निटनेटकी करणे सुलभ होते. ब) लागवड कोणत्या पद्धतीने करावी ? जुनमध्ये लागवड करायची म्हणजे मे महिन्यात लागवडीची पूर्वतयारी व कलमांची बेगमी पूर्ण व्हायला हवी. जूनमध्ये ताज्या कोया कापून रोप करायला उशीर होतो. तेव्हा गावठी रोप जूनमध्ये लावून त्यावर कलमे करणे सोयीचे ठरते.

आंब्याच्या जाती :

१) हापूस : उत्तम स्वाद आणि मधुर चव असल्याने हा आंबा सर्वोत्कृष्ट आहे. फळ पिकल्यानंतर आकर्षक तांबूस पिवळा रंग येतो. फळ घट्ट असून शेंदरी रंगाचे रेषाविरहीत असते. फळ पिकल्यानंतर १० ते १२ दिवस टिकून राहते. त्यामुळे निर्यातीसाठी परदेशात पाठविता येतात. या जातीच्या आंब्याचे उपपदार्थ तयार करून हवाबंद शितगृहात साठविल्यानंतरही स्वाद आणि घनता मुळच्या प्रमाणात टिकून राहते.

२) केसर : हापूसपेक्षा ३ ते ४ पटीने जास्त उत्पादन देणारी जात असल्याने या जातीचे लागवडी खालील क्षेत्र देशभर वाढू लागले आहे. फळांना स्वाद उत्तम आणि चवीला गोड असतात. फळ पिकल्यानंतर ५ ते ६ दिवस टिकते.

३) पायरी : हापूस आंब्यापेक्षा जास्त उत्पादन देणारी जात आहे. फळे मध्यम आकाराची, आकर्षक लाल रंगाची असतात. फळे रसाळ असून गोड असतात. मात्र पिकल्यानंतर ती जास्त काळ टिकत नाहीत.

४) निलम : दक्षिण भारतातील ही प्रमुख जात असून फळे पिवळसर केसरी रंगाची, आकाराने अंडाकृती, टिकाऊ, साधारण प्रतीची असतात. फळे उशीरा तयार होत असून भरपूर व नियमित मिळतात. दिर्घकाळ मोहोर येत असल्यास झाडावर लहान मोठी फळे असतात.

५) तोतापुरी : कर्नाटकातील प्रमुख जात असून हिला 'बंगलोरा' या नावानेही ओळखतात. फळे दोन्ही टोकास निमुळती बाकदार असतात. रंग हिरवट, पिवळसर आणि त्यावर चमकदार तांबुस पट्टे असतात. फळ साधारण प्रतीचे असले तरी टिकाऊ असते. भरपूर आणि नियमित उत्पादन मिळत असल्याने फळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठविता येतात त्यामुळे व्यापारी दृष्ट्या प्रचलित जात आहे.

६) दशेरी : उत्तर भारतात लागवडीखाली असलेली जात वैशिष्ट्यपुर्ण व अत्यंत मधुर चवीमुळे प्रसिद्ध आहे. उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्रात फळे लवकर तयार होतात. फळ मध्यम आकाराचे, लांबट, शेंदरी, पिवळ्या रंगाचे असून स्वाद व चव उत्तम असते. रेषाविरहीत गर असल्याने फळ कापून खाण्यासाठी शीतगृहात साठविण्यासाठी तसेच फोडी करून हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी उत्तम आहे. मोहोरातील पर्णगुच्छ ही विकृती या जातीमध्ये जास्त आढळते.

७) लंगडा : उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर ह्या जातीची लागवड केली जाते. तसेच ही जात विविध प्रदेशांत वाढू शकते. फळे हिरवट, मध्यम आकाराची, लांबटगोल असतात. गर गोड असून कोय लहान असते. साल पातळ असल्यामुळे फळे पिकल्यानंतर फार काळ टिकत नाहीत.
संकरित जाती :

१) मल्लिका : भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी नीलम (मादी) आणि दशेरी (नर) यांच्या संकरापासून निर्माण केलेली जात असून फळे मध्यम आकाराची, ठेंगणी असून फळे दरवर्षी येतात.

२) आम्रपाली : ही देखील जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी दशेरी (मादी) आणि निलम (नर) यांच्या संकरापासून निर्माण केली असून फळे उत्तम चवीची स्वादिष्ट, रेषाविरहीत असतात. फळे दरवर्षी पण थोडी उशीरा तयार होतात. झाडे आकाराने लहान असल्याने एकरी झाडांची संख्या अधिक बसत असून झाडांना पाण्याची गरज असते.

३) रत्ना : कोकण कृषी विद्यापीठाने नीलम (नर) आणि हापूस (मादी) यांच्या संकरातून तयार केलेली जात असून फळे दरवर्षी येतात. १९८४ साली प्रसारित करण्यात आली असून या जातीची फळे हापूसपेक्षा मोठी असून घट्ट आणि रेषाविरहीत असतात. फळांचा स्वाद आणि चव साधारण हापूस सारखीच आहे. फळे पिकल्यानंतर ८ दिवस चांगली टिकतात. फळांमध्ये साका होत नाही.

४) सिंधू : कोकण कृषी विद्यापीठाने १९९२ साली रत्ना (मादी) आणि हापूस (नर) यांच्या संकरातून ही जात प्रसारित केली आहे. या जातीच्या फळांचा रंग आणि स्वाद आकर्षक असून दरवर्षी फळे मिळतात. फळे रेषाविरहीत असतात. या जातीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे फळांमधील कोय ही अतिशय पातळ असून कोय आणि गर यांचे प्रमाण १:२६ एवढे आहे. फळांमध्ये साका होत नाही. फळे नियमित येत असून फळातील गार मधूर असतो.
लागवडीसाठी कोणते आंबे जमीन आणि हवामानाला योग्य आहेत त्याचा विचार करूनच जातीची निवड करावी. व्यापारीदृष्ट्या लागवड करताना उगीच अनेक जातींची खिचडी टाळावी. व्यापारीदृष्ट्या फळांना चांगली मागणी असणारी व जास्तीत जास्त उत्पादन देणारी जात निवडावी.

लोणच्यासाठी निवडक जातीची आंबराई करायला हरकत नाही किंवा निम्मी आंबराई हापूस - केशरपैकी एक जात व निम्मी लोणच्याच्या आंब्याची असेही नियोजन करायला हरकत नाही. एकदा क्षेत्र व जातीची विभागणी ठरली की त्यात शक्यतो बदल करू नये. ही आंबराई अनेक वर्षे टिकणार आहे. हे ध्यानात ठेवून लागवड करावी.

लागवडीचे अंतर : पारंपारिक पद्धतीने ३३ x ३३ फूट अंतरावर लागवड केल्याने अधिक जमीन अडकून राहून झाडांची एकरी संख्याही कमी बसते. सुरवातीची अनेक वर्षे विस्तार कमी म्हणून उत्पादन कमी, नंतर झाडे वाळली किंवा रोगकीडीने व्यापली तर उत्पादन कमी येते. शिवाय अधिक अंतरावरील झाडे १५ -२० वर्षांनी विस्तारीत व उंच होतात, त्यामुळे मोहोराचे रक्षण करणे व फळे उतरवणे अवघड होते. यासाठी उत्तम उपाय म्हणजे एकरी जास्त झाडे बसवून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते. जमीन (पोत, प्रत, खोली, उतार) आणि निवडलेली जात यांचा विचार करूनच अंतर ठरवावे. सर्वसाधारणपणे १५ x १५ किंवा २० x २० फूट हे अंतर योग्य ठरते. जवळ जवळ येणाऱ्या फांद्या कापून टाकल्व्यात. या पद्धतीने फार मोठी फळे संख्येने कमी मिळण्यापेक्षा मध्यम परंतु जास्त संख्येने फळे मिळून उत्पादन वाढते.

रोपे लागवडीसाठी निवडलेल्या अंतरावर २॥'x २॥' x २" किंवा ३' x ३' x ३' आकाराचे खड्डे मार्च - एप्रिलमध्ये घेऊन त्यामध्ये मे मध्ये तळाला पालापाचोळा, त्यावर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खात ४० ते ५० किलो, निंबोळी पेंडे १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत १ किलो, फॉलीडॉंल डस्ट ५० ग्रॅम, प्रोटेक्टंट ५० ग्रॅम टाकून अशा पद्धतीने खड्डे भरून घ्यावेत.

जुनचा पहिला पाऊस झाल्यानंतर खड्डयामध्ये रोपांची लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी पिशवीतील रोपांना जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅमचे १० लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवीमध्ये प्रत्येक रोपावरून १०० मिली द्रावणाचे ड्रेंचिंग (आळवणी) मुळ्यांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने करावे. नंतर खड्ड्यातील माती रोपाच्या हुंडीएवढी काढून त्यामध्ये रोपावरची प्लॅस्टिक पिशवी अलगत ब्लेडने कापून काढून रोपे लावावीत.

लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी वरील द्रावणाचेच १०० मिली प्रमाणे प्रत्येक रोपावरून ड्रेंचिंग (आळवणी) करावे.

रोपांची लवकर निरोगी जोमदार वाढ होण्यासाठी बहार धरेपर्यंत खालीलप्रमाणे नियमित दरवर्षी फवारण्या कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर २१ - ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर १॥ ते २ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये ) : जर्मिनेटर ७५० मिली. + थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २०० लि.पाणी.

आवश्यकता भासल्यास कलमांची वाढ कमी वाटल्यास ८ - १५ दिवसांचे अंतराने वरीलप्रमाणे (तिसरी फवारणी) फवारण्या करणे.

प्रगत तंत्रज्ञान : जमीन, हवामान, योग्य जात याबरोबर आंबे कधी विक्रीस आणून भाव मिळवायचा या दृष्टीने नियोजन करायला हवे. मार्च ते जून हा काळ आंबेसराईचा असतो. अगोदर येणाऱ्या आंब्याला चांगला भाव मिळतो. जसा उशीर होतो व आंब्याची आवक वाढते. तसे भाव कमी - कमी होत जातात. पाऊस पडला की, आंब्याचे भाव गडगडतात. तेव्हा फेब्रुवारी किंबहुना जानेवारी - मार्चपर्यंत जातीवंत आंबे जेवढ्या प्रमाणात आणता येतील तेवढे चांगले. मात्र आता नव्या तंत्राने वर्षभर (पाऊस सोडून) आंबे मिळविणेही अवघड नाही. मुंबईसारख्या मोठ्या शहरांसाठी वा कॅनिंगसाठी बारमाही गरज निर्माण होऊ लागली आहे. आंबराईतल्या झाडांचे गट पडून गटवार फवारणीचे तंत्र अवलंबिले असता एका झाडावर मोहोर, दुसऱ्या गटात छोटी कैरी, तिसऱ्या गटात फळे हे शक्य आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने छाटणीचे तंत्र अवलंबायला हवे. छाटणी करताना पक्व काडीवरील पक्व डोळ्यापर्यंत छाटणी करून मोहोर धरून घ्यावा.

आंब्याचे पोषण : आंब्यांना खते द्यावी लागतात ही कल्पनाच आता कुठे मान्य व्हायला लागली आहे. कारण आंबराईतल्या सर्वच झाडांच्या वाट्याला चांगली माती मिळते असे नाही. आंब्याची मुळे खोलवर पसरतात. मुळांच्या वाढीबरोबर तेथील जमीन हळुहळू सुधारत जाते. ही प्रकिया घडून येण्यासाठी खतांची जरुरी असते. पुढे जेव्हा फळे लागतात व मुळे खोलवर पसरतात तेव्हा तर खताची गरज आणखीन वाढलेली असते. आंब्याच्या लहान व वाढत्या वयात पहिल्या वर्षी ७५ ग्रॅम नत्र, ११० ग्रॅम स्फुरद व ५५ ग्रॅम पालाश अशी खते द्यावीत. पुढे या प्रमाणात वाढ करीत दरवर्षी खते द्यावीत. आंबे यायला लागल्यावर पोषणाचे महत्त्व वाढते. तेथून पुढे दरवर्षी दर खोडस २५० ग्रॅम नत्र, १५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश द्यावे, ज्यावर्षी मोहोर अधिक येतो. त्यावर्षी दर झाडास ९० किलो कंपोस्ट खत, १.५० किलो एरंडी पेंड, १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडास वापरावे. आंबराईस खते घालताना विशेष लक्ष ठेवण्याची बाब म्हणजे सेंद्रिय कर्ब व जीवाणू क्रिया या होत. त्यासाठी हिरवळीचे खत शक्यतो पावसाळ्यात द्यावे. तिळाचे पीक घ्यावे. ताग व तूर, उडीद, मूग, चवळी, मटकी, अशी डाळवर्गीय पिकेही उत्तम आहेत. त्याचबरोबर जिवाणू खतांचे महत्त्व आहे. मोठ्या वटवृक्षाखालील माती पावसाळ्यात जमवून ती जर शेतात फळझाडांच्या आळ्यात मिसळली तर गांडुळांची पैदास चांगली होते. ही गांडूळ उत्पत्ती सर्वात सोपी व स्वस्त संकल्पना आहे. ह्याहून सोपे म्हणजे कल्पतरू सेंद्रिय खत वापरणे एकदम उत्तम.

नवीन आंबराईतील आंतरपिके : आंब्याला लागवडीपासून फळे येण्यासाठी ५ ते ६ वर्षाचा कालावधी लागतो. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर केला तर ३ ऱ्या ते ४ थ्या वर्षी फळे येतात. म्हणजे किमान सुरूवातीचे ३ - ४ वर्ष झाडाची पुर्ण वाढ होईपर्यंत आंबा लागवड, मशागत, खत, फवारणी यांचा खर्च आपणास आंतरपिकाच्या माध्यमातून काढता येतो. आंतरपिके डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घेतल्यास इतर खर्च निघून उत्पन्नात निश्चित वाढ होते असे अनेक फळबाग लागवड करणाऱ्या प्रगतीशिल शेतकऱ्यांनी कळविले आहे. त्यांच्या मुलाखती कृषी विज्ञान मधून प्रसिद्ध केल्या आहेत.

आंब्याची लागवड केल्यानंतर पहिले किमान ३ - ४ वर्षे ज्या भागात पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. तेथे घेवडा, कोथिंबीर, मेथी, काकडी, टोमॅटो वांगी अशी आंतरपिके घ्यावीत. घेवडा लागवड थंडीत दिवाळीनंतर जानेवारीपर्यंत केल्यास २ - २॥ महिन्यात उष्णता चालू होते. आणि या काळात भाव सापडतात. १७ मार्च ते १९ जूनपर्यंत कोथिंबीर ८ ते १५ दिवसांच्या अंतराने १० ते २० गुंठे अशी टप्प्या - टप्प्याने करावी. हंगामात केलेल्या कोथिंबीरीला हमखास ५ रू. पासून २० ते २५ रू. गड्डी असा भाव मिळून एकरी सव्वा महिन्यात ४० - ५० हजार ते १ लाख रू. होतात. यासाठी कल्पतरू सेंद्रिय खताची एकरी १ बॅग द्यावी. तसेच बीजप्रक्रियेला जर्मिनेटरचा वापर करून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंटच्या ३ - ४ फवारण्या ८ - ८ दिवसांनी कराव्यात. (संदर्भ : कोथिंबीरीचे कृषी विज्ञान अंक पहावेत. )

काकडीचे पीक घेताना ते १ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या काळात येईल असे पहावे. म्हणजे निश्चित भाव मिळतात. इतरवेळी आपल्या अनुभवानुसार तसेच ज्या त्या वेळची परिस्थिती पाहून आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार टोमॅटो, वांगी ही पिके यशस्वीरित्या घेता येतात.

ज्या ठिकाणी पाणी पुरवठा मर्यादित आहे आणि आंब्याच्या झाडांना उन्हाळ्यात हांड्यांनी पाणी डोक्यावर वाहून घालावे लागते. तेथे आंब्याच्या झाडांच्या घेराएवढे आळे करून आळ्यामध्ये तागासारखे पीक घेऊन ते गुडघ्या ते मांडीएवढे झाल्यावर जागेवर कापून आळ्यात गाडावे त्यावर कुजवणारे जिवाणू खत व कल्पतरू सेंद्रिय खत टाकावे. त्याचप्रमाणे मूग, चवळी, मटकी ही देखील पिके बेवड म्हणून घेता येतात. महणजे जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खत तयार होऊन हवेची पोकळी वाढेल. त्यामुळे जमीन भुसभुसीत राहून जैविक नत्र साठल्याने सुपीकता वाढेल. उत्पादनाच्या दृष्टीने आळ्यामध्ये वेलवर्गीय पिकांचे बी टोकून त्याचे वेल मधल्या पट्ट्यात पसरू द्यावेत. या पद्धतीने कारली, दोडका, कलिंगड, दुधी भोपळा, तांबडा भोपळा अशी पिके घेता येतात. मात्र वाटणा, जपानी तूर लावू नये. तसेच सुर्यफुलही घेऊ नये. कारण या सगळ्यांचा आंब्यावर वेगवेगळ्या स्वरूपात विपरीत परिणाम होतो.

आंतरपिके यशस्वी होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या तीन ते चार फवारण्या कराव्यात.

कोकणात शेतीसाठी आवश्यक पाण्याचा तुटवडा आहे. तेव्हा तेथे पावसाळ्याच्या सुरुवातीस रायवळ (गावठी) जातीच्या आंब्याच्या कोया एका आळ्यामध्ये जवळजवळ २ - ३ लावल्या जातात आणि नंतर ही रोपे १॥ फूट उंचीची झाल्यावर पेन्सिलच्या आकाराच्या मुख्य काडीवर हापूस आंब्याचे शेंडा कलम करतात.

कोकणात पाऊस खूप पडतो मात्र सर्व पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते. परिणामी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणावते किंबहुना काही भागात पिण्याच्या पानायचीही समस्या उद्भवते. तेव्हा शेतात उताराच्या बाजूने शेतातळे केल्यास पावसाळ्यात पाणी अडवून पाण्याचा साठ वाढविता येईल. यासाठी शेत तळ्यात जर प्लॅस्टिक अंथरले तर पाणी जमिनीत जिरणार नाही. ते अधिक दिवस साठवून ठेवता येते. तसेच उन्हाळ्यात या शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी केरोसिन पावडर तळ्यावर पंपाने फवारावी. म्हणजे पाण्यावर आवरण (तवंग) तयार होऊन बाष्पीभवन कमी होईल.

आंब्यावरील किडी :

१) तुडतुडे : ही कीड आंब्यावरील सर्वात हानीकारक असून प्रथम आंब्याची कोवळी पालवी, मोहोर आणि लहान फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर आणि लहान फळांची गळ होते. तसेच तुडतुड्यांनी शरीराबाहेर टाकलेल्या चिकट द्रवामुळे मोहोरावर आणि पानांवर काळ्या रंगाची बुरशी वाढते. त्यामुळे आंब्याची पाने काळी पडतात आणि पानांतील कर्बग्रहणाची (प्रकाशसंश्लेषण) क्रिया मंदावते.

शेंडे पोहरणारी अळी : ही कीड प्रामुख्याने लहान रोपांना आणि नवीन लागवड केलेल्या कलमांना अपाय करणारी आहे. ह्या अळ्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यात नवीन व कोवळी फूट पोखरतात. त्यामुळे शेंडे वाळून जातात. तसेच मोहोर निघाल्यावर मोहोराचा दांडा पोखरतात, त्यामुळे मोहोराची गळ होते. या किडीचे नियंत्रणासाठी कीड ग्रस्त काड्या कापून त्याचा अळीसह नाश करावा.

३) फळमाशी : आंब्याच्या फळांच्या सालीत ही फळमाशी अंडी घालते. अंड्यातून २ - ३ दिवसांत अळ्या बाहेर येतात आणि त्या फळांचा गर खातात. फळमाशी सालींच्या आतील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे तीचे नियंत्रण करणे अवघड जाते. झाडावरील किडग्रस्त फळे आणि झाडाखाली पडलेली फळे एकत्र गोळा करून अळीसह त्याच नाश करावा.

४) वाळवी : ही कीड झाडाची मुळे, फांद्या आणि खोडावरील सालीवर आपली उपजीविका करते. मुळावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पुर्ण झाड वाळून जाते झाडाकडे दुर्लक्ष झाल्यास खोडावर मातीचा पापुद्रा तयार. होऊन त्याखाली वाळवी राहून झाडाची साल खाते. कालांतराने वाळवीच्या प्रादुर्भावाने पुर्ण खोड पोखरले जाऊन त्याची ढोली तयार होते. वाळवीचा प्रादुर्भाव लहान रोपांपासून मोठ्या झाडांपर्यंत होतो.

५) मिजमाशी :काळसर रंगाची लहान माशी मोहोराच्या दांड्यावर तसेच पालवीच्या दांड्यावर अंडी घालते. अंड्यातून १ - २ दिवसांत अळी बाहेर येते. मोहोराच्या आणि पालवीच्या आतील पेशी खाते. त्याठिकाणी गाठी होऊन त्या गाठी नंतर काळ्या पडतात. त्यामुळे मोहोर आणि पालवी वाळते. ६) पिठ्या ढेकूण :या किडीची छोटी पिल्ले तसेच पूर्ण वाढ झालेले ढेकूण मोहोरावर तसेच फळावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पुर्ण फळ कापूस लावल्याप्रमाणे पांढरे दिसते. या किडीचा प्रादुर्भाव एप्रिल - मे महिन्यामध्ये तापमान वाढावयास लागल्यावर मोठ्या प्रमाणात आढळतो. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी किडीची पिल्ले व ढेकूण झाडावर चढू नयेत म्हणून खोडावर जमिनीपासून १ फूट अंतरावर चिखलाने खोडाच्या भेगा बुजवून घ्याव्यात आणि त्यावर ४०० गेजच्या प्लॅस्टिकची १ फूट पट्टी बुंध्याभोवती व्यवस्थित गुंडाळावी.

७) भिरूड : आंब्यावरील जास्त नुकसानकारी कीड म्हणून ओळखतात. कारण हीची अळी प्रथम झाडाची साल व नंतर खोड पोखरून आत जाते व तेथील गाभा खाते. भिरूड लागलेल्या फांद्या वाळतात. झाड कमजोर बनते. अळीने पडलेल्या छिद्रातून भुसा व विष्टा बाहेर येते. लवकर नियंत्रण केले नाही तर संपूर्ण झाड वाळते.

उपाय : १) या किडीच्या नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी भुसा बाहेर पडला आहे त्यावरून छिद्र शोधून टोकदार तारेने छिद्रातील जिवंत आळ्या माराव्यात. छिद्रामध्ये नुवा किंवा कार्बन डायसल्फाईडच्या द्रावणात कापसाचा बोळा भिजवून तारेच्या सहाय्याने घालावा आणि बाहेरून छिद्र शेण किंवा चिखलाने लिंपावे. प्रतिबंधक उपाय म्हणून ५०० ग्रॅम गेरू, ५०० ग्रॅम मोरचूद, ५०० ग्रॅम चूना आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंटची १० लि. पाण्यातून खोडावर पेस्ट लावावी.

रोग:

१) भुरी : हा बुरशीजन्य रोग असून आंब्यास मोहोर येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामान असल्यास या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग वाऱ्यामुळे प्रसारित होतो. सुरुवातीला त्याची (बुरशीची) सुक्ष्मजाळी मोहोराचा संपूर्ण देठ, फुले आणि फळे यावर तयार होते. नंतर ती पांढऱ्या बुरशीसारखी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोहोर आणि लहान फालंची गळ होते.

उपाय : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली आणि हार्मोनी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी करावी.

२) करपा : या रोगामुळे पानाच्या बाजूच्या कडा करपल्यासारख्या दिसून पानांवर तशाच प्रकारचे डाग पडतात. तसेच फळांवर काळे डाग पडून त्यांची वाढ मंदावते. याचे नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापून तसेच गळलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करावा आणि बाग स्वच्छ ठेवावी.

३) फांद्या वाळणे (पिंक रोग) : सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे गोलसर ठिपके फांद्यावर दिसतात. त्याची वर्तुळाकार वाढ होऊन एकात एक मिसळून मोठा डाग तयार होतो. ह्या डागांचे प्रमाण वाढल्याने फांदी वाळते. अनेक फांद्या वाळल्याने झाडाची अन्न तयार करणाची क्षमता मंदावते. त्यामुळे फलधारणा कमी होते. याचे नियंत्रणासाठी बुरशीची प्रथम अवस्थेत लागण झालेली दिसताच तो भाग खरडून काढावा. तसेच झाडाच्या व कलमांच्या वाळलेल्या फांद्या कापून काढाव्यात आणि खरवडलेल्या व कापलेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.

४) बांडगुळ : आंब्याच्या फांदीवर वाढणारी ही परोपजीवी वनस्पती आंब्याच्या फांदीतून रस शोषून घेते. बांडगुळाचे बी पावसाळ्यात झाडाच्या फांदीवर रुजते. त्याची मुळे सालीतून सरळ आत जातात आणि आतील गाभ्यावर वेष्टन तयार करतात. अशा ठिकाणी फांदीवर गाठ दिसते. झाडाने तयार केलेले अन्न बांडगुळे स्वत:साठी वापरतात. त्यामुळे आंब्याच्या फांद्या, झाडे अशक्त होतात आणि फलेही कमी लागतात. बांडगुळ झाडावर दिसताच ती संपूर्ण काढावीत. बांडगुळे मोठी झाली असल्यास पुर्ण फांदी कापून काढावी. कापलेल्या ठिकाणी बोडोपेस्ट किंवा डांबर लावावे.

आंब्याचा मोहोर धरण्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या फवारणीचे वेळापत्रक :

बहार धरण्यासाठी ३ ते ४ वर्षानंतरच्या झाडांना :

१) पहिली फवारणी : (सप्टेंबरमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (ऑक्टोबर - दसऱ्याच्या वेळेसर ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (डिसेंबरमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (जानेवारीमध्ये) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २०० लि.पाणी.

५) पाचवी फवारणी : (फेब्रुवारीमध्ये ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली . + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २०० लि.पाणी.

६) सहावी फवारणी : (लिंबाएवढी फळे झाल्यावर) : थ्राईवर १। लि. + क्रॉंपशाईनर १। लि. + राईपनर५०० मिली . + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम+ न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २०० लि.पाणी.

७) सातवी फवारणी : (कैरीएवढी फळे झाल्यावर) : थ्राईवर १ ॥ लि. + क्रॉंपशाईनर १ ॥ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० मिली. + २०० लि.पाणी.

वरील फवारण्याचे कारण व फायदे :

१) पहिली फवारणी : काडी तयार करून पक्व होण्यासाठी :

२) दुसरी फवारणी - बहाराचे डोळे लवकर फुटण्यासाठी

३) तिसरी फवारणी - बाजरीच्या आकाराचे मोहोर निघण्यासाठी तसेच ज्या जुन्या बागांना मोहोर फुटत नाही त्याकरिता प्रिझमची फवारणी उपकारक ठरते.

४) चौथी फवारणी - गुंडीगळ होऊ नये म्हणून

५) पाचवी फवारणी - वाटाण्याएवढे फळ होण्यासाठी, धुक्यापासून बुरशी येऊ नये. मोहोर खाण्यासाठी मावा आणि तुडतुड येऊ नये. नयेत म्हणून तसेच या काळात तापमान हे १२ डी. सेल्सिअसपेक्षा कमी झालेले असते, अशा काळात मोहोरगळ होते. साधारण ज्वारीच्या आकाराचा मोहोर झाल्यावर गुंडीगळ होते. त्यामुळे ही फवारणी अतिशय फायदेशीर ठरते.

६) सहावी फवारणी - लिंबाएवढी फळे पोसण्यासाठी, आकार, गार वाढण्यासाठी, कैरी एवढी फळे मोठी होण्यासाठी.

७) सातवी फवारणी - रंग, रस, जादा, गोडी उत्तम, फळे वजनदार रोग व साकाविरहीत येण्यासाठी.

नवीन लागवड जून ते जानेवारीपर्यंत केली जाते. किंबहुना काही शेतकरी जून महिन्यात २० - २० फूट अंतरावर खड्ड्यात कोय टाकतात. तिला चैत्र महिन्यात पालवी फुटते. नंतर त्यावर कलम केले जाते. अशा नवीन बागांना २५० मिली प्रिझमची जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट बरोबर फवारणी १०० लि. पाण्यातून करावी. तसेच २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस द्यावा.

२००६ मध्ये कुणकेश्वर, ता. देवगड (सिंधुदुर्ग) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यातील अनुभवी, प्रगतीशील जाणकार शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या आंब्याच्या झाडांवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर त्यांनी आम्हाला कळविले की, या तंत्रज्ञानातील प्रिझमच्या वापराने ज्या जुन्या बागांना मोहोर येत नव्हता, त्यांना बहार लागला. तसेच सप्तामृताच्या पुढील फवारण्या सरांनी सांगितल्याप्रमाणे घेतल्यावर मोहोराची गळ झाली नाही. काही शेतकऱ्यांनी फवारण्या मोहोर लागल्यानंतर घेतल्या. त्यांनी सांगितले झाडांवर आंबे सरासरी नेहमी एवढेच लागले मात्र लागलेल्या आंब्यांचा आकार मठ होऊन साका अजिबात न होता दर्जा सुधारला. ते पुढे म्हणाले की, तरी हे तंत्रज्ञान आम्ही नियमित वापरू शकलो नाही. मात्र खात्री झाली की या तंत्रज्ञानाचा नियमित वेलापत्रकाप्रमाणे वापर करून नेहमीपेक्षा जादा उत्पादन घेऊन दर्जा उत्तम राखून रासायनिक अंशविरहीत आंबा निर्यात करू शकू.

मार्केट स्वत : निर्माण करता येते: वरील फवारण्यामुळे रोग आणि कीड मुक्त फळे तयार होऊन आकर्षक रंग, फळे मोठी, गोडी, गर जास्त मिळून निर्यातीसाठी किंवा मेट्रो सिटीसाठी जादा भाव मिळतो. अशा मालाची विक्री प्रत्यक्ष उपभोगत्याकडे करावी. कारण साधरण १ - २ पेटी घेण्यासाठी या आंब्याची चव लक्षात ठेऊन माल कुठला आला ते शेतकऱ्यास कळवतात. तेव्हा शेतकऱ्यांनी दलालाकडे माल न पाठविता प्रत्यक्ष विक्री केल्याने दलालामार्फत होणारा खर्च वाचून भाव चांगला मिळतो.