'केशर' आंबा 'केशर' सारखाच मौल्यवान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



हापूस आंब्याला स्वाद असला तरी तो वर्षाआड व कमी जास्त येतो आणि आलाच तरी तो उशीरा मे महिन्यात येतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तो १ महिना लवकर आणता येतो. त्यामुळे साक्याचे प्रमाण अल्प राहते.

आंबा पाडाला लागल्यावर देठाजवळ काळा डाग पडतो व कापल्यास आतून काळपट बुरशी आल्याचे जाणवते. अशा विविध समस्येमुळे हापूस हा चवीला जरी चांगला असला तरी अशा नवीन समस्या येऊ लागल्या आहेत. देशावर जर लावायचा असल्यास तो तापमान अधिक असल्याने कमी येतो.

केशर आंब्याची पाने जाड, पन्हाळीसारखी, अरुंद, लांब, शिरा स्पष्ट असलेली गर्द हिरवी व झाड डेरेदार असते. चौथ्यावर्षी केशरला हमखास बहार येतो. १०० - २०० फळे हमखास धरता येतात. केशर चांगला येण्यासाठी जून महिन्यात लागवड करण्याकरिता पाव किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १ चमचा प्रोटेक्टंट खड्ड्यात मातीत मिसळून टाकावे. सुपर फॉस्फेट पाव किलो चालू शकते. कलम जून, जुलै (आर्द्र नक्षत्रात) महिन्यात १५ ' x १५ ' वर लावावे. खड्ड्यात कलम लावून खड्डा दाबावा व त्यावर जर्मिनेटर ३० मिली व प्रोटेक्टंट १ काडीपेटी, १० लिटर पाणी या प्रमाणात आठवड्याने फवारणी घ्यावी. परत १ महिन्याने ४० मिलीचा डोस फवारावा. तिसरी फवारणी दसऱ्याच्या सुमारास घ्यावी. त्याचवेळेस पाव किलो कल्पतरू खत परत द्यावे. म्हणजे झाडांची मर होणार नाही. यामध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, ढोबळी, मिरची अशा प्रकारची २ ते ३ महिन्यात येणारी किंवा उन्ह्लायात मेथी - कोथिंबीरीसारखी पिके करावीत. पाणी ठिबकने आवश्यक तेव्हा प्रत्येक झाडास ३ ते ४ लिटर बसेल असे द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी वरिलप्रमाणेच कल्पतरू खताचे प्रमाण वाढवून ५०० ग्रॅमचा डोस देऊन सप्तामृताच्या फवारण्या कराव्यात. दुसऱ्या - तिसऱ्या वर्षी आलेला मोहोर काढून टाकावा. चौथ्या वर्षी फळे धरावीत. तेव्हा झाडाचा घेर १० फुटापेक्षा जास्त असेल आणि खोड पोटरीसारखे जाड असेल यावेळी अर्धा किलो कल्पतरू खत टाकावे. मांडीएवढे जड खोड झाल्यास किलोभर कल्पतरू खत द्यावे.

आंब्यास मोहोर लागून फळधारणा हेण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात -

१) पहिली फवारणी : (जूनमध्ये) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३० मिली. + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + हार्मोनी १५ मिली. + १० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( दसऱ्याच्या सुमारास) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३५ मिली. + क्रॉंपशाईनर ३५ मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + हार्मोनी १५ मिली. + १० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : गुंडी गळ होऊ नये म्हणून व मोहोर लवकर यावा म्हणून :(डिसेंबर मध्ये): जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ४० मिली.+ क्रॉंपशाईनर ४० मिली. + राईपनर १५ मिली + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + न्युट्राटोन ३० मिली. + हार्मोनी १५ मिली. + १० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : वाटा ण्या एवढे फळ पोसण्यासाठी व बुरशी लागू नये म्हणून : थ्राईवर ४० मिली. + क्रॉंपशाईनर ४० मिली. + राईपनर ३० मिली . + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + न्युट्राटोन ३० मिली. + हार्मोनी १५ मिली. + १० लि.पाणी.

५) पाचवी फवारणी :लिंबाएवढी फळे झाल्यावर घ्यावी : थ्राईवर ५० मिली. + क्रॉंपशाईनर ६० मिली. + राईपनर ५० मिली . + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + न्युट्राटोन ४० मिली. + हार्मोनी २० मिली. + १० लि.पाणी.

६) सहावी फवारणी : फळ काढायच्या अगोदर १ ते १॥ महिना म्हणजे फळांचा आकार वाढून गोडी वाढण्यास मदत होते व फळ नासत नाही.

६० ते ७० मिली थ्राईवर + क्रॉंपशाईनर ८० मिली + राईपनर ६० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम + न्युट्राटोन ६० मिली + हार्मोनी २० मिली + १० लिटर पाणी.

अशा पद्धतीने निर्माण केलेले आंबे हे लांबट गोड, टणक साधारण ४" उंचीचे, टोकास लगेच निमुळते होणारे, २०० ग्रॅम पासून ते ३५० ग्रॅम वजनाचे असे मिळतात. फळे काढताना पहिले फळे पाडाला लागल्यानंतर बहार काढावा. फळ हाताने तोडावे. खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. फळे गवताच्या किंवा भाताच्या काडाचा २ ते ३ इंचाचा थर देऊन यात ठेवावी.

हापूसपेक्षा केशराची किपींग क्वालिटी (टिकण्याची क्षमता) जास्त असते.

केशर पिकला हे कसे ओळखावे ? : केशर तयार होण्यास साधारणत : १२ ते १५ दिवस लागतात. केशर देठाजवळ थोडा पिवळा झाला तर तो पिकला असे समजावे. कारण हापूस पुर्ण पिवळा पडल्यानंतर पिकतो किंवा गोड लागतो. हापूस जर टोकाच्या बाजूला हिरवट पोपटी राहिला तर तो गर आणि कोईला आंबट लागतो. या उलट केशर हा देठाजवळ पिवळा असून संपूर्ण हिरवा असून तो टणक असून कापल्यास आतून संपूर्ण पिकलेला व गर (रस) केशरी असलेला एकसारखा, साखरेसारखा गोड असतो. याला दशी कमी प्रमाणात असते. रसाकरिता व फोडी करून खाण्याकरिता हा आंबा उत्कृष्ट आहे. याची कोय निमुळती व चपटी असते. हा बराच काळ पिकल्यानंतरही हिरवा असल्यामुळे निर्यात करण्यासाठी उत्कृष्ट, टिकावू व सुरकुत्या न पडणारा टणक सालीचा असतो. तेव्हा एक्सपोर्टचे पॅकिंग ९ किंवा १२ चे पॅक कागदामध्ये गुंडाळून एकच थर साधारण ४" उंचीचे ९" रूंदीचे आणि १२" ते १५ " लांबीचे अशा बॉक्सेस्मधून निर्यात करावेत. संपूर्ण साल पिवळी होण्यास साधारण १८ दिवस लागतात. तरीही त्याच्यावर सुरकुत पडत नाहीतआणि तो त्यानंतर ६ दिवस वापरता येतो. याला हपूस्पेक्षा वेगल्या गोडीचा स्वाद आहे. निर्यातीसाठी आलेल्या आंब्यापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तयार झालेले आंबे सरस ठरतात. त्यामुळे काही वर्षानी आपल्या टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेला आंबा चिली, दक्षिण आफ्रिका, केनिया, ब्राझिल, सिंगापूर या देशातील आंब्यापेक्षा निश्चितच जागतिक मार्केटमध्ये सरस ठरेल. असा आत्मविश्वास आहे. कारण वरील देशातील आंबे उन्हाळ्याव्यतिरिक्त येत असल्यामुळे (गैरमौसमी) त्यांना चव नसते. या गोष्टीचा लाभ आंबा पिकवणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांनी व आंबा प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांनी घ्यावा.