विविध रासायनिक औषधे वापरूनही जळत राहिलेली कोथिंबीर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवाऱ्यातच शेवटच्या टप्प्यात (२२ ते २३ दिवसांची) ३ ते ४ दिवसात हिरवीगार सतेज!
श्री. संजय हरी शिंदे,
मु. पो. मखमलाबाद (तवली फाटा), ता. जि. नाशिक.
मोबा. ८८८८०६८८५३
माझ्याकडे मौजे मखमलाबाद (तवली फाटा) येथे १॥ एकर मध्यम काळी, चोपण स्वरूपाची
जमीन आहे. २३ नोव्हेंबर २०११ रोजी कणक कंपनीच्या कोथिंबीरीचे अभिननदन वाणाचे १३ किलो
बी २०० रू./किलो प्रमाणे आणून टाकले. उगवण चांगली झाली. ५ डिसेंबरपर्यंत सर्व कोथिंबीर
२ पानावर आली, पण हळुहळु जळत राहिली. या दरम्यान नाहीक येथे कृषी प्रदर्शनात भेट देत
असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवरून कृषी विज्ञानचा अंक विकत घेतला आणि दोन
वेळेस वाचला. विश्वास बसत नव्हता अशा शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया वाचल्या.
इकडे बाविस्टीन व रोगर यांचा लिटरला १ ग्रॅमप्रमाणे स्प्रे घेतला. ४ - ५ दिवसांनी पुन्हा
प्लॉटची पाहणी केली, तर कोथिंबीर जळतच होती. लगेच स्कोर या औषधाचा १ मिली/लिटर प्रमाणे
स्प्रे घेतला. करपा व इतर बुरशी निघून जाईल, त्याचा नाईनाट होईल असे वाटले. मात्र असे
न होता कोथिंबीरीचाच नायनाट होत होता. खूप निराश झालो. परत उमेदीने दुकानदाराने सांगितले
स्टार हे औषध भुरीवरचे मारा, कारण हिवाळ्यात पिकावर भुरी येत असते. २ टिपाचे (४०० लिटर
पाणी) १०० मिली औषध घेऊन फवारणी केली. ४ - ५ दिवसांनी फरक बघायला गेलो तर कोथिंबीर
जळतच होती. खूप घाबरलो. सोबत कृषी विज्ञान अंक वाचत होतो. जवळच नाशिक येथे दिंडोरी
रोड, पंचवटी पोलिस स्टेशन समोर, कृषी विज्ञानचे ऑफिस होते. याठिकाणी सर्व हकीगत सांगितली.
तेथील साहेबांनी मला विचारले, कोथिंबीरीला किती दिवस झाले? मी सांगितले २२ ते २३ दिवस
झाले त्यांनी लगेच त्यांच्याकडील जर्मिनेटर ५०० मिली, थ्राईवर ५०० मिली, क्रॉंपशाईनर
५०० मिली आणि स्टीकर ५० मिली दिले आणि त्याची २०० लि. पाण्यातून फवारणी करण्यास सांगितले.
वेळ न घालवता २३ तारखेच्याच संध्याकाळी २०० लि. पाण्यामध्ये सर्व औषधे टाकली व लगेच
स्प्रे घेतला ४ - ५ दिवसांनी प्लॉटची पाहणी करण्यास गेलो असता जी कोथिंबीर निस्तेज
होती. पिवळी होती, मरत होती, जळणे हा जो प्रकार होता तो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या
वरील फवारणीमुळे ४ - ५ दिवसात नाहिसा झाला. अचानक कोथिंबीर हिरवीगार, टवटवीत व जोमदार
दिसू लागली. मी स्वत: आश्चर्यचकित झालो. आता सर्वजण शेजारचे येऊन विचारतात. मी त्यांना
सांगतो कृषी विज्ञान, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला आहे, त्यामुळे ही सर्व किमया
घडली. माझ्याकडे ३ बिघे नानासाहेब पर्पल द्राक्षबाग आहे. सप्टेंबरमध्ये डोळे भरले,
रिकट केल्यानंतर १ फेब्रुवारीपासून सरांची टेक्नॉंलॉजी वापरत आहे. सरांनी असे अमृत
काढल्याबद्दल धन्यवाद देतो ! कालच पुन्हा सत्पामृत औषधे घेतली.