संशोधनाची वाटचाल - कांदा, वालवड, ब्रोकोली, रेडकॅबेज, ज्युकीनी (परदेशी भाज्यांसाठी) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर
                                श्री. सोमनाथ गजानन शिंदे, 
मु. पो. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे. 
मोबा. ७३८५९६४३८२
                            
                                आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे आणि कल्पतरू सेंद्रिय खत ४ - ५ वर्षापासून वापरत
                                आहे. आम्ही दरवर्षी टोमॅटो, वालवड तसेच चायनीज भाज्यांमध्ये ब्रोकोली, रेडकॅबेज, ज्युकिनी
                                अशी पिके घेत असतो. गेल्या हंगामात कांदा २० गुंठे केला होता. कांद्याला डॉ.बावसकर
                                तंत्रज्ञानाच्या ३ फवारण्या आणी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केला, तर २० गुंठ्यातून
                                मार्च २०१३ अखेरीस १५० पिशव्या निघाल्या.
                                
वालवडपासून १३ गुंठ्यात ५० हजार नफा
                                
आम्ही गेल्यावर्षी ऑगस्ट २०१२ ला वालवडची लागवड १३ गुंठ्यामध्ये केली होती. वालवडला नियमित १५ - २० दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या करीत होतो. बुरशीसाठी रासायनिक बुरशीनाशक वापरत होतो. तर ही वालवड सुरूवातीपासून निरोगी जोमदार वाढून २॥ महिन्यात तोडे चालू झाले. वालवडसाठी तार - काठीचा मांडव केला होता. पाणी ड्रीपने देत होतो. जमीन काळी सुपीक आहे.
                                
वालवडचे तोडे ५ व्या दिवशी करीत असे. प्रत्येक तोड्याला २०० किलोच्या आसपास वालवड निघत होती. सर्व माल मुंबई मार्केटला पाठवितो. तेथे २५० ते ३०० रू./ १० किलो असे भाव मिळत आहेत. वालवडच्या शेंगा अतिशय हिरव्यागार, सतेज असल्याने भाव एक नंबरचा मिळत आहे. तोडे चालू होऊन ६ महिने झाले. आतापर्यंत वालवडसाठी १६ ते १७ हजार रू. खर्च करून ५० हजार रू. निव्वळ नफा मिळाला आहे.
                                
वालवडच्या बाबतीत मुख्य समस्या म्हणजे वालवडवर जर लालकोलीचा प्रादुर्भाव झाला तर कीड साधारण औषधांनी आटोक्यात येत नाही तेव्हा पुर्ण प्लॉटवर त्याचा फैलाव काही दिवसातच होऊन पुर्ण प्लॉट वाया जातात.
                                
लाल कोळीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रभावी
                                
यावर्षी आमच्यादेखील प्लॉटवर लालकोळीचा प्रादुर्भाव झाला. उत्पादन व दर्जा वाढीसाठी तर डॉ.बावसकर तंत्रज्ञान आम्हाला नेहमीच साथ देत आहे तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे जाऊन लालकोलीसाठी खात्रीशीर उपाय विचारला. बाजारात लालकोळीवर रासायनिक औषधे आहेत. त्याच्या किंमती भरमसाठ असून देखील अपेक्षीत रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे मालाचे तोडे थांबून औषधे फवारणीचाच खर्च वाढतो. त्यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, नारायणगावमध्ये चौकशी केली. तेथे मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने संशोधित केलेले लाल कोळीवरील नवीन औषध दिले. त्याचे २० मिली/ १० लि. पाणी याप्रमाणात प्रमाण घेऊन फवारणी केली असता सप्तामृताचे जसे रिझल्ट मिळतात तसाच अनुभव या औषधाचा देखील आला. दुसऱ्या दिवशीच लालकोळी आटोक्यात आला. त्यामुळे मोडकळीस आलेला वालवड अजून महिनाभर निशिचत चालेल.
                                
अशा रितीने लालकोळीवर प्रभावीपणे मात करणारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सेंद्रिय औषध आम्हाला उपलब्ध झाल्याने आम्ही आभारी आहोत. दर्जेदार व खात्रीशीर उत्पादन घेण्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे.
                                
सध्या अभिनव टोमॅटोची ३० गुंठ्यामध्ये लागवड केली आहे. त्यालादेखील सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे.
                                
१० गुंठे ब्रोकोलीपासून ४० हजार
                                
चायनीज भाज्यांना तर जबरदस्त रिझल्ट या तंत्रज्ञानाचे मिळाले आहेत. ब्रोकोलीची ऐश्वर्या व्हरायटी करतो. १० गुंठ्याचे प्लॉट असतात. लागवड सरीवर १ - १ फूट अंतरावर उन्हाळा सोडून सर्व हंगामात करतो. याला १० गुंठ्याला कल्पतरू ५० किलो देतो आणि सप्तामृताच्य आवश्यक तेनुसार १५ - २० दिवसाला फवारण्या करतो. तर इतर औषधांपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा चांगला फायदा होतो. ६० - ६५ दिवसात ब्रोकोली काढतो. दर्जा उत्तम मिळाल्यामुळे कमीत- कमी ३० ते ३५ रू. तर सिझनमध्ये जास्तीत - जास्त ६० - ८० रू. /किलो भाव ब्रोकोलीला मिळतो. याला १० गुंठे क्षेत्रासाठी एकूण ८ ते १० हजार रू. खर्च येतो व उत्पन्न बाजारभावानुसार ३० ते ५० हजार रू. मिळते. याच प्रमाणे रेडकॅबेज (लाल कोबी) व ज्युकिनीचेही उत्पन्न घेतो.