चुकीच्या औषधात बुडवून लावलेली टोमॅटो रोपे सुकून जळणारी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ दिवसात टवटवीत
श्री. प्रदीप नारायण महांबरे,
मु. पो. महांबरेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा.
९९६०९१०५४३
मी जुन्नर तालुक्यातील महांबरेवाडीत राहणारा शेतकरी आहे. आमच्याकडे दरवर्षी भरपूर प्रमाणात
टोमॅटो लागवड होते. नारायणगावला आशिया खंडातील सर्वात मोठे टोमॅटो मार्केट असल्यामुळे
जुन्नर तालुक्यात बऱ्याच औषधे कंपन्याचे डिलर आहेत. कंपनीचे प्रतिनिधी प्लॉटवर येतात.
अमुक फवारा रिझल्ट येईल असे सांगत असतात, परंतु एप्रिल - मे च्या कडक उन्हाळ्यातील
आमच्या लागवडी असल्यामुळे रासायनिक औषधांचे टोमॅटो पिकांवर दुष्परिणाम बऱ्याच प्रमाणात
होतात. माझीसुद्धा तशीच परिस्थिती झाली. मी रोपांची लागवड करताना रोपे चुकीच्या औषधामध्ये
बुडवून लावल्यामुळे लगेच माझी रोपे सुकून जळायला लागली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सेंद्रियमध्ये
नाव असल्याचे मी एकूण होतो परंतु वापर केला नव्हता, एका मित्राने सांगितल्याप्रमाणे
मी कंपनीचे प्रतिनिधी श्री. दिलीप अरगडे ह्यांना फोन केला असता त्यांनी मला " घाबरू
नका, फक्त जर्मिनेटर चे द्रावण मुळाला पाण्यातून सोडा, आणि जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर
झाडावर फवारा" असे सांगितले. मी लगेच त्याप्रमाणे केले असता किमया होऊन तीनच दिवसात
प्लॉट टवटवीत होऊन रोपे सरळ, सतेज झाली. सध्या प्लॉट चांगला आहे.