मिश्रपीक पद्धतीतून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २० गुंठ्यात १ लाख ३० हजार रू.

श्री. नारायण शिवराम मोरबाळे,
मु. पो. सावर्डे बु., ता. कागल, जि. कोल्हापूर.
मोबा. ९०४९५०८०९६


मी मागील ३ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कोल्हापूरचे प्रतिनिधींच्या (श्री. मोरे, मो. ९७६६२७१६३५)

मार्गदर्शनाखाली भात, सोयाबीन, ऊस या पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

चालू वर्षी मोरे यांच्या सल्ल्याने डॉ.बावसकर तंत्रज्ञाना ने मिश्रपीक पद्धत अवलंबली. ४ फुटाची सरी सोडून भुईमूग व सोयाबीन लावले होते. मध्ये मिरची लावली होती. या तिन्ही पिकांना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोनच्या ४ - ४ फवारण्या केल्या होत्या. तर एवढ्यावर भुईमूग ३ क्विंटल शेंग आणि सोयाबीन ७ क्विंटल झाले. मिरचीपासून २० हजार रू. झाले. नंतर ही तिन्ही पिके काढल्यावर १४ सप्टेंबरला को - ९२००५ या जातीच्या उसाची लागण केली. उसाच्या सरीवर कांदा आणि हरभरा लावला. उसासाठी जर्मिनेटरचे आळवणी आणि सप्तामृताच्या ऊस भरणी (बांधणी) पर्यंत ३ व भरणीनंतर १ अशा ४ फवारण्या केल्या. उसाला युरीया, सुपर फॉस्फेट, पोटॅश सोबत कल्पतरू सेंद्रिय खताचाही वापर केला.

त्यामुळे उसाचे फुटवे भरपूर निघून वाढ चांगली झाली. ऊस कांड्या वाढून कांड्यांची जाडी वाढली. त्यामुळे ही मिश्रपिके असूनदेखील २५ टन उत्पादन मिळाले. उसासोबत कांदा व हरबऱ्यालाही सप्तामृताच्या फवारण्या झाल्याने कांद्याचे उत्पादन २ क्विंटल तर हरभरा ५० किलो झाला. कांद्याला ६००० रू./क्विंटल भाव मिळाला. ऊस २६०० रू. ने गेला. असे एका वर्षात २० गुंठ्यातून १ लाख ३० हजार रू. मिळाले.