८०% डाळींब फळे किंग साईज, जागेवर १०० ते १२० रू./किलो
एक शेतकरी
आमच्याकडेमाझ्याकडे डाळींब बाग असून त्याचा मृग बहार घरण्यासाठी नाशिक सेंटरला जाऊन श्री. सय्यदसाहेब
व श्री. आमले यांची भेट घेवून मार्गदर्शन घेतले. मृग बहार धरताना प्रथम एप्रिल महिन्यात
पाणी तोडले व पानगळ करून घेतली. नंतर पानगळ झाल्यावर बेसल डोसमध्ये कल्पतरू खत १ किलो
+ १८:४६:०० पावकिलो + निंबोळी पेंड अर्धाकिलो प्रति झाडास दिले. यामध्ये सुक्ष्म अन्नद्रव्य
देखील काही प्रमाणात दिले. नंतर पहिले पाणी देताना जर्मिनेटर १ लि. + १२:६१:० पाच
किलो ड्रिपवाटे दिले. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली झाली. नंतर पिवळ्या तांबूस रंगाची पत्ती
निघाल्यावर जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर
१ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रिझम अर्धा लि. + प्रोटेक्टंट अर्धा किलो + हार्मोनी
३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे फूट एकसारखी निघाली व पत्तीला
काळोखी चांगली आली. चौकी अवस्था असताना व कळी निघताना थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १
लि. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी
याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे फुलकळी जास्त प्रमाणात लागून त्यात मादी फुलांचे प्रमाण
भरपूर होते. त्यामुळे फुल सेटिंग चांगले झाले. त्यानंतर २० दिवसांनी थ्राईवर १ लि.
+ क्रॉपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि.+ प्रोटेक्टंट १ किलोची फवारणी
घेतली. त्यामुळे फळांची फुगवण चांगली होऊन ८०% फळे किंग साईज व सुपर साईजची मिळाली.
फळांना कलर उत्तम प्रकारे आल्यामुले जागेवर बाजारभाव १०० ते १२० रू./किलो मिळाला.
आता मी दुसऱ्या प्लॉटच्या आंबेबहार धरला आहे. वरील सर्व औषधांची फवारणी चालू आहे.
आता मी दुसऱ्या प्लॉटच्या आंबेबहार धरला आहे. वरील सर्व औषधांची फवारणी चालू आहे.