२ वर्षात 'सिद्धीविनायक' शेवग्याने १ एकरातून दिले ४ लाख

श्री. अमर नंदकुमार कामथे,
मु.पो. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मोबा. ९८८१९४४१३२



आम्ही जून २०१२ मध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याची रोपे नेउन १ एकर लागवड केली. जमीन भारी आहे. मात्र पाणी कमी असल्याने ठिबकवर हे पीक घेतले. विशेष म्हणजे याची लागवड शिफारशीपेक्षा थोडी वेगळी म्हणजे ८' x ५' वर केली. यामुळे झाडे लवकर एकमेकांत मिसळत असल्याने आपोआपच छाटणी करावी लागते. पहिली शेंडा छाटणी २।। फूट उंचीवर केली होती. नंतर जसजशा फांद्या वाढतील. तशी शेंडा खुडणी करीत असे. त्यामुळे एरवी जे फांद्या लांब होऊन बारीक फांदीला शेंगा व फुलांचे गुच्छ लागतात. त्यामुळे शेंगांच्या ओझ्याने फांद्या वाकतात व शेंगा बारीक राहून नुसताच लांब होतात. शेंगांची काढणी करताना शेंडा वाकवला असता काढणी योग्य २ शेंगा बरोबर कोवळ्या ४ शेंगा विनाकारण तुटतात. तेव्हा या सर्व समस्या या ८' x ५' लागवडीमध्ये टाळता येतात. कारण झाडे जवळ असल्याने फांद्या वाढून एकमेकात मिसळताच शेंडे खुडणीने फांद्या जाड होतात. वाढ मर्यादित राहून जाड फांद्यांना शेंगा लागल्याने शेंगा चांगल्या पोसतात. उंची कमी ठेवल्याने फांद्या वाकवण्याची आवश्यकता राहत नाही. तोडणीयोग्य तयार शेंग काढताना फांदी जाड असल्याने ती न मोडता पाहिजे ती शेंग तोडता येते. त्यामुळे बारीक शेंगा फांदीलाच राहतात.

या जूनच्या लागवडीच्या झाडांना वेळेवर सरांनी शेवगा पुस्तकात दिल्याप्रमाणे छाटणी करता आली. विशेष म्हणजे शेवगा पुस्तकाच्या कव्हरवरील फोटोत दाखविल्याप्रमाणे कोणता शेंडा खुडायचा आणि कोणता शेंडा फुलाचा हे समजले. त्यामुळे योग्यप्रकारे आवश्यक छाटणी करता आली आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ -५ फवारण्या सल्ल्याप्रमाणे केल्याने ४ महिन्यात फुलकळी लागून नोव्हेंबरमध्ये शेंगा चालू झाल्या. पहिल्यावेळी ६ फूट उंचीच्या झाडाला ४० - ५० शेंगा लागल्या होत्या. आठवड्यातून २ वेळा शेंगा तोडत असे. एका तोड्याला १०० किलो शेंगा निघत होत्या. सुरुवातीला ५० रू. किलो व नंतर ४० - ३५ रू. किलोपर्यंत भाव महाडचे व्यापारी जागेवर देत होते. त्यामुळे वाहतूक खर्च, कमीशन, कडता (तूट) वाचले. त्यामुळे पैसे चांगले झाले. हे व्यापारी महाडला २० रू. पावशेरने शेंगा विकत. शेंग अतिशय चविष्ट असल्याने गिऱ्हाईक व्यापाऱ्यांना याच शेंगाची मागणी करत होते. त्यामुळे हे व्यापारी २ रू. जादा घ्या पण आम्हालाच शेंगा द्या, असे आम्हाला म्हणत. झाडे लहान असल्याने हा बहार २ महिनेच चालला व जानेवारीत छाटणी केली. त्याला पुन्हा मार्चमध्ये शेंगा चालू झाल्या. त्या जूनपर्यंत चालल्या. यावेळी भरपूर माल निघाला. त्यानंतर पुन्हा छाटला तर प्रतिकूल हवामानात पावसात फुलगळ होऊन माल कमी आल. झाडाला माल कमी तसेच मार्केटमध्येही माल कमी त्यामुळे जादा भाव मिळाल्याने परवडले. असे २ वर्षाच्या आत आतापर्यंत ३ बहार घेतले. पहिल्या बहाराचे खर्च वजा जाता १। लाख रू. झाले. दुसऱ्या बहाराचे १।। लाख रू. झाले आणि तिसऱ्या बहाराचे १।। ते पावणे २ लाख रू. असे २ वर्षाच्या आत ४ लाख रू. मिळाले. आता एप्रिल २०१४ मध्ये खरड छाटणी सरळ करवतीने केली आहे. सरांनी सांगितले वाकड्या करवतीने छाटणी करावी व त्याला शेण व मातीचा गोळा लावावा म्हणजे बाष्पीभवन कमी होऊन बुरशी लागत नाही, तसे शेण व मातीचा गोळा लावला आहे. आता कल्पतरू खत भरणार आहे. जमीन भारी काळी असल्याने याला फक्त शेणखत दिले आहे बाकी कोणतेच खत वापरले नाही. फक्त सरांचे तंत्रज्ञान काटेकोर वापरतो. त्यामुळे हे रिझल्ट मिळत आहेत. हा शेवगा पहायला बोपगाव, भिवरी, गराडे येथील शेतकरी येतात, त्यामुळे जुनमध्ये हे पीक वाढेल.

झाडे जून झाल्याने खोडातून डिंक येत आहे. यावर सरांनी सांगितले हा डिंक आयुर्वेदिक असतो. राजस्थानमध्ये ४० रू. किलोने घेतात व औषध विक्रेते ४०० रू. ने घेतात. याने न बरा होणारा कॅन्सर रोग बरा होतो.

आमचा भाग अंजिराचा असून एकेकाळी फार समृद्ध होता. पण त्याला अन्हाळ्यात पाणी जास्त लागते आणि यावर तांबेरा येतो. याची सारखी निगा राखावी लागते, तोडणी पहाटे करावी लागते. तेव्हा याला पर्यायी पीक शोधत असताना सरांच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची माहिती मिळाली व ते पीक निवडले तर १००% रिझल्ट आला. अत्यंत कमी पाण्यावर, कमी कष्टात, कमी खर्चात खात्रीशीर उत्पादन व बाजारभाव मिळवून देणारे हे पीक आहे.

सर्व पाहुण्यांना गावातील मित्र मंडळींना शेंगा भेट दिल्या तर मांसाहारापेक्षा उत्तम चव असल्याचे सांगितले.

अत्यंत कमी पाण्यावर हे पीक येत आहे. झाडे लहान असताना ठिबकने ८ लि. चा डिस्चार्ज असताना १ तास चालवत होतो. माल लागल्यावर २ तास चालवतो. आता उन्हाळ्यात पाणी कमी झाल्याने फक्त अर्धा तासच चालत आहे. इनलाईनपेक्षा मायक्रो ट्यूबने पाणी चोहोबाजुने पडते. जेव्हा माल नसतो तेव्हा या पिकाला पाणी नाही दिले तरी चालते. सरांनी सांगितले होते हे कमी पाण्यावरील पीक आहे, त्याचा साक्षात अनुभव आला.

गेलेल्या १४ गुंठे झेंडूचे १।। लाख

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा झेंडू पिकामध्ये अफलातून अनुभव आला. झेंडूचे पीक काही केल्या वाढत नव्हते. तेव्हा ठिबकमधून डॉ.बावसकर तंत्रज्ञान सोडले तर झाडांनी ६ फुटापर्यंत वाढ झाली. मी रानात उभा राहिलो तरी झाडातून दिसत नसे. ७ जुनला लावलेला हा झेंडू गणपतीत चालू होऊन १४ गुंठ्यातून १।। लाख रू. झाले होते.

कांद्याचे २८ गुंठ्यात २ लाख ८२ हजार

जुनच्या पावसाळ्यावर फेक कांदा २८ गुंठे केला होता. त्याला १ बॅग सम्राट आणि बिजप्रक्रीयेला जर्मिनेटर वापरले होते. ३ किलो बी थेट टाकले होते. सरांनी सांगितले, हलके बी एरवी वाळू मिसळून फोकावे लागते. मात्र आमच्या येथे २० - २५ वर्षापासून या पद्धतीने कांदा करतात. त्यामुळे फोकणारे माहीर आहेत. तेव वाळू न मिसळता थेट बी एकसारखे फोकतात. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ३ स्प्रे केले होते. या २८ गुंठ्यात गरव्या कांद्याच्या १५० बॅगा निघाल्या. ४० किलो आकाराच्या पिशव्यात हा कांदा भरला असता तंत्रज्ञानामुळे ५० किलो वजन बसत होते. कांदा गिरेबाज, गोल्टी, वजनदार होता. ऑक्टोबर २०१३ मध्ये विकला तर ५२० रू/१० किलो भाव मिळाला. त्याचे खर्चे वजा जाता २ लाख ८२ हजार रू. झाले.

सरांच्या तंत्रज्ञानाने या उत्पन्नातून बोलेरो टेम्पलगोल्ड गाडी घेतली. ती १ टन माल वाहते. त्यातून आता आमच्या गावातील तरकारी व फुले पुणे मार्केटला आणतो.

भगवा डाळींबाची १।। वर्षापुर्वी (नोव्हेंबर २०१२) ३० गुंठ्यात २५० झाडे लावली आहेत. सध्या पहिला बहार धरला आहे. लिंबू आकाराची झाडावर ४० - ५० फळे आहेत. फळे फुगवणीसाठी तसेच कलर व उत्तम दर्जासाठी आता त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरायचे आहे.

सरांनी सांगितले, आता तुम्ही 'सिद्धीविनायक' शेवगा व डाळींबाचा तुलनात्मक अभ्यास करा. माझ्या मते उत्पादन व खर्चाच्या तुलनेत 'सिद्धीविनायक' शेवगा डाळींबाला कधीच सापडणार नाही. यावेळी सरांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेले बेदाणे दिले, तर त्याची चव १ नंबर वाटली. यावेळी सरांनी सांगितले, बेदाणा हातात घेतल्याबरोबर व्यापारी ओळखतात की, हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादीत केलेल्या द्राक्षाचा बेदाणा आहे आणि त्याला बाजारभावापेक्षा १५ - २०% भाव जादा मिळतो.

एकूण ७ - ८ एकर क्षेत्र असून ८ माही बागायत आहे. पावसळ्यात टोमॅटो, पावटा, झेंडू असतो. काही क्षेत्र जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेवावे लागते. सरांनी सांगितले चाऱ्यासाठी जर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तर असा अनुभव आहे की, १० ते १२ लि. दूध देणाऱ्या गाई १५ ते १८ लि. दूध देतात. (संदर्भ : जगन्नाथ सुदाम पाडेकर, मु. पो. संतवाडी आळे, ता. जुन्नर, जि. पुणे, मो. ९७६६४५७०१६) आणि गाईचे दूध गिऱ्हाईकाला म्हशीचे दूध वाटते, एवढे घट्ट असते, (संदर्भ - गोपीचंद महादेव जाधव, फुरसुंगी) या संदर्भांवरून आम्ही देखील आता चाऱ्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. १ जर्सी गाय १४ लि. दूध देणारी, १ मुऱ्हा म्हैस ६ लि. दूध देणारी आणि बैलजोड एक आहे. माझ्या मते शेती ही परवडनारी आहे. मी १० वी नापास आहे. शेती केल्याने होते ती केलीची पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाने शेती केली पाहिजे. शेतीतून कोटी - कोटी रू. कमविणारे लोक आहेत. आपणच आपली शेती अभ्यासाने, कष्टाने केली पाहिजे.