७ एकरात ६७ क्विंटल हरबरा,हरबऱ्या, पारंपारिकतेने ११ एकरात ७७ क्विंटल !

एक शेतकरी


डिसेंबर २०१३ मध्ये पुण्याला किसान प्रदर्शन पाहण्यास आलो होतो. तेव्हा 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून कापूस पुस्तक 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या' स्टॉंलवरून घेतले 'कृषी विज्ञान' मासिक नियमित वाचत असतो. त्यामध्ये आमच्या भागातील शेतकऱ्यांच्यादेखील मुलाखती होत्या. त्यामुळे आपणही हे तंत्रज्ञान वापरावे असे ठरविले. मात्र कपाशीला ते वापरू शकलो नाही म्हणून कपाशीच्या खोडव्यास (फरदड) आणि हरबऱ्यास तरी हे तंत्रज्ञान वापरावे. या विचाराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे ५ - ५ लि. घेऊन गेलो.

नोव्हेंबर २०१४ ला ट्रेक्टरने एकूण १८ एकर हरबरा,हरबऱ्या पेरला. विजय वाणाचे एकरी २५ किलो बी लागले. हरबरा,हरबऱ्या साधारण फुलावर असताना यातील ४ एकर व ३ एकराच्या प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केली. हा पहिलाच प्रयोग असल्याने जवळच्या ३ एकराच्या व ४ एकराच्या प्लॉटलाच म्हणजे एकूण ७ एकरालाच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले. याचा परिणाम म्हणजे फुटवा जादा झालाच, तसेच फुलगळ न झाल्याने घाटे भरपूर लागले. पुढे घाटे लागल्यावर हिरव्या आळीचा प्रादुर्भाव जाणवताच किटकनाशकाची फवारणी केली. त्याने आळी आटोक्यात आली. खरे तर हरबऱ्यास ३ फवारण्या करण्यसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे आणली होती. मात्र याची पहिली फवारणी केल्यानंतर पुढील फवारण्या करू शकलो नाही. त्यामुळे औषधे अजून शिल्लक आहेत. एकूण १८ एकर हरबऱ्यातील ७ एकर ला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले व बाकीच्या ११ एकरला फक्त रासायनिक किटकनाशक वापरले होते. तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकाच फवारणीत आम्हाला उत्पन्नात फरक जाणवला. मार्चच्या पहिला आठवड्यात ११ एकर क्षेत्रातील काढलेल्या हरबऱ्याचा एकरी ७ क्विंटल उतारा मिळाला आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरलेल्या ३ एकर प्लॉटमधून ९ क्विंटलचा तर ४ एकर प्लॉटमधून एकरी १० क्विंटलचा उतारा मिळाला.

सर्वच हरबऱ्या स्प्रिंक्लरने एकूण ३ वेळा पाणी दिले. पहिले पाणी उगवून आल्यानंतर, दुसरे फुले लागताना आणि तिसरे घाटे पोसताना दिले.

जर्मिनेटर डिसेंबरमध्ये वितभर उसास ड्रेंचिंग तर मार्चमध्ये ऊस कंबरेबरोबर !

हरबऱ्यास आणलेल्या शिल्लक औषधांमध्ये जर्मिनेटर हे औषध शिल्लक होते. उसासाठी ड्रेंचिंगला जर्मिनेटर फार प्रभावी असल्याचे 'कृषी विज्ञान' मधून वाचले होते. म्हणून माझ्याकडील ५ एकर असाला साधारण १ वीत उंचीचा असताना ड्रेंचिंग केले. हा ऊस नोव्हेंबर २०१४ मध्ये लावलेला आहे. २६५ वाणाच्या या उसाला जर्मिनेटरच्या ड्रेंचिंगने एवढा फरक पडला की, डिसेंबर अखेरीस १ वीत भर असलेला ऊस मार्च अखेरपर्यंत (३ महिन्यात) कंबरेला लागत आहे.

या दोन्ही पिकांमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा चांगला रिझल्ट मिळाल्याने आता माझ्याकडील ९ वर्षाच्या ४८० संत्रा झाडांस डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे आहे. याकरिता आज (२ एप्रिल २०१५) सरांना पुणे ऑफिसवर फोन वरून सरांचे मार्गदर्शन घेतले. सध्या हरबऱ्याएवढी संत्रा फळे आहेत. याची गळ होऊ नये तसेच फळांचे पोषण होण्यासाठी आणी त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. तसेच चालू हंगामात (जून २०१५) कपाशीलादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.

यावर्षी पुण्याला प्रदर्शन पाहण्यास आलो नव्हतो. त्यामुळे 'कृषी विज्ञान' ची वर्गणी सध्या संपली आहे. मासिक चालू ठेवण्यासाठी ३०० रू. मनीऑर्डर पाठवून देत आहे. 'कृषी विज्ञान' मधील माहिती आम्हा विदर्भातील शेतकऱ्यांना फार प्रेरणादायक ठरत आहे. तरी अंक नियमित चालू ठेवावा.