डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने जुन्या संत्रा बागा व पन्हेरीसून ५ वर्षापासून उत्पन्न व दर्जा दोन्हीही उत्तम !

श्री मनोहरसिंग ठाकूर,
मु.पो. पांढुर्णा, जि. छिंदवाडा. (म.प्र.)
मोबा. ०९४२५८९९४५५


मी गेल्या ५ वर्षापासून आमच्याकडील १००० संत्रा व १,५०,००० पन्हेरीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर व प्रिझमचा वापर करत आहे.

संत्रा झाडे १५ ते १६ वर्षाची आहेत व पन्हेरी जुलै २०१४ ला लावली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून संत्र्याची लागवड १५' x १६।।' वर आहे व पन्हेरी १' x १' अशा पद्धतीची आहे. दोन्ही बाजूला डबल लाईनचे ठिबक केले आहे व विहीरीला पाणी भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये मी झाडांना पाटाने पाणी सोडतो. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने संत्र्याचा आंबे बहार व मृग बहार असे दोन्ही बहार घेतो.

संत्रा झाडांची फूट व नवती काढण्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, प्रिझम, क्रॉपशाईनरची फवारणी केली. त्यामुळे मला संत्रा आणि पन्हेरीवरील नवती व फूट चांगली निघाली. नंतर संत्रा झाडावर व पन्हेरीवर बुरशी व मररोग आला होता, तेव्हा मी हार्मोनी, जर्मिनेटर, प्रिझमची फवारणी केली व फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी मर रोग पुर्णपणे आटोक्यात आला.

संत्रा फळांची साईज व आकार वाढण्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे राईपनर व न्युट्राटोनची फवारणी केली, तर काही दिवसांतच माझ्या झाडांवरील फळांची साईज वाढली व क्वॉलिटीही सुधारली.

माझ्या शेतात गेल्या ५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरत आहे व मला खूप चांगले रिझल्ट आले आहेत. मी यापुढेही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनेच शेती करणार आहे.