एप्रिलमध्ये सोनचाफ्याच्य रोज ६० - ७० पुड्या १० - १५ रू/पुडी म्हणजे सोनचाफ्याला भाव सोन्याचाच !
श्री. हेमंतराव भगत,
मु.पो. शेवाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे.
मोबा. ९३२५३०२०२०
आम्ही जून २०१३ मध्ये सोनचाफ्याची ३०० रोपे आमच्या येथीलच नर्सरीतून आणून लावली
आहेत. तशी ही रोपे मुळची कोकणातील पण येथील नर्सरीवाले तेथून रोपे आणून येथे विकतात.
साधारण २ फूट उंचीची १०० रू. प्रमाणे रोपे मिळाली. त्यांची लागवड मध्यम काळ्या जमिनीत
७ x ७ फुटावर केली आहे. आता पावणेदोन वर्षाच्या या रोपांची वाढ पाहता तशी लागवड लांबच
वाटतेय. ती ६ x ६ फुटावर केली असती तरी चालले असते. सोनचाफ्याची झाडे १५ ते २० वर्षे
उत्पादन (फुले) देतात. याची दरवर्षी छाटणी केली तर ६ x ६ फूट लागवड योग्य राहील असे माझे
मत आहे. याला ३ - ४ महिन्यातच फुले येतात, मात्र विक्रीयोग्य उत्पादन हे ७ - ८ महिन्यांनी
चालू होते. बारमाही फुले येतात. याला जादा थंडी किंवा कडक ऊन मानवत नाही. त्यामुळे
साधारण थंडीची तीव्रता कमी होऊ लागली की, माल वाढतो तो कडक उन्हाळा सुरू होईपर्यंत चांगला चालतो.
म्हणजे साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत उत्पादन जास्त मिळते. एरवी सर्वसाधारण
असते.
सोनचाफ्याला जेवढा फुटवा जास्त असेल. तेवढ्या कळ्या लागून फुलांचे उत्पादन वाढते. याची १० फुलांची पुडी ५ रू. पासून १५ रू. पर्यंत पुणे मार्केटला जाते. जेव्हा इतर फुलांना तेजीचे भाव असता म्हणजे बिजली, झेंडू जर २० - २५ रू. किलो असेल तर सोनचाफ्याची १० फुलांची पुडी १५ रू. ला जाते. लग्नसराईत भाव जादा मिळतात.
आमच्या ३०० झाडांपैकी २०० च झाडे चांगली उत्पादन देत आहेत. सध्या पावणे २ वर्षात झाडे ४ - ५ फूट उंचीची झाली असून एप्रिल २०१५ मध्ये ६० ते ७० पुड्या (१० फुलांच्या) माल दररोज निघत आहे.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा मी १९९५ ते २००५ या काळात गाजर, मेथी, कोथिंबीरीला वापर केला होता. त्यामुळे या पिकांचे अतिशय यशस्वीरित्या उत्पादन मिळत असे. त्यानंतर ही पिके बंद केली. आता सोनाचाफ्याला या जुन्या अनुभवावरूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. साधारण १५ ते २० दिवसांला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे फवारतो. त्यामुळे झाडांची वाढ, फूट चांगल्याप्रकारे होते. कळ्या वाढतात. त्यांची लांबी वाढते. फुलांना आकर्षक कलर येतो. त्यांचा सुगंघ वाढतो. पिशवीत पॅकिंग केल्यानंतर टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे इतर कोणतीही रासायनिक औषधे सोनचाफ्यास वापरत नाही. खतामध्ये शेणखताचा वापर करतो.