पहिल्या बहाराचे १ एकरातून भगव्यातून २.२५ लाख नफा !
श्री. शिवाजी अर्जुन कोल्हे,
मु.करूले, पो.निळवंडे, ता.संगमनेर, जि.अहमदनगर.
मो. ९८५०४१८५१०
भगवा डाळींबाची मुरमाड जमिनीत १२ x ८ फुटावर लागवड केली आहे. सप्टेंबर २०१५ ला पानगळ केली.
वातावरण संमिश्र असल्यामुळे फुलकळी कमी अधिक प्रमाणात लागली. त्यामध्येही
नरफुलेच जास्त होती.
येणाऱ्या फुलापेक्षा फुलगळ जास्त प्रमाणात
होत होती. काही प्रमाणात सेटिंग पण चालू होती. त्यानंतर श्री. संकेत सोनवणे (मो. ८६५७३२४९९९)
यांच्या सल्ल्यानुसार पवार अॅण्ड सन्स मधून डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर,
क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट-पी (३ ग्रॅम), प्रिझम यांची प्रत्येकी २।। ते ३ मिली/१ लि.
पाणी याप्रमाणे फवारणी केली व जमिनीतून जर्मिनेटर १ लि./२०० लि. पाण्यातून सोडले.
त्यानंतर फुलगळ कमी झाली. मधमाश्यांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगले होऊन फलधारणा होऊन
गाठ सेटिंग चांगले झाले. दोन टप्प्यात कळी लागल्याने मागे - पुढे माल लागला.
डॉ. बावसकर सरांच्या सप्तामृताचे २ स्प्रे व रासायनिक औषधांचे २ स्प्रे घेतले. फळांवरील डागावर हार्मोनी व थाईवर, क्रॉपशाईनर यांची फवारणी केल्याने डाग नियंत्रणात आले. खालून निंबोळी खताबरोबर वरून न्युट्राटोन व बोरॉनचा स्प्रे घेतला व त्यामुळे फळांची क्वालीटी सुधारण्यास मदत झाली. सेटिंग मागे पुढे झाल्यामुळे माल चांगल्या प्रकारे पोसला गेला. ०:५२:३४ व राईपनरने आकार, वजन वाढून गडद व नैसर्गिक कलर चांगला आला. त्यामुळे बाजार भाव चांगला मिळाला व उत्पादन पाहिजे त्यापेक्षा डबल मिळाले. ४.५ ते ५ टन माल निघाला. राहाता मार्केटला माल विकला. ७३ रू. ने गेला. एकूण ३ लाख रू. झाले. यासाठी ६० ते ७० रू. खर्च आला. अशा पद्धतीने पहिल्याचा बहारापासून १ एकरातून सव्वा दोन लाख रू. नफा मिळाला.