माल न लागणाऱ्या द्राक्ष वेलींना देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने माल लागला
श्री. रमेश शंकरराव माने,
मु.पो. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली
मी द्राक्ष बाग लावून ४ वर्षे झाले आहे. चारही वर्षे चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत
असताना माझ्या द्राक्ष बागेतील ९४५ झाडांपैकी सर्वसाधारण ३५० झाडांना गेली ३ वर्षे
मालच लागत नव्हता. अनेक प्रकारची उपाय योजना केल्यानंतर अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी
व अनेक सल्लागारांचे सहाय्य घेतले असूनदेखील द्राक्ष वेलीला फळे (माल) न लागण्याची
समस्या कायम होती.
याच दरम्यान डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यांच्या औषधाबद्दलची माहिती 'कृषी विज्ञान' मासिकातून मिळाली. मग मी डॉ.बावसकर सरांची पुणे ऑफिसला जाऊन भेट घेतली. त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व त्यांनी सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी विलास पाटील यांचा मो. नं. (९८२२६१६९५१) देऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे सुचविले. कारण माझी सांगली जिल्हातील येळावी गावात बाग आहे.
सरांच्या सुचनेप्रमाणे कंपनी प्रतिनिधींशी संपर्क केला व चर्चेची वेळ ठरवून ते प्लॉटवर आले. ही भेट सर्वसाधारण फेब्रुवारी २०१६ मध्ये (एप्रिल छाटणीपुर्वी) झाली. त्यांनी बागेचे निरिक्षण केले व ज्या वेलींना माल येत नव्हता त्या वेलींना खुणा करून ठेवल्या.
एप्रिल छाटणी होण्या अगोदर जमिनीची मशागत केली आणि एप्रिल छाटणी केली. त्यादरम्यान जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + १०० लि. पाणी हे छाटणीनंतर २ दिवसांनी व त्यानंतर ५ दिवसांनी असे २ वेळा फवारले. हे करत असताना पांढऱ्या मुळीची चांगली वाढ होण्यासाठी जर्मिनेटर १ लि. १९:१९:१९ १ किलो, ह्युमिक १ लि. + ३०० लि. पाण्यातून ८ - ८ दिवसांनी २ वेळा ठिबक मधून सोडले. तसेच द्राक्ष पिकावर येणाऱ्या रोग - किडी प्रतिबंधासाठी इतर रासायनिक औषधे देखील वापरत राहिलो आणि ज्या वेलींना माल येत नव्हता त्या वेलींना प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे त्या ३५० झाडांना प्रत्येकी ५०० मिली असे द्रावण ठिबकच्या खाली प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने ५ वेळा दिले. त्यासोबत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यांच्या द्राक्ष पिकाच्या एप्रिल छाटणी वेळापत्रकानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर या औषधांच्या प्रत्येक २५ दिवसांच्या अंतराने ४ फवारण्या घेतल्या. त्यामुळे माझी बाग एप्रिल छाटणीनंतर चांगली फुटली. काड्या अतिशय चांगल्या बनल्या. प्रत्येक काडीचे डोळे मोठे व उत्पादनक्षम तयार झाले. पाने जाड, रुंद होऊन ऑक्टोबर छाटणीपर्यंत टिकून राहिली व काडीची पक्वता १००% मिळाली. या वेळी लिहोसीन, इरॅसिल, ६ बी ए, सुक्ष्म अन्नद्रव्ये, स्लरी यांचा वेळोवेळी योग्य प्रमाणानुसार वापर केला.
ऑक्टोबर छाटणी घेण्याअगोदर द्राक्ष वेलीतील न येणाऱ्या वेलीच्या व फळे येणाऱ्या वेलीच्या ठराविक काड्या काढून लॅब टेस्टींगसाठी पाठविल्या. त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या काड्यांमध्ये फळधारणेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला.
रिपोर्ट आल्यानंतर ५ - ६ दिवसांनी मी ऑक्टोबर छाटणी घ्यायची ठरविले. त्यादरम्यान द्राक्ष वेलीची मेहनत करत असताना लहान ट्रॅक्टरने वेलीच्या दोन्ही बाजूची माती मोकळी केली. त्यामध्ये सुक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड, करंज पेंड तसेच सुपर फॉस्फेट, डी.ए.पी. व इतर सेंद्रिय खतासोबत कल्पतरूच्या ४ बॅगा ही सगळी एकत्र करून वेलीच्या ठिबकच्या दोन्ही बाजूला समप्रमाणात खते घालून मातीने बुजवून घेतले व ठिबकमधून जर्मिनेटर १ लि. + १९:१९:१९ १ किलो + ह्युमिक १ लि. हे ३०० लि. पाण्यातून ठिबकमधून सोडले. नंतर ५ - ६ दिवसांनी मुहुर्त पाहून बागेचा पाला काढून १० ते ११ डोळ्यावर छाटणी केली. दुसऱ्या दिवशी मोरचूद १ किलो व चुना १ किलो १०० लि. पाण्यामध्ये टाकून द्राक्षवेलीवर चांगली फवारणी घेतली. त्यानंतर २ दिवसांनी एम -४५ १०० ग्रॅम + क्लोरो ५०० मिली + स्टिकर हे २५० लि. पाण्याच्या प्रमाणात घेऊन द्राक्षवेली धुवून घेतल्या. नंतर २ दिवसांनी हायड्रोजन सायनामाईड ५०० मिली + ५०० मिली जर्मिनेटर + १५० ग्रॅम एम - ४५ + १०० ग्रॅम सल्फेक्स (गंधक) + कलर + स्टिकर यांची १० लि. पाण्यामध्ये पेस्ट तयार केली व सर्व काड्यांना लावून घेतली.
५ व्या दिवशी जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + किटकनाशक + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी घेतली. नंतर पेस्ट लावल्यापासून ८ व्या दिवशी जर्मिनेटर ५०० मिली + हार्मोनी २०० मिली + झेड -७८ १५० ग्रॅम + डेन्टॉप २ पुड्या (१२ ग्रॅम) हे १०० लि. पाण्यात घेऊन बागेवर फवारणी घेतली. तसेच डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या माहिती पत्रकानुसार फवारण्या घेतल्या असता माझी बाग अतिशय चांगल्या पद्धतीने फुटली. महत्त्वाचे म्हणजे मोठे डोळे. जाड काडी व सबकेन डोळासुद्ध जोमदार फुटला. घड निघताना कोचीदार, जोमदार व पाकळीबाज निघाले. वेलीची पाने जाड, रुंद होऊन कॅनॉपी चांगल्या पद्धतीने मिळाली. घडाची साईज, पाकळ्या व आकार चांगला मिळाला. त्याचप्रमाणे खराब वातावरणात क्रॅकिंग किंवा सनबर्न झाले नाही. माल अतिशय चांगला, मण्याची साईज एकसारखी, थंडी असतानाही मालाची फुगवण व साखरेचे प्रमाण चांगल्या पद्धतीने मिळून लस्टर व शायनिंग चांगली आल्याने दलालाकडून १६० रु. दर असताना २०० रु. प्रमाणे (४ किलो पेटीला) दर मिळाला. दर व उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते. महत्त्वाचे म्हणजे फळे न येणाऱ्या ३५० द्राक्षवेलीस सरासरी ३० घडांपासून ४० घडांपर्यंत माल आला आणि तोही माल चांगल्या वेलीवरील मालाप्रमाणेच उत्तम प्रतिचा तयार झाला. त्यामुळे मला असे जाणवले, डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरल्याने वेलीमध्ये येणाऱ्या समस्या, जमीन व नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती यावरही १००% मात करता येते.