दर्जेदार द्राक्ष उत्पादन व चांगल्या बेदाण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर फायदेशीर
श्री. अविनाश रामराव पाटील,
मु.पो. राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली
आम्ही तिघे भाऊ असून आमची तिघांची प्रत्येकी ५ - ५ एकर द्राक्षबाग आहे. मी स्वतः डॉ.बावसकर
टेक्नॉलॉजीचा वापर पुर्णपणे करतो. एप्रिल व ऑक्टोबर छाटणीमध्ये वापर केल्याने मला चांगल्या
पद्धतीने उत्पादन मिळते. मी ४ एकर द्राक्षाचे मार्केटिंग व १ एकर द्राक्षाचा बेदाणा
केलेला आहे. मी ऑक्टॉबर छाटणी नंतर दरवर्षीप्रमाणे फक्त जर्मिनेटर वापरत होतो. परंतु
यावेळी सोबत प्रिझमही वापरले. त्यामुळे बागेची निघणारी फुट ठोसर व भरीव चांगल्याप्रकारे
निघाली. त्याला येणाऱ्या घडांची साईज मोठी व कोचीदार मिळाली. १४ - १५ व्य दिवशी थ्राईवर
३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + किटकनाशक + १०० लि. पाणी यांची
फवारणी घेतली. त्यामुळे घड वाढीस, पाने जाड होण्यास व रोग प्रतिकार शक्तीमध्ये चांगली
वाढ झाली.
छाटणीपासून २० दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३०० मिली व किटकनाशके अशी फवारणी केली असता घडाच्या पाकळ्यांमधील आकार चांगल्याप्रकारे मिळाला. पाने मोठी व जाड झाली. शेंडाही चांगला चालला. पानांवर नैसर्गिक तेलकट, तजेलदार अवरण तयार झाले.
मणी सेटींग नंतर थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ४०० मिली + राईपनर ५०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे एकत्र करून २५ दिवसांच्या अंतराने अशा ३ फवारण्या घेतलाय असता बेदाण्याची द्राक्ष चांगल्या पद्धतीने गरबाज व साखरयुक्त बनली. आता सध्या ४ दिवसापुर्वी रॅकवर माल टाकलेला असून मालाचा दर्जा व उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.