पाणी कमी असून हरबऱ्याचे एकरी ६ क्विंटल उत्पादन

श्री. आकाश भगवानराव ढेंगळे,
मु.पो. मानेगाव, ता.जि. जालना - ४३१२०३.
मो. ८५५२९२३३३०


माझ्याकडे ९ एकर शेती असून त्यामध्ये ३ एकर ज्वारी, २ एकर गहू, ३ एकर कपाशी आणि १ एकर हरबरा ही पिके घेत असतो.

मी बरेच वेळा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा.लि. पुणे यांचे नाव ऐकून होतो. प्रदर्शनामध्ये कंपनीचा स्टोल पहायचो. परंतु कधी औषधे वारपाली नव्हती. कारण आमच्या भागामध्ये या कंपनीची औषधे तेव्हा मिळत नसत. परंतु योगायोग चालू वर्षी शेतकरी कृषी सेवा केंद्र, रामनगर येथे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मिळाली. म्हणून मी यावर्षी हरबरा या पिकाला जर्मिनेटर हे औषधे बेणे प्रक्रियेला वापरले तर खरोखरच याचा फायदा मला जाणवला.

उगवण लवकर झाली. हरबऱ्यामध्ये मर झाली नाही. फुलधारणा होण्याकरिता प्रिझम फवारले तर त्याचा सुद्धा मला चांगलाच फायदा झाला. फुलधारणा व घाटे नेहमीपेक्षा जास्त लागले. विशेष म्हणजे पाणी कमी असून देखील ६ क्विंटल हरभरा उत्पादन मिळाले.