३ महिन्यात खरबुजाचे १।। लाख, कलिंगड व उसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फायदेशीर

श्री. अक्षय शंकर जमदाडे,
मु.पो. लिंब, ता.जि. सातारा,
मो. ९६६५५०७७२५



डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी औषधे मी गेली ५ वर्षापासून वापरत आहे. त्यापुर्वी माझे वडील टोमॅटो काकडी, टरबुज पिकाला वापरत होते.

चालुवर्षी मी खरबुज (कुंदन) १ एकर मुरमाड जमिनीत बेडवर जानेवारी २०१७ मध्ये लावले. बेड ४ फुट रूंदीचे असून २ बेडमध्ये ३ फुट अंतर आहे. बेडच्या मधून ड्रीप लाईन टाकून २ - २ फुटावर लाईनच्या दोन्ही बाजूस ६ - ६ इंचावर १ -१ बी झिगझॅक (एका आड एक) पद्धतीने लावले. जर्मिनेटरची बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण लवकर होते. बेडमध्ये एक एकरसाठी ३ टेलर कोंबड खत टाकले होते.

गोमुत्र १० लि. + शेण १० किलो +बेसनपीठ १ किलो + गुळ १ किलो हे २०० लि. पाण्यात ८ दिवस भिजत ठेवत होतो. अशी स्लरी १५ दिवसाला फळे लागल्यानंतर २ वेळा सोडली.

खरबुज ३ - ४ पानावर असताना पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच वेल वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची पहिली फवारणी केली. त्याने प्लॉट निरोगी राहून वेलांची वाढ जोमाने होऊ लागली. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी मुख्य वेलीला २ - ३ फुटी निघाल्यावर दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली ची १५० लि. पाण्यातून केली. त्याने वेल झपाट्याने वाढू लागले. पुढे फुलकळी लागल्यावर गळू नये म्हणून तिसरी फवारणी सप्तामृताची केली. त्यानंतर फळे साधारण १०० ग्रॅमची (कवठासारखी)झाल्यावर ती पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन १ - १ लि. २०० लि. पाण्यातून फवारले. त्यामुळे २।। महिन्यात माल चालू झाला. एका वेलीला (झाडाला) ५ फळे धरली होती. खोडापासून जवळ लागलेली सुरुवातीची फळे चांगली पोसत असत. त्याचे १।। किलोपर्यंत वजन भरत होते व पुढील २ फळे मध्यम आकाराची १०० ग्रॅम ते १ किलो वजनाची मिळत होती. २० मार्चला तोडे चालू झाले. ३ तोड्यात माल संपला. तिन्ही तोड्यांचा मिळून ८ टन खरबूज मिळाले. सर्व माल सातारा मार्केटला आम्ही स्वतः नेऊन व्यापाऱ्यांना विकला. २२ रु./किलो भाव १ नंबरला मिळाला. १८ रु./किलो २ नंबरला व ३ नंबरचा २०० रु. ला १ क्रेट जात होते. क्रेटमध्ये २० किलो माल बसतो. १ नंबर माल ३०%, २ नंबर ५०% , ३ नंबर २०% मिळाला. याशिवाय ५ - ६ हजार रुपयाचा किरकोळ माल विकला.

३ महिन्यात या पिकापासून १।। लाख रु. उत्पन्न मिळाले. यासाठी ६० - ७० हजार रु. खर्च आला.

आता शुगर क्वीन कलिंगड १० मार्च २०१७ ला लावले आहे. याचे बेडवर उसात आंतरपीक घेतले आहे. ऊस लागवडीनंतर १ महिन्याने कलिंगड लावले. उसाची ५।। फुटी पट्ट्यावर २ - २ फुटावर रोपे लावली आहेत. १०००१ जातीची ऊस रोपे पाडेगाव वरून ४ रु./रोप प्रमाणे जागा पोहोच मिळाली.

उसाच्या मधल्या पट्टयात कलिंगड १ ओळ २ - २ फुट अंतराने बेड करून मल्चिंग न करता लावले आहे. कलिंगड बियाला जर्मिनेटर वारपले होते. त्यामुळे उगवण चांगली झाली. सध्या फुट फुटायला लागली आहे. त्यासाठी आणि उसाला आज (१०/०४/१७) ला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोन, स्प्लेंडर घेऊन जात आहे. उसाला आतापर्यंत २ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या केल्या आहेत. सध्या १ - १। फुट उंचीची निरोगी ऊस आहे.