डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृतामुळे माझ्या मोसंबीस ११ हजार रू./टन भाव

श्री. हेमंत मणिलालजी संघवी (एम. कॉम.),
मु. पो. वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव.
फोन नं. (०२५९६)२८०२०२


मी ४०० मोसंबीच्या झाडाची लागवड ६ वर्षापुर्वीच केली होती. न्युसेलर या जातीची लागण केली. झाडांची उंची व घेर १५ फूट आहे. मी यावर्षी पारंपारिक पद्धतीने मोसंबी न आणता लवकर आणायची आहे म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत वापरायचे ठरविले. पहिल्यांदा, मी कल्पतरू खत आणि शेणखत सप्टेंबरमध्ये प्रत्येक झाडास ५०० ग्रॅम वापरले. रासायनिक खत वापरले नाही. पहिली फवारणी 'प्रिझम' औषधाची केली तर बाग एकदम एकसारखा फुटलेला दिसला आणि नंतर दुसरी फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून केली. तर फुलकळीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसून आले. नंतर तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ७५० मिलीची १५० लि. पाण्यातून केली असता फळगळ अजिबात झाली नाही. मी कोणतेही केमिकल्स वापरलेले नाही. त्यामुळे मालाला शायनिंग एकदम जबरदस्त आहे. एका झाडावर १००० ते १५०० फळे आहेत. गेल्या २-३ वर्षाच्या तुलनेपेक्षा यावर्षी फळे जादा आहेत. फळांना चमकदार, गडद, हिरवागार कलर आहे. झाडे डेरेदार आहेत. नंतर चौथी फवारणी ही फक्त क्रॉपशाईनर व न्युट्राटोन प्रत्येकी १ -१ लि. ची २०० लि. पाण्यातून केली. त्यामुळे मालाची फुगवण, वजन वाढून आकर्षक चमक आली. माझे मित्र - मंडळी बागेत आल्यानंतर एकदम चकीत झाले की, तु असे कोणते औषध वापरलेस असे विचारू लागले. त्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सप्तामृत व कल्पतरू सेंद्रिय खत वापरले असे सांगितले. ही टेक्नॉलॉजी मला वरदानच ठरली आहे. कारण मोसंबीला प्रथमच ११ हजार रू./ टन भाव मिळाला. भागील वर्षी मी लिंबासाठी पण हा प्रयोग केला होतो तो पण यशस्वी झाला होता. त्याच अनुभवातून यावर्षी मोसंबीला हे तंत्रज्ञान वापरले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यावर्षी मोसंबीचे उत्पादन चांगल्यारितीने मिळाल्याने मी खूप समाधानी आहे. पुढेही कायम डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे तंत्रज्ञान वापरणार आहे.