भाव पडलेले असताना कमी खर्चात भगव्याचे २ लाख ५३ हजार रुपये
श्री. सतिश भिकाजी घोगरे,
मु. पो. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे.
मोबा. ९६३७६५४६१३
माझ्याकडे डाळींबाची ३८० झाडांची १॥ एकर बाग आहे. मी पहिला बहार घरला होता त्यावेळेस
भरपूर खर्च केला पण एकूण उत्पन्न फारच कमी म्हणजे फक्त ५० हजार रुपये मिळाले. त्यामुळे
मी ह्यावेळेस योग्य नियोजन करून खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ घालायचा विचार केला. त्यानुसार दुसरा बहार गेल्यावर्षी धरला.
या आंबेबहारास कळी निघत नव्हती. जी निघाली त्यात नरकळीचे प्रमाण जास्त होते तसेच कळीची
गळ होत होती. त्यावेळेस माझ्याशेजारी गिरमे यांच्या डाळींब बागेत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे
प्रतिनिधी श्री. शहाजी गायकवाड (मो. ९८५०५१५९९१) आले होते. त्यांना मी माझी बाग दाखविली.
त्यावेळेस त्यांनी सांगितले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कळी भरपूर निघून मादी कळीचे प्रमाण
जास्त असेल. मग त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + ०:५२:३४
हे ५०० ग्रॅम २०० लि. पाण्यातून फवारले. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी बर्यापैकी लहान
नवीन कळी दिसायला लागली. त्यानंतर गायकवाड यांना
फोन केला असता त्यांनी मला परत जर्मिनेटर, थ्राईवर यांचा स्प्रे करण्यास आणि १२:६१ खत ड्रिपमधून
देण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी केले असता सुरुवातीला त्यांनी संगीलात्याप्रमाणे
बागेत मादी कळीचे प्रमाण भरपूर दिसू लागले. मी किटकनाशकांची फवारणी सतत केल्यामुळे
बागेत मधमाशांचे प्रमाण काहीचे नव्हते. त्यामुळे गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोटेक्टंट
१ किलो माणिकराज ट्रेडिंग कंपनी, अकलूज येथून घेऊन आलो आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंटची
२०० लि. पाण्यातून याप्रमाणे ८ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या केल्या. त्यामुळे मधमाशांचे
प्रमाण वाढून कळी सेटिंग झाली. त्यानंतर गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे क्रॉंपशाईनर
१ लि. + हार्मोनी ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून १० ते १५ दिवसांनी ३ वेळेस फवारणी केली.
त्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव डाळींबावर झाला नाही. शेवटी माल फुगावणीसाठी
व कलरसाठी क्रॉंपशाईनर + राईपनर यांची फवारणी केली, तर डाळींबाची फुगवण गेल्यावर्षीपेक्षा
कितीतरी जास्त आणि आकर्षक कलर आलेला माल मिळाला. मी मागील वर्षी एवढी महागडी औषधे वापरली
होती तरीदेखील अशी बाग नव्हती. पहिल्या तोड्याला ७०० किली माल निघाला. त्याला १२० रू.
/ किलो भाव मिळाला. नंतर २३५० किलो माल निघाला पण भाव पडलेले असतानासुद्धा ७२ रू. /
किलो दर मिळाला. त्यामुळे मला एकूण उत्पन्न २,५३,२०० रुपये मिळाले. त्यामुळे मी खुष
झालो. मला मागील वर्षीपेक्षा खर्च कमी म्हणजे फक्त ३८ हजार रुपये आला.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे इतर सतत मारावी लागणारी बुरशीनाशके फारच कमी प्रमाणात वापरली. त्यामुळे एकूण
खर्च कमी आला, शिवाय या तंत्रज्ञानामुले उत्पादन व दर्जा उंचावला. मी एकवढेच शेतकऱ्यांना सांगतो की,
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खरोखरच चांगल्या, उच्च्प्रतिच्या खात्रीशीर उत्पादनाचा मार्ग आहे. म्हणून मी ह्यावेळेस
या तंत्रज्ञानाचा वापर सुरूवातीपासूनच करत आहे.
चालू वर्षी पाऊस फारच कमी झाला म्हणून उशीरा बहार धरला. २३ सप्टेंबर छाटणी केली. त्यानंतर पहिली फवारणी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + टाटामिडा १०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली व आज (१२ ऑक्टोबर २०१२ ) दुसऱ्या फवारणीसाठी जर्मिनेटर १ लि. थ्राईवर १ लि. घेऊन जात आहे . ह्यावेळेस मी क्रॉंपशाईनर व हार्मोनी यांचा वापर वेळच्यावेळी करणार आहे. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कायम आटोक्यात राहतो व फवारण्यांचा खर्च कमी येतो.
चालू वर्षी पाऊस फारच कमी झाला म्हणून उशीरा बहार धरला. २३ सप्टेंबर छाटणी केली. त्यानंतर पहिली फवारणी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + टाटामिडा १०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली व आज (१२ ऑक्टोबर २०१२ ) दुसऱ्या फवारणीसाठी जर्मिनेटर १ लि. थ्राईवर १ लि. घेऊन जात आहे . ह्यावेळेस मी क्रॉंपशाईनर व हार्मोनी यांचा वापर वेळच्यावेळी करणार आहे. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कायम आटोक्यात राहतो व फवारण्यांचा खर्च कमी येतो.