द्राक्षातील आंतरपीक काकडी, बाजार ३ ते ४ रू. किलो असताना आमचे काकडीस मात्र ८ रू. दर
श्री. भालचंद्र शंकरराव काळे,
मु. पो. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे,
मोबा.
९०११०७४२०६
माझ्याकडे द्राक्षबाग एकूण १० एकर आहे. त्याला पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे.
यामध्येच एक एकर द्राक्षामध्ये काकडीचे आंतरपीक घेतले आहे. जिप्सी काकडीचे ३ पाकिटे
बी घेऊन गेलो होतो. त्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून बी लावले. मात्र लागवड करताना
बी मजूरांकडून कमी अधिक खोलीवर गेल्याने उगवण थोडी मागेपुढे परंतु १००% झाली. या काकडीला
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नियमित स्प्रे घेतले तर २३ व्या दिवसी काकडी दिसली. माल ४०
दिवसात मार्केटला येऊ लागला. काकडी दररोज वाढत होती. त्यामुळे कोवळी एक नंबर काकडी
दररोज काढून ४ दिवसाचा माल शेतातच १०' x १०' ची वातानुकुलीत खोली बांधली आहे, त्यात
साठवून ४ दिवसांनी काकडी पुणे मार्केटला एकदम आणली आहे तर आज ७ ऑक्टोबर २०१२ रोजी बाजारभाव
पडलेले असताना म्हणजे ३ ते ४ रू. किलो भाव असताना ८ रू . किलो म्हणजे दुपटीहून अधिक
भावाने काकडीची विक्री मारणे यांच्या गाळ्यावरून झाली.