८ गुंठे झेंडूपासून ४० -४५ हजार रू.
श्री. सागर शामराव ठोंबरे, मु. पो. का.बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
मोबा. ९८९०४९१०२१
मी पुर्वीपासून जर्मिनेटर ऊस बेणेपक्रिया व ऊस फुटण्यासाठी वापरत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कोल्हापूर प्रतिनिधी श्री. केदार
मोरे (मो.९७६६२७१६३५) यांच्या सल्ल्यानुसार मी पहिल्यांदाच झेंडू पीक घेतले आणि डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत व कल्पतरू खताचा वापर केला. तर झेंडूचे भरघोस उत्पादन मिळाले.
सुरूवातीला नर्सरीमधून अॅग्रो (गोल्ड) जातीची झेंडू रोपे आणून मध्यम प्रतीच्या ८ गुंठे जमिनीत २।। x २ फुटावर लावली व लगेच १० लि. पाणी + १०० मिली जर्मिनेटर + ३० ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात रोपांना आळवणी केली. नंतर ८ दिवसांच्या अंतराने २० किलो कल्पतरू खत घालून रोपांना माती लावून शेत भांगलणी (खुरपणी) करून शेत तणविरहीत केले. २१ दिवसानंतर ५० मिली जर्मिनेटर + ५० मिली थ्राईवर + ५० मिली राईपनर + ५० मिली प्रिझम/पंपास घेऊन पहिली फवारणी केली. नंतर आठवड्याने पुन्हा दुसरी फवारणी वरील प्रमाणेच केली. तर एवढ्यावर फुटवा भरपूर होऊन फुलकळी भरपूर लागली. करपा किंवा इतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यानंतर जास्त प्रमाणात फुले लागल्यावर सप्तामृतच्या २ फवारण्या केल्या. १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाट पद्धतीने पाणी दिले व वादळी पावसाने झाडे निस्तेज झाल्यानंतर परत जर्मिनेटरची आळवणी केली.
उत्पादनाच्या बाबतीत क्षेत्र कमी (८ गुंठे) असल्याकारणाने सुरूवातीला एक दिवसआड २० ते २५ किलो माल मिळाला. नंतर २ महिने दररोज ३० ते ४० किलो माल मिळाला. सरासरी ५० रू. किलो दर मिळाला. असे ८ गुंठ्यातून ४२ ते ४५ हजार रू. चे उत्पन्न मिळाले. याला सर्वसाधारण ६ ते ८ हजार रू. इतका उत्पादन खर्च आला. आता परत नवीन झेंडूची लागवड केलेली आहे. त्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे.