२ एकर खरबुजापासून ३ लाख
                                श्री. बापू आदलिंगे,
 मु.पो. रोपळे, ता. माढा, जि. सोलापूर, 
मोबा. ८३०८२८२३९६
                            
                                मी २ एकर खरबुजाची लागण करायची ठरवली व त्यासाठी कुंदन या जातीचे स्वामी समर्थ नर्सरी
                                तांदुळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथून रोपे घेवून आलो. जमीन मुरमाड आहे, शेणखत
                                घालून जमिनीच मशागत केली होती. ड्रीप योग्यप्रकारे अंथरूण त्याप्रमाणे रोपे लागवडीनंतर
                                जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंट - पी ची आळवणी केली.
                                प्रत्येक रोपावरून १५० मिली द्रावण ग्लासने घातले त्यामुळे सर्व रोपे लवकर चिटकून आली
                                व मर रोग झाला नाही. त्यानुसार श्रीराम कृषी केंद्र कुर्डुवाडी (९९७५१२७६९६) यांच्या
                                दुकानामधून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे नेऊन दर १० ते १५ दिवसांनी फवारणी घेत राहिलो.
                                त्यामुळे पाणी कमी असूनही फळांचे सेटिंग व्यवस्थित झाले. अशाप्रकारे एकूण १२ टन माल
                                निघाला. दर २० ते ३० रू. किलो मिळाला. निम्मा माल आम्ही स्वत: बाजारामध्ये विकला. एकूण
                                उत्पन्न ३ लाख रू. झाले त्यामुळे ह्या पुढे मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा नेहमी वापर
                                करणार आहे.