जळालेला ऊस हिरवळला, उडीदाचे पिवळे पीक हिरवळले

श्री. अनिल कदारे,
मु. पो. आचलेर, ता. लोहा, जि. उस्मानाबाद,
मोबा. ९९२२४३६०८२


माझे वडील आणि लहान भाऊ शेती पाहतो. १२ एकर शेती आहे. उडीद २ एकर, ऊस ३ एकर, शेवगा १ एकर आणि उरलेल्या जमिनीत हरभरा व ज्वारी लावणार आहे. सध्या ऊस १० -१२ कांड्यावर आहे. उन्हाळ्यात पाणी कमी पडले होते. त्यामुळे पाने जळू लागली होती. तेव्हा आपल्या ऑफिसवरून सल्ल्यानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली फवारले. तर जळालेला ऊस हिरवळला . नंतर यातील शिल्लक औषधे उडीद पिकावर फवारली. गेल्या महिन्यात अति पावसाने उडीद पिवळा पडला होता, तर फवारणीनंतर उडीद हिरवे झाले.

उसासाठी सरांनी त्यावेळी ड्रेंचिंग करण्यास सांगितले होते. मात्र ते करू शकलो नाही. सरांनी आताच सांगितले की, जर्मिनेटर ड्रेंचिंग केले असते तर या अवस्थेत १० -१२ कांड्यापेक्षा १५ कांड्यावर ऊस गेला असता. म्हणून आता जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करणार आहे.