दुक्कराच्या त्रासाने 'सिद्धीविनायक' मोरिंगा मोडले तरी दुरुस्त झाडापासून २ तोड्याचे १८०० रू.

श्री. जयप्रकाश जमदाडे,
मु. पो. वाई (फुलेनगर), जि. सातारा.
मोबा. ९८९०७३६०१०



आम्ही हलक्या जमिनीत ८ x ६ फूट अंतरावर मोरिंगा शेवग्याची ५ ऑगस्ट २०१२ रोजी ० गुंठ्यामध्ये लागवड केली आहे. खड्डे भरताना कल्पतरू २५० ग्रॅम प्रत्येक खड्ड्यात मिसळले आहे. रोपे लावल्यानंतर आठवड्याने जर्मिनेटर २५ मिली + १० लि. पाणी याप्रमाणात आळवणी प्रत्येक झाडांस केली. नोव्हेंबर महिन्यात २।। ते ३ फूट उंच झाडे असताना शेंडा छाटणी केली. डिसेंबर महिन्यात दुक्करांच्या त्रासाने शेवग्याच्या बागेतील झाडे मोडली व बरीच नासधूस झाली. मग त्यावर सरांच्या सल्ल्याने सप्तामृताची फवारणी केल्यामुळे त्यातील काही झाडे पुन्हा चांगल्याप्रकारे फुटली आहेत. सध्या १ वर्षाची झाडे असून उत्पादन चालू झाले आहे. पहिल्या तोडणीस प्रत्येक झाडांपासून २५ ते ३० शेंगा निघाल्या. मोरिंगा शेवग्याच्या शेंगा वाई येथील मार्केटला विकल्या. तेथे २ तोड्याला ३० -३० किलो माल निघाला. त्याला ३० रू./ किलो भाव मिळाला. त्याचे १८०० रू. झाले, सध्या तोडे चालू आहेत.