१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवगा १२ हजार, त्यातील आंतरपीक व वेगळ्या १० गुंठ्यातील मेथी, शेपू, कोथिंबीरीचे ४५ हजार, १।। एकर मेथी, कोथिंबीर, शेपुचे २ महिन्यात ३ लाख

श्री. भारत लक्ष्मण शेवाळे,
मु. पो. जयाकोवाडी (हारकी निमगाव), ता. माजलगाव, जि. बीड,
मोबा. ९६३७५९६७३८



'सिद्धीविनायक' शेवग्याची १० गुंठ्यामध्ये गेल्यावर्षी जून २०१२ मध्ये ८' x ८' वर मध्यम प्रतीच्या जमिनीत लागवड केलेली आहे. या शेवग्याच्या सऱ्याला दोन्ही बाजूने शेपू व मेथीचे ४ - ४ बोटावर पुंजके लावले होते आणि शेवग्याच्या शेजारील १० गुंठ्यात मेथी, कोथिंबीर सलग साऱ्यात केली होती. शेवग्याला १५ ते २० दिवसांनी तर कोथिंबीर, मेथी व शेपुला ८ ते १० दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करत होतो. शेपू, मेथी, कोथिंबीरीला पहिली आणि दुसरी फवारणी जर्मिनेटर २५ मिली + थ्राईवर २५ मिली + क्रॉपशाईनर २५ मिली प्रतीपंप याप्रमाणे केली. नंतर तिसरी व चौथी फवारणी ८ दिवसांनी जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर ३० मिली + क्रॉपशाईनर ३० मिली प्रतीपंप याप्रमाणे केली. तेवढ्यावर मेथी, शेपू, कोथिंबीर काढणीस आली. १० गुंठे शेवग्यातील सऱ्याला पुंजके लावलेली मेथी व शेपू तसेच सलग १० गुंठे क्षेत्रात केलेल्या मेथी, कोथिंबीरीपासून एकूण ४५ हजार रू. उत्पन्न मिळाले. शेपूचे २० क्विंटल उत्पादन मिळाले, तिला १२ - १३ रू. /किलो मेथी भाव मिळाला. त्याचे २३ हजार रू. झाले. १२ किलो मेथी बियापासून ७ क्विंटल निघाली. तिला २५।। रू./किलो भाव मिळाला. त्याचे १७ हजार रू. झाले आणि कोथिंबीर ३ क्विंटल उत्पादन मिळाले. तर त्याचे ५ हजार रू. झाले. या तिन्ही पिकांपासून ५ हजार रू. खर्च वजा जाता ४० हजार रू. नफा मिळाला.

६ किलो धना पुंजके १८ क्विंटल उत्पन्न भाव ३५ रू./किलो, ३६ हजार रू.

नंतर दुसऱ्या लॉटमध्ये पाळी घालून सप्टेंबरमध्ये शेवग्याला वरंबे फोडून खोडाला भर लावली, खोड वरंब्यावर घेतले. मधल्या जागेत ६ किलो धन्याचे पुंजके लावले, तर १८ क्विंटल. उत्पादन मिळाले. त्याला सुरूवातीला भाव ३५ रू./किलो मिळाला. नंतर २५, २० व १५ रू./किलो असा भाव मिळाला. तरी सरासरी २० ते २५ रू./किलो भावाप्रमाणे ३६,००० रू. झाले.

हस्तातल्या पावसाने मेथी उद्धवस्त तरी १४ किलो मेथीचे ७ हजार रू.

याचवेळी १४ किलो मेथीचे बी कोथिंबीरीसोबत लावले होते. मात्र हत्ती नक्षत्रात सलग ३ दिवस जादा पाऊस झाल्याने मर झाली. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळच्यावेळी फवारण्या केल्याने किमान ७ हजार रू. तरी उत्पन्न मिळाले. यामध्ये ४ - ५ सऱ्याला लसूण लावला होता, तर दीड क्विंटल लसूण मिळाला.

दिवाळीनंतर शेवग्याच्या शेजारील मोकळ्या ६ गुंठे प्लॉटमध्ये ५० ग्रॅमची ३ पाकिटे भेंडी बी ३' x १' वर लावून त्यामध्येच सरीवर ८ किलो मेथी टोकली, तर त्यापासून ४ हजार रू. ची मेथी मिळाली व भेंडीपासून ७ हजार रू. २ - २।। महिन्यात झाले.

शेवगा दिवाळीनंतर चालू झाला तर मार्चपर्यंत १२ हजार रू. च्या शेंगा विकल्या. शेंगांना ३० ते ४५ रू./किलो भाव मिळाला. मार्चपासून पाणी कमी पडले. त्यामुळे पाडव्यानंतर पाणी देऊ शकलो नाही. नंतर वानरांनी जवळपास ४० झाडे मोडली. त्यानंतर थोडे दुर्लक्षच झाले. शेवग्याला एकूण २ हजार रू. खर्च आला.

दुसऱ्या १।। एकर क्षेत्रावर सव्वा एकर कोथिंबीर आणि १० गुंठ्यात शेपू १२ मार्च २०१३ ते १५ मार्च २०१३ पर्यंत केली होती. याला पाणी कमी असल्याने ठिबक केले होते. २ फुटावरून ठिबकच्या ओळी होत्या. ठिबकच्या पाण्याने पुर्ण रान भिजवायला २ - ३ दिवस लागले. नंतर उगवून आल्यावर नेहमीप्रमाणे शेपुला ३ तर कोथिंबीरीला ४ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी च्या केल्या. तेवढ्यावरच अक्षय्य तृतीयेला पहिली काढणी सुरू झाली. कोथिंबीरीला सेलू, पाथरी, परभणी, माजलगाव मार्केटला इतरांन ४० रू./किलो भाव असताना आमची कोथिंबीर हिरवीगार रसरशीर, चमकदार पाने असल्याने तिला ६५,७५,८५ रू./किलो भाव मिळाला. तर शेपू ४८ रू. /किलो ने ठोक विकली. या दिड एकरात दोन्ही पिकांपासून ३ लाख रू. उत्पन्न अवघ्या २ महिन्यात मिळाले. याला बियाणे, खत, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या, लेबर मोटार भाडे असा सर्व खर्च ३० हजार रू. आला.