शेजारच्या काकांनी डाळींबासाठी सरांची औषधे आग्रहाने नेण्यासाठी आणले ऑफिसला !

श्री. विकास वाल्मिक रायकर,
मु.पो. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा. ९७६६९२६६१६



मी आण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर पुणे येथे मॅकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. गावी १६०० भगवा डाळींबाची २ वर्षाची झाडे आहेत. तेथे वडील असतात. सध्या ७० ते ८० फळे प्रत्येक झाडावर आहेत. फळांवर डाग पडून आत दाणे खराब होत आहेत. फळाचे वजन १०० ग्रॅमपासून १५० ते २०० ग्रॅम आहे.

आमच्या गावातील श्री. बबन बाबुराव सुरूंकर मोबा. ९६५७६६९२६३ यांनी ४ वर्षापुर्वी त्यांच्या डाळींबावर असेच डाग पडले होते, तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे तीन स्प्रे घेतले होते तर डाग गेले. फळे निरोगी झाली, मात्र पाणी फारच कमी असल्याने फळे पोसली नाहीत. आहे तेवढीच १५० ते २०० ग्रॅमची फळे विकावी लागली व नंतर बाग काढून टाकली. फळे विक्रीतून परवडले नाही, मात्र रोग आटोक्यात आला होता असा त्यांचा अनुभव होता. आमच्या फळांचीही अशीच परिस्थिती असल्याने आम्हाला ते (सुरूंकर) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे घेण्यासाठी पुणे ऑफिसला घेऊन आले आहेत. सरांनी फळांची पाहणी केली तर ६ फळांमधील ४ फळे साधारण १५० ग्रॅम वजनाची असून फळांवर डाग पडले आहेत. यातील १ फळ २०० ग्रॅमचे होते. तेही डागळले आहे. ती फोडून पहिले असता सालीस जेथे डाग आहे तेथील दाणा काळा पडला आहे व बाकीचे दाणे लालभडक, चवदार, रसाळ आहेत आणि १ फळ जे ७० ते ८० ग्रॅमचे आहे, त्यावर डाग आहे, पण तो वरवर दिसत आहे.

तेव्हा या बागेस झाडावरील ७० - ८० फळे रोगमुक्त होऊन पोसण्यासाठी सरांनी सांगितले "प्रथम जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि., आणि कॉपरऑक्सिक्लोराईड १ लि. चे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा आणि कल्पतरू खत प्रत्येक झाडास २ किलो द्या. कल्पतरू खत एवढे नेणे शक्य नसल्यास १ - १ किलो देऊन त्याबरोबर गांडुळ खत ५ - ५ किलो द्या. गांडूळ खत नसल्यास शेणखत १ पाटी द्या आणि वरून फवारणीमध्ये थ्राईवर २ लि. क्रॉपशाईनर २ लि. राईपनर ५०० मिली, न्युट्राटोन १ लि., प्रोटेक्टंट १.५ किलो, हार्मोनी ६०० मिली आणि स्प्लेंडर २५० मिलीची २०० ते २५० लि. पाण्यातून फवारणी करा."

सरांनी सांगितले "या फवारणीनंतर ०:०:५२ हे २ किलो विद्राव्य खत २०० लि. पाण्यातून व्हेंच्युरीतून सोडा. त्यानंतर वरील फवारणी पुन्हा १० व्या दिवशी घ्यावी. मात्र तत्पुर्वी वरील फवारणी व ड्रेंचिंगमुळे झालेला बदल पाहण्यासाठी पुन्हा फळे घेऊन दाखवायला आणा. म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीचे तंत्र सांभाळले की, ही फळे दिवाळी झाल्यावर नाताळात ६५० ग्रॅमपर्यंत वाढून हा माल हॉलंडला जाऊन चांगला पैसे होतील. डाळींबाला बरे दिवस आले होते नव्हे आले आहेत परंतु प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व नेत्यांच्या खाबुगिरीच्या कात्रीत शेतकरी सापडून चांगले उत्पादन पिकविण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या.

"१ नंबरचा डाळींबाचा माल दिल्ली, लुधीयाना मार्केटला चालतो. ३ - ४ नंबरची फळे नेपाळ, बांगलादेश, मालदीप, श्रीलंका या देशात जातात. ३५० ग्रॅमचा माल लंडन (इंग्लड) थायलंडमध्ये चालतो. सिंगापूरला हायक्वॉलिटीचा माल लागतो. सिंगापूर हे छोटे राष्ट्र असून येथे काहीच पिकत नाही!" सर

"कोणत्याही फळाचा बहार धरताना तो सणासुदीच्या दिवसात येणार नाही असे पहावे. डाळींबाचा बहार हा रोजा - रमजान, मोहरममध्ये येईल याकरिता १२० दिवस अगोदर बहाराचे नियोजन करावे. म्हणजे आखाती राष्ट्रात इराक, कुवेत, बहारीन, मस्कत, अबुधाबी येथे डाळींबाला भाव बऱ्यापैकी राहतात, महाराष्ट्रात मालेगाव, भिवंडी येथे चांगले भाव सापडतात. माल मार्केटला पाठविण्यापुर्वी नातेवाईकांमार्फत अथवा मित्रांमार्फत किंवा शक्य असल्यास स्वत: बाजारपेठेत जाऊन किंवा मोबाईलवरून बाजारभावाची खात्री करून नंतर तेथे माल पाठवावा. बऱ्याचदा अशी समस्या उद्भवते की दलाल शेतकऱ्याचा माल आपल्याकडे येण्यासाठी अगोदर जादा भाव सांगतो. तेव्हा आपला चेहरा आनंदाने फुलून माल मार्केटला नेतो. मात्र माल तोडून मार्केटला आल्यावर भाव पडतात. त्यावेळी आपला चेहरा कोमेजलेल्या फुलासारखा होतो. दलाल १ नंबरचा माल २ किंवा ३ नंबर भावाने विकतो. यांनी सरांच्या सल्ल्यानुसार रमजानला डाळींब आणले होते. डाळींब माल ए १++ क्वॉलिटीचा होता. कारण त्यांची फळे अनेक लोकांना सरांनी प्रसाद म्हणून दिली. फळ चमकदार लाल कलरचे होते. दाणे लालबुंद होते. परंतु या मालास १०० ते १४० रू. भाव द्यायला हवा असताना दलालाने ५० रू. भाव दिला. माल विक्रीनंतर त्याने ५० हजार रू. चा चेक दिला, तो ६ महिने वटला नाही. म्हणून तो शेतकरी सरांकडे आला, तेव्हा सरांनी दलालाला चांगलेच सुनावले व पुन्हा त्या दलालाकडे माल टाकू नका असे सांगितले."

"यावर पर्याय म्हणून सरांनी सांगितले. "वाशी नवी मुंबईच्या मुन्ना फ्रुट कंपनी यांच्या कडे माल पाठवा. ते तेथून दुबईला माल पाठवितात. श्री. सुरेश ज्ञानू कासार, चोरूची, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली. मोबा. ९९७५९१२२८१/९६७३६२३९५६ हे शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादीत केलेले डाळींब मुन्ना फ्रुट कंपनी, वाशी यांच्याकडे पाठवितात. त्यांचा १५० टनापैकी ८०% माल एक्सपोर्ट होतो. त्यांना जेव्हा १० लाखाचे उत्पन्न अपेक्षित असताना २० लाख रू. होत असत. २० लाखाची अपेक्षा असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ४० लाख रू. मिळाल्याचे त्यांनी सांगितले."

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कृषी क्षेत्रात घडविली क्रांती !

माझ्यासोबत माझा मित्र श्री. महेश मुक्ताजी धायगुडे M.sc.(Org.Chem.) मोबा. ७७०९९३३४७३ हा आला असून तो UPSC, IPS, IAS चा अभ्यास करत आहे.

श्री. बबन बाबुराव सुरूंकर ह्यांनी लिंबू १ एकर लावला आहे. ती बाग १ वर्षाची असून कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन येऊ शकते. असे सरांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील श्री. बाबुराव माळी या शेतकऱ्याने कमी पाण्यावर द्राक्ष बाग आणली. तसेच श्री. पोपट जगदाळे, न्हावरे, ता.शिरूर, जि.पुणे. फोन नं. (०२१३७) २२२२०१ यांनीही कमी पाण्यावर कांदा काढला तो एका कृषी परिसंवादात त्यांनी शेतकऱ्यांना दाखविण्यासाठी आपला होता. तर त्याची पात १।। फुट उंचीची व कांदा गोल्टी, वनजदार, आकर्षक लाल रंगाचा होता. सर्वांनी कांदा पाहून आश्चर्य व्यक्त केले, की फक्त आंबवणी चिंबवणीवर कांदा कसा येऊ शकतो. म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने जर हे शक्य केले आहे, तर तुमची लिंबू बाग आपण कमी पाण्यावर १००% यशस्वी करू असे सरांनी सांगितले.