डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने तेल्यायुक्त डाळींब निरोगी होऊन ३।। एकर (११०० झाडे) डाळींब, १८ टन, ५ लाख उत्पन्न

श्री. रावसाहेब गोविंद धनगर,
मु.पो. सोनगीर, ता.जि. धुळे- ४२४३०९.
मो. ९०११५६५८७२



आम्ही नोव्हेंबर २०१३ मध्ये भगवा डाळींबाची लागवड १२' x १०' वर केली आहे. ३।। एकरमध्ये ११०० झाडे लावली आहेत. त्यातील ६०० झाडे लावलेली जमीन हलकी मुरमाड प्रतिची आहे, तर ५०० झाडे लावलेली जमीन मध्यम काळी आहे.

या बागेचा पहिला बहार जून २०१५ मध्ये घेतला होता. मात्र हे पीक आम्हाला नवीनच असल्याने आम्ही सल्लागार नेमला होता. त्याच्या मार्गदर्शनानुसार बागेचे पुर्ण व्यवस्थापन करत होतो. ह्या बागेतील माल सेट झाल्यानंतर बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार आलटून पालटून बरीच औषधे फवारली, मात्र रोगाचे प्रमाण वाढतच होते.

सप्टेंबर २०१५ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. किशोर निकम (मो.९६६५००८८१८) हे आमच्या प्लॉटवर आले, त्यांनी बागेची पाहणी केली. तेव्हा बागेवर तेल्या रोगाचे प्रमाण ८०- ९०% होते. तेव्हा त्यांनी सांगितले, "ह्या बागेवर आता फवारण्यांचा खर्च वाढविण्यापेक्षा हा बहार काढून टाका आणि पुढील बहार आपण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीनाने घेऊ. आता नुसताच खर्च वाढत जाईल व अपेक्षीत उत्पादन मिळणार नाही." त्यांचा सल्ला आम्हालाही योग्य वाटला.

त्यानंतर सर्व फळे तोडून नष्ट केली आणि बागेला ऑकटोबर - नोव्हेंबर (२०१५) दरम्यान ताण दिला. सुरुवातीला पुर्वीचा सल्लागार होता. त्याच्या सल्ल्याप्रमाणेच खतांची मात्रा व औषध फवारणी सुरू होती. कारण आम्हाला यातील अनुभव नसल्याने एकदम त्यांनाही बंद करणे शक्य नव्हते. त्यानंतर जानेवारीमध्ये फळांचे सेंटिग झाले. हलक्या जमिनीतील ६०० झाडांना १०० ते १२० फळे लागली होती. मात्र काळ्या जमिनीतील झाडांवर ५० - ६० च फळे टिकली. याच अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. किशोर निकम प्लॉटवर आले. त्यांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन केले व पुढेही वेळच्यावेळी प्लॉट व्हिजीट करून मार्गदर्शन व डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून तेल्यामुक्त खात्रीशीर उप्तादन मिळवून देण्याची खात्री दिली. त्यानंतर पहिला सल्लागार बंद करून पुर्णपणे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरू लागलो. जर्मिनेटर कॉपर ऑक्सीक्लोराईडचे १ ते १।। महिन्याला ड्रेंचिंग (आळवणी) करू लागलो. थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन, हार्मोनीच्या १५ ते २० दिवसाला फवारण्या करत होतो. त्यामुळे पहिल्या बहाराला जो तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता तो अजिबात उद्भवला नाही. बाग पुर्णपणे निरोगी ठेवता आली. झाडांवर सरासरी ७० ते १०० फळे होती.

फळे पोषणाच्या काळात थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातील ह्या बहाराच्या फळांचे पोषण चांगल्याप्रकारे झाले. झाडे साधारणच होती. तरी झाडांवर ७० ते १०० फळे धरून २५० ते ३०० ग्रॅम पर्यंत पोषण झाले. फळांना आकर्षक लालभडक कलर आला. फळांचा आकार मध्यम जरी असला तरी कलर आकर्षक असल्याने मालेगावच्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीचा (पहिल्या दोन तोड्याचा) ८ टन माल ५५ रु. किलोने जागेवरून नेला. नंतर मागे राहिलेला (तिसऱ्या तोड्याचा) २ टन माल ४० रु. किलोने नेला. तिन्ही तोड्यातील मालाची छाटणी (प्रतवारी) करून काही प्रमाणात डाग असलेला माल २० रु. ने तर बारीक माल प्रमाणात डाग असलेला माल २० रु. ने तर बारीक माल २०० ते ३०० रु./ क्रेट भावाने लोकल मार्केटला विकला. या ३।। एकरमधील ११०० झाडापासून एकूण १८ टन माल निघाला. त्याचे ५ लाख रु. झाले.

या अनुभवातून जून २०१६ ला माल संपल्यानंतर जुलै - ऑगस्ट (२०१६) बागेस ताण देऊन पानगळ केली. ११०० झाडांना प्रत्येकी १ किलो कल्पतरू खत आणि ३०० ग्रॅम १०:२६:२६ दिले आहे. पहिली फवारणी जर्मिनेटरची करून आळवणी केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि कॉन्फीडॉरची दुसरी फवारणी केली आहे. सध्या फुट चांगली निघाली आहे. पुढे ही डॉ.बावसकर तंत्रज्ञान किशोर निकम यांच्या सल्ल्यानुसार वापरणार आहे.